logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पोंभुर्णातील नाट्यसभागृहाचे छत कोसळले; भ्रष्टाचार व हलगर्जीपणाचा गंभीर आरोप लाखोंचा निधी खर्च, पण बांधकाम निकृष्ट पोंभुर्णातील नाट्यसभागृहाचे छत कोसळले; भ्रष्टाचार व हलगर्जीपणाचा गंभीर आरोप पोंभुर्णा | प्रतिनिधी पोंभुर्णा शहरातील लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या नाट्यसभागृहाच्या छताचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्घाटनावेळी मोठ्या गाजावाज्यात नागरिकांसाठी खुले करण्यात आलेली ही वास्तू आता धोकादायक ठरत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाट्यसभागृहाच्या छताचा काही भाग अचानक खाली कोसळला. सुदैवाने घटना घडली त्या वेळी सभागृहात मोठी गर्दी नसल्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. मात्र या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित इमारतीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नाट्यसभागृहाच्या बांधकामावेळीच कामाच्या दर्जाबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. निकृष्ट साहित्याचा वापर, दर्जाहीन कामकाज आणि देखरेखीचा अभाव याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र संबंधित विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कार्यक्रम सुरू असता तर मोठी दुर्घटना घडली असती घटना घडली त्या वेळी सभागृहात कोणताही मोठा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू नसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “जर कार्यक्रम सुरू असताना छत कोसळले असते, तर अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला असता,” अशी भीती व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पालक, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये चिंता वाढली आहे. ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताची चर्चा नाट्यसभागृहासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात झालेल्या बांधकामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे आता उघड होत असल्याने ठेकेदार आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून भ्रष्टाचार झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. “जबाबदार कोण?” – नागरिकांचा प्रशासनाला सवाल या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? की नेहमीप्रमाणे हे प्रकरणही दडपण्याचा प्रयत्न होणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात दोषींवर कारवाई होते का याकडे संपूर्ण पोंभुर्णा शहराचे लक्ष लागले आहे.

4 hrs ago
user_Jivandas Gedam
Jivandas Gedam
Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago
33f2532c-8415-4451-b238-b117afb3aefa

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नव्याने बांधलेले मेन गेट कोसळले. या घटनेमुळे स्थानिक विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, 'विकासाचा बुरखा' फाटल्याची चर्चा सुरू आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नव्याने बांधलेले मेन गेट कोसळले. या घटनेमुळे स्थानिक विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, 'विकासाचा बुरखा' फाटल्याची चर्चा सुरू आहे.
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली. ओडिशातून आणलेला 11 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, यात 3 महिलांसह आरोपींचा समावेश आहे.
    1
    चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली. ओडिशातून आणलेला 11 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, यात 3 महिलांसह आरोपींचा समावेश आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • चंद्रपूर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ओडिशा राज्यातून गांजा आणणाऱ्या ३ महिला आणि २ पुरुषांसह ११ किलो गांजा, ऑटो आणि मोबाईल असा २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि ओडिशातील ड्रग रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
    1
    चंद्रपूर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ओडिशा राज्यातून गांजा आणणाऱ्या ३ महिला आणि २ पुरुषांसह ११ किलो गांजा, ऑटो आणि मोबाईल असा २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि ओडिशातील ड्रग रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
    user_Prakash deogade
    Prakash deogade
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भिवापूर तालुक्यातील रानमांगली येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण डडमल यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली. त्यांनी सेंद्रिय शेती कशी केली जाते, निविष्ठा कशा तयार करतात याची माहिती घेऊन सेंद्रिय उत्पादनांच्या मार्केटिंगवर चर्चा केली.
    1
    नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भिवापूर तालुक्यातील रानमांगली येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण डडमल यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली. त्यांनी सेंद्रिय शेती कशी केली जाते, निविष्ठा कशा तयार करतात याची माहिती घेऊन सेंद्रिय उत्पादनांच्या मार्केटिंगवर चर्चा केली.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नौतन के सरस्वती शिशु विद्या मंदिर के प्रांगण में मातृ सम्मेलन किया गया
    1
    नौतन के सरस्वती शिशु विद्या मंदिर के प्रांगण में मातृ सम्मेलन किया गया
    user_Triloki rai
    Triloki rai
    TV News Anchor समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमागे दडलेले खरे कारण आता समोर आले आहे. ही नवी माहिती अनेक लोकांना या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरू शकते. वेळीच उपाययोजना केल्यास आरोग्य सुधारणे शक्य आहे.
    1
    मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमागे दडलेले खरे कारण आता समोर आले आहे. ही नवी माहिती अनेक लोकांना या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरू शकते. वेळीच उपाययोजना केल्यास आरोग्य सुधारणे शक्य आहे.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    7 hrs ago
  • भिवापूरमध्ये नव्याने बांधलेल्या बसस्थानकावरून नागरिक संतप्त झाले आहेत, कारण ते फक्त एक प्रवाशी निवारा ठरले आहे. याचदरम्यान, नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि इतर गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून नेते केवळ प्रसिद्धीच्या मागे लागल्याचे चित्र आहे.
    1
    भिवापूरमध्ये नव्याने बांधलेल्या बसस्थानकावरून नागरिक संतप्त झाले आहेत, कारण ते फक्त एक प्रवाशी निवारा ठरले आहे. याचदरम्यान, नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि इतर गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून नेते केवळ प्रसिद्धीच्या मागे लागल्याचे चित्र आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींनंतर अभिनेता थलपती विजय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उपस्थित होते, ज्यामुळे राज्यात 'थलपती पर्व' सुरू झाले आहे.
    1
    तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींनंतर अभिनेता थलपती विजय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उपस्थित होते, ज्यामुळे राज्यात 'थलपती पर्व' सुरू झाले आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.