खत विक्रीतील 'लिंकिंग' विरोधात शेतकरी नेते भूषण कुंटे यांचा एल्गार; मुख्यमंत्र्यांकडे धाव खत विक्रीतील 'लिंकिंग' विरोधात शेतकरी नेते भूषण कुंटे यांचा एल्गार; मुख्यमंत्र्यांकडे धाव सतीश भालेराव नागपूर :- खरीप हंगामाच्या तोंडावर नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू आहे. युरिया किंवा डीएपी (DAP) सारख्या खतांसोबत नॅनो युरिया, सल्फर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची सक्तीने विक्री केली जात आहे. या बेकायदेशीर 'लिंकिंग' विरोधात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे नेते भूषण कुंटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. मुजोर कंपन्यांवरही कारवाईची मागणी या आंदोलनात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता, विदर्भ कार्याध्यक्ष तथा नागपूर जिल्हाध्यक्ष भूषण कुंटे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, "केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून चालणार नाही. मुळात ज्या खत कंपन्या आपल्या विक्रेत्यांवर इतर उत्पादने विकण्यासाठी (लिंकिंग) दबाव टाकत आहेत, त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कंपन्यांच्या दबावामुळेच विक्रेते शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत, त्यामुळे या रॅकेटच्या मुळाशी जाऊन कंपन्यांनाही जबाबदार धरले पाहिजे." 'डॉकॉय' (बनावट ग्राहक) मोहिमेद्वारे होणार पर्दाफाश प्रशासनाने तात्काळ कृषी केंद्रांवर भरारी पथकांद्वारे 'डॉकॉय' (बनावट ग्राहक) पाठवून प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी कुंटे यांनी केली आहे. बनावट ग्राहकांच्या माध्यमातून ही लूट रंगेहात पकडणे शक्य होईल आणि शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवता येईल. प्रशासनाला इशारा शेतकरी नेते भूषण कुंटे पुढे म्हणाले की, "शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे, अशा परिस्थितीत ही लूट सहन केली जाणार नाही. जर प्रशासनाने 'डॉकॉय' मोहीम राबवून दोषी विक्रेते आणि दबाब टाकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली नाही, तर महाराष्ट्र शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल." पत्रातील प्रमुख मागण्या: कंपन्यांवर कारवाई: विक्रेत्यांवर लिंकिंगसाठी दबाव टाकणाऱ्या खत कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. डॉकॉय मोहीम: बनावट ग्राहकांद्वारे कृषी केंद्रांची गुप्त तपासणी करून रंगेहात कारवाई करावी. परवाने रद्द करा: सक्तीने विक्री करणाऱ्या केंद्र चालकांचे परवाने कायमचे रद्द करावेत. जागरूकता फलक: प्रत्येक दुकानाबाहेर "खतांसोबत इतर उत्पादने घेणे बंधनकारक नाही" असे फलक लावणे अनिवार्य करावे. राष्ट्रीय प्रवक्ता भूषण कुंटे यांनी ही तक्रार मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे.

- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1