logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थी पोलीस संवादातून सायबर क्राईम आणि मार्गदर्शन पोलीस विद्यार्थी संवाद उपक्रमाच्या माध्यमातून १९० भेटींमध्ये ६२,९९७ विद्यार्थ्यांशी पोलिसांचा संवाद. लातूर (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती, सुरक्षितते बाबत जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. १ ऑगस्ट २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य व प्राध्यापकां कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १९० भेटींच्या माध्यमातून तब्बल ६२,९९७ विद्यार्थ्यांशी पोलिसांनी थेट संवाद साधला आहे. जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच ६ विभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सहभागातून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विविध कायदे, सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारीच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः ४ ठिकाणी भेटी देऊन तब्बल ८,७०० विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांनी पोलिसांशी थेट संवाद साधावा, आपल्या समस्या व शंका मोकळेपणाने मांडाव्यात आणि कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे, यासाठी पोलीस विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ उपक्रमात विद्यार्थ्यांना नव्याने लागू झालेल्या कायद्यांबाबत माहिती देण्याबरोबरच सायबर फ्रॉडपासून बचाव, डायल ११२ चा वापर, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदार वापर, पॉक्सो कायदा, आर्म्स ॲक्ट, वाहतूक नियम, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. विशेषतः वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी अथवा बँकिंगची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी, तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थां पासून दूर राहणे, वाहतुकीचे नियम पाळणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीटबेल्ट लावणे, याबाबतही विद्यार्थ्यांना प्रभावीपणे प्रबोधन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयीचा संवाद अधिक सुसंवादी होत असून, ‘पोलीस म्हणजे केवळ कारवाई करणारी यंत्रणा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर असलेली यंत्रणा’ हा विश्वास निर्माण होत आहे.शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल, चुकीच्या गोष्टींपासून ते दूर राहतील, संभाव्य गुन्ह्यांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होईल आणि भविष्यात ते कायद्याचा आदर करणारे, सजग व जबाबदार नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.विद्यार्थ्यांमध्ये कायद्याचे ज्ञान, सुरक्षिततेची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम यापुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार आहे.

1 hr ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago
ac06bf51-4f2b-44e9-b3ae-0482ac8539b3

विद्यार्थी पोलीस संवादातून सायबर क्राईम आणि मार्गदर्शन पोलीस विद्यार्थी संवाद उपक्रमाच्या माध्यमातून १९० भेटींमध्ये ६२,९९७ विद्यार्थ्यांशी पोलिसांचा संवाद. लातूर (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती, सुरक्षितते बाबत जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. १ ऑगस्ट २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य व प्राध्यापकां कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १९० भेटींच्या माध्यमातून तब्बल ६२,९९७ विद्यार्थ्यांशी पोलिसांनी थेट संवाद साधला आहे. जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच ६ विभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सहभागातून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विविध कायदे, सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारीच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः ४ ठिकाणी भेटी देऊन तब्बल ८,७०० विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांनी पोलिसांशी थेट संवाद साधावा, आपल्या समस्या व शंका मोकळेपणाने मांडाव्यात आणि कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे, यासाठी पोलीस विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ उपक्रमात विद्यार्थ्यांना नव्याने लागू झालेल्या कायद्यांबाबत माहिती देण्याबरोबरच सायबर फ्रॉडपासून बचाव, डायल ११२ चा वापर, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदार वापर, पॉक्सो कायदा, आर्म्स ॲक्ट, वाहतूक नियम, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. विशेषतः वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी अथवा बँकिंगची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी, तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थां पासून दूर राहणे, वाहतुकीचे नियम पाळणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीटबेल्ट लावणे, याबाबतही विद्यार्थ्यांना प्रभावीपणे प्रबोधन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयीचा संवाद अधिक सुसंवादी होत असून, ‘पोलीस म्हणजे केवळ कारवाई करणारी यंत्रणा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर असलेली यंत्रणा’ हा विश्वास निर्माण होत आहे.शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल, चुकीच्या गोष्टींपासून ते दूर राहतील, संभाव्य गुन्ह्यांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होईल आणि भविष्यात ते कायद्याचा आदर करणारे, सजग व जबाबदार नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.विद्यार्थ्यांमध्ये कायद्याचे ज्ञान, सुरक्षिततेची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम यापुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भारतीय मार्केट मध्ये पुन्हा नव्याने नवीन भोंदू बाबा निर्माण झाले... .
    1
    भारतीय मार्केट मध्ये पुन्हा नव्याने नवीन भोंदू बाबा निर्माण झाले...
.
    user_रावसाहेब शिंदे
    रावसाहेब शिंदे
    News Anchor मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    1
    केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न.
विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार.
लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.
शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित
या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत.
‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.
या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले.
महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.
    user_Santosh Dhanure S D news
    Santosh Dhanure S D news
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लातूर : बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अ‍ॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
    1
    लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन
लातूर :  बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 
या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अ‍ॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_अतिश कांबळे
    अतिश कांबळे
    Local News Reporter Latur, Maharashtra•
    22 hrs ago
  • 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    1
    🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा
📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे.
📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा.
☎️ 02462-235077
☎️ 1077 — टोल फ्री
माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा.
⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न ​नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ​या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ​समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो
    1
    [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
​नांदेड:
लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
​या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
​समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
[26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी  उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    1
    वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.
शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले.
यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    5 hrs ago
  • देश की युवा पीढ़ी खतरे में हैं" ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... *"देश की युवा पीढ़ी खतरे में हैं" ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... कुछ इस तरह फर्ज़ी डिग्री वाले फेंकूओं की सरकार ने देश को बर्बाद किया है* *युवा इसलिए इस भ्रष्टाचारी सरकार को सपोर्ट नहीं कर रहा*
    1
    देश की युवा पीढ़ी खतरे में हैं"  ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ...
*"देश की युवा पीढ़ी खतरे में हैं"  ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... कुछ इस तरह फर्ज़ी डिग्री वाले फेंकूओं की सरकार ने देश को बर्बाद किया है*
*युवा इसलिए इस भ्रष्टाचारी सरकार को सपोर्ट नहीं कर रहा*
    user_रावसाहेब शिंदे
    रावसाहेब शिंदे
    News Anchor मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.