logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कुंभारीत सारवान बाबा व सकलादी बाबा कुस्त्यांचा थरार; पैठणच्या १९ वर्षीय महिला पैलवान नंदिनी तांबेचा सन्मानपूर्वक गौरव भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन तालुक्यातील मौजे कुंभारी येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सारवान बाबा संस्थान यात्रेनिमित्त पारंपारिक कुस्त्यांचा आखाडा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. कुंभारी येथे दोन मुख्य श्रद्धास्थान आहेत. एक म्हणजे सारवान बाबा मंदिर आणि दुसरे म्हणजे सकलादी बाबा पीर स्थान. या दोन्ही ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा आणि पाडवा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. जुनी कुंभारी येथे सारवान बाबा मंदिराचा कार्यक्रम तर पाडवा तरुळी कुंभारी येथे सकलादी बाबा पीराचा कार्यक्रम पार पडला या कुस्ती आखाड्यांचे उद्घाटन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मुकेश पांडे व भोकरदन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संभाजी देशमुख व प्रकाश मिरकर हे मान्यवर उपस्थित होते. भोकरदन पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवल्याने सर्व कुस्त्या अत्यंत शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या, कोठेही वाद तंटा झाला नाही. यावर्षी या आखाड्यात संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषत मराठवाड्यातून मोठमोठाले नामांकित पहिलवान दाखल झाले होते. मातीत रंगलेल्या चुरशीच्या कुस्त्यांनी शेकडो प्रेक्षकांची मने जिंकली. विजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या सकलादी बाबा कार्यक्रमाचे नियोजन कुंभारी गावातील कोळी बांधवांसह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी केले. यामध्ये सरपंच कृष्णा मुरकुटे, माजी सरपंच सूर्यकांत पाटील, मधुकर पाटील, भिकन फुकट, रावसाहेब पाटील, हरिदास फुकट, काकासाहेब फुकट, अंकुश सहाने, मंगेश म्हस्के, शिवाजी थोरात, राजू सहाने, प्रदीप शिंदे, विठ्ठल पंडित जाधव (उर्फ लाला), शालीग्राम जाधव, ज्ञानेश्वर विनायक जाधव, विक्रम बंडू सहाने, गौतम रामराव सहाने, काशिनाथ अर्जुन जाधव या सर्वांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. हे सर्वजण कुंभारी गावाचेच प्रभारी म्हणून कार्यरत होते. यंदाच्या आखाड्याचे विशेष आकर्षण ठरली पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथील १९ वर्षीय महिला पैलवान कु. नंदिनी तांबे. गेल्या ४ वर्षांपासून ती कुस्ती क्षेत्रात सक्रिय आहे. कुंभारीत तिच्यासोबत लढण्यासाठी योग्य प्रतिस्पर्धी न मिळाल्याने तिची कुस्ती होऊ शकली नाही, मात्र आयोजकांनी तिच्या धाडसाचा सन्मान करत तिला ठेवलेले बक्षीस सन्मानपूर्वक प्रदान केले. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निमित्ताने कुंभारी गावकऱ्यांच्या वतीने मराठवाड्यासह महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व पहिलवानांचे, कुस्तीप्रेमींचे आणि पाडव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व समाज बांधवांचे मन पूर्वक आभार मानण्यात आले असून त्यांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले आहे.

18 hrs ago
user_इसरारखान पठाण
इसरारखान पठाण
Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
18 hrs ago
882353be-b394-4a73-b078-d342a7dc516d

कुंभारीत सारवान बाबा व सकलादी बाबा कुस्त्यांचा थरार; पैठणच्या १९ वर्षीय महिला पैलवान नंदिनी तांबेचा सन्मानपूर्वक गौरव भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन तालुक्यातील मौजे कुंभारी येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सारवान बाबा संस्थान यात्रेनिमित्त पारंपारिक कुस्त्यांचा आखाडा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. कुंभारी येथे दोन मुख्य श्रद्धास्थान आहेत. एक म्हणजे सारवान बाबा मंदिर आणि दुसरे म्हणजे सकलादी बाबा पीर स्थान. या दोन्ही ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा आणि पाडवा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. जुनी कुंभारी येथे सारवान बाबा मंदिराचा कार्यक्रम तर पाडवा तरुळी

a2dcc5fb-66d6-488e-a2cb-d85f1376de2a

कुंभारी येथे सकलादी बाबा पीराचा कार्यक्रम पार पडला या कुस्ती आखाड्यांचे उद्घाटन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मुकेश पांडे व भोकरदन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संभाजी देशमुख व प्रकाश मिरकर हे मान्यवर उपस्थित होते. भोकरदन पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवल्याने सर्व कुस्त्या अत्यंत शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या, कोठेही वाद तंटा झाला नाही. यावर्षी या आखाड्यात संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषत मराठवाड्यातून मोठमोठाले नामांकित पहिलवान दाखल झाले होते. मातीत रंगलेल्या चुरशीच्या कुस्त्यांनी शेकडो प्रेक्षकांची मने जिंकली. विजेत्यांना रोख

f440aff3-b1d9-4fe2-a8e7-ee52c29d5093

बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या सकलादी बाबा कार्यक्रमाचे नियोजन कुंभारी गावातील कोळी बांधवांसह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी केले. यामध्ये सरपंच कृष्णा मुरकुटे, माजी सरपंच सूर्यकांत पाटील, मधुकर पाटील, भिकन फुकट, रावसाहेब पाटील, हरिदास फुकट, काकासाहेब फुकट, अंकुश सहाने, मंगेश म्हस्के, शिवाजी थोरात, राजू सहाने, प्रदीप शिंदे, विठ्ठल पंडित जाधव (उर्फ लाला), शालीग्राम जाधव, ज्ञानेश्वर विनायक जाधव, विक्रम बंडू सहाने, गौतम रामराव सहाने, काशिनाथ अर्जुन जाधव या सर्वांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. हे सर्वजण कुंभारी गावाचेच प्रभारी म्हणून कार्यरत होते. यंदाच्या आखाड्याचे विशेष आकर्षण ठरली

47025d27-52e1-48b4-822b-40a0ba21e834

पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथील १९ वर्षीय महिला पैलवान कु. नंदिनी तांबे. गेल्या ४ वर्षांपासून ती कुस्ती क्षेत्रात सक्रिय आहे. कुंभारीत तिच्यासोबत लढण्यासाठी योग्य प्रतिस्पर्धी न मिळाल्याने तिची कुस्ती होऊ शकली नाही, मात्र आयोजकांनी तिच्या धाडसाचा सन्मान करत तिला ठेवलेले बक्षीस सन्मानपूर्वक प्रदान केले. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निमित्ताने कुंभारी गावकऱ्यांच्या वतीने मराठवाड्यासह महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व पहिलवानांचे, कुस्तीप्रेमींचे आणि पाडव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व समाज बांधवांचे मन पूर्वक आभार मानण्यात आले असून त्यांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.
    1
    भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर

नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय
भोकरदन  इसरारखान पठाण
भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला.
सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा.
रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला.
या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले.
ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार.
सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली
हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 
भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया
    1
    मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया
मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...
    1
    श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...
श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    19 hrs ago
  • बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS
    1
    बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS

इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    16 hrs ago
  • माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड शहरात तरुणांच्या रोजगारासाठी पैठणी उद्योग सुरू करणार कापसे पैठणी कंपनीला भेट सिल्लोड सोयगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येवला येथील कापसे पैठणी उद्योग येथे भेट देत पैठणी उद्योगाची माहिती घेतली
    1
    माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड शहरात तरुणांच्या रोजगारासाठी पैठणी उद्योग सुरू करणार कापसे पैठणी कंपनीला भेट
सिल्लोड सोयगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येवला येथील कापसे पैठणी उद्योग येथे भेट देत पैठणी उद्योगाची माहिती घेतली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नप्ते, तर उपाध्यक्षपदी संदीप आप्पा काळे यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहून भक्तिभावाने गणरायाची आरती करतात. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, संपूर्ण उत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सावळदबारा परिसर भक्तिमय झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.
    1
    जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन 
जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन  सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नप्ते, तर उपाध्यक्षपदी संदीप आप्पा काळे यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत.  गणेशोत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहून भक्तिभावाने गणरायाची आरती करतात. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते.  गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, संपूर्ण उत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सावळदबारा परिसर भक्तिमय झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    36 min ago
  • जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    1
    जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट?

 जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!


जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट?
जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!
संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल
आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे.
विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सिल्लोड वडोद चाथा येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील वडोद साठा येथे विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील घटने प्रकरणे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे
    1
    सिल्लोड वडोद चाथा येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद
सिल्लोड तालुक्यातील वडोद साठा येथे विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील घटने प्रकरणे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.