केज-बीड रोडवर भरधाव दुचाकीची हातगाडीला धड एक जण गंभीर जखमी केज/ प्रतिनिधी: केज-बीड रोडवरील गुरुमुख हॉटेल जवळ भरधाव मोटारसायकलने हातगाडीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.३४ वाजण्याच्या सुमारास केज-बीड रोडवर गुरुमुख हॉटेल व दुकानाच्या मधील डिव्हायडर जवळ ही घटना घडली. आयान तांबोळी (रा. केज) हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल अतिशय भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. त्याने पाठीमागून हातगाडीला जोरात धडक दिली. या धडकेत हातगाडी ओढणारे फिर्यादीचे वडील खाली पडले. त्यांच्या उजव्या हाताला, पायाला गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेनंतर फिर्यादी अथर्व राशिकांत वेदपाठक (वय २२) यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी आरोपी आयान तांबोळी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केज पोलीस करीत आहेत.
केज-बीड रोडवर भरधाव दुचाकीची हातगाडीला धड एक जण गंभीर जखमी केज/ प्रतिनिधी: केज-बीड रोडवरील गुरुमुख हॉटेल जवळ भरधाव मोटारसायकलने हातगाडीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.३४ वाजण्याच्या सुमारास केज-बीड रोडवर गुरुमुख हॉटेल व दुकानाच्या मधील डिव्हायडर जवळ ही घटना घडली. आयान तांबोळी (रा. केज) हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल अतिशय भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. त्याने पाठीमागून हातगाडीला जोरात धडक दिली. या धडकेत हातगाडी ओढणारे फिर्यादीचे वडील खाली पडले. त्यांच्या उजव्या हाताला, पायाला गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेनंतर फिर्यादी अथर्व राशिकांत वेदपाठक (वय २२) यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी आरोपी आयान तांबोळी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केज पोलीस करीत आहेत.
- धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.2
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले1
- बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .1
- ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.2
- DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, गुन्हेगारी, विकासकामे, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. 📍 धाराशिव | उस्मानाबाद व परिसर 🗓️ दिनांक : २७ ऑगस्ट २०२६ अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी झुंजार SC 37 NEWS OSMANABAD चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 संपर्क : 08805974164 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.1
- मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान1
- नांदेड महापालिकेतील भ्रष्टाचार कधी थांबणार..... उपमहापौर दीपक सिंह रावत, प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक तुलजेश यादव, बजरंग ठाकूर नगरसेवक प्रतिनिधी यांनी केले स्टिंग ऑपरेशन जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी पहा पूर्ण प्रकरण काय आहे संपूर्ण व्हिडिओ हेडफोन लावून ऐकणे1
- शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड1