logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. एका बाजूला आंबेडकर अनुयायांनी, भीम सैनिकांनी समतेचा संदेश देत लातूर शहरातून अनेक भागातून मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांना शांततेचा संदेश देत भीम आर्मीचे रणधीर सुरवसे यांनी मिरवणुकीतील अध्यक्षांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष रणधीर सुरवसे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिका संघर्ष करा परंतु आपला समाज संघटित झाला नाही तो झाला पाहिजे, संघटन करा असे समाजाला संदेश देत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भीम आर्मीने उत्साहात साजरी केली. याप्रसंगी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

10 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
10 hrs ago

लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. एका बाजूला आंबेडकर अनुयायांनी, भीम सैनिकांनी समतेचा संदेश देत लातूर शहरातून अनेक भागातून मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांना शांततेचा संदेश देत भीम आर्मीचे रणधीर सुरवसे यांनी मिरवणुकीतील अध्यक्षांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष रणधीर सुरवसे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिका संघर्ष करा परंतु आपला समाज संघटित झाला नाही तो झाला पाहिजे, संघटन करा असे समाजाला संदेश देत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भीम आर्मीने उत्साहात साजरी केली. याप्रसंगी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे. ‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे? आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
    2
    उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे.
‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे?
आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    1
    जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by Turab Sayyad
    1
    Post by Turab Sayyad
    user_Turab Sayyad
    Turab Sayyad
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न. मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचा शुभारंभ. शहरातील चौका चौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने केले पालखी सोहळ्याचे स्वागत. दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने संपन्न झाला. दिवसभर पुण्यतिथी महोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर सायंकाळी साडे पाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने प्रारंभ झाला. प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब, सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूरचे उद्योजक राणा सुर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदूंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर, तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद, येथून आलेल्या वारकरी दिंडया, ढोल पथक, नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी यामुळे पालखी सोहळा रंगला होता. शहरातील चौका चौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या निमीत्ताने संपूर्ण मंदिरास नयनरम्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी व गुलाबपुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले. फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली. वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन शिरा प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. आज स्वामी पुण्यतिथी निमित्त आ.सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे आदीसह विविध मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते, त्यामुळे अक्कलकोट शहरातील रस्ते गर्दीमुळे फुलून गेले होते. यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रदीप झपके, विजय दास, नगरसेवक अविनाश मडीखांबे, महेश हिंडोळे, खाजप्पा झंपले, श्रीशैल गवंडी, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, राजेश नीलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील, रामचंद्र समाणे, शिवानंद स्वामी, प्रदीप हिंडोळे, पिंटू साठे, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, प्रा.शिवशरण अचलेर, संजय बडवे, शीवा जमगे, बाळासाहेब एकबोटे, दर्शन घाटगे, रमेश शिंदे सर, प्रसाद पाटील सर, अमर पाटील, अंजय फुटाणे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पाठक, गिरीश पवार, शशिकांत लिंबीतोटे, श्रीनाथ महामूरे, अक्षय सरदेशमुख, काशिनाथ गुरव, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, मंगेश फुटाणे, स्वामीनाथ लोणारी, संतोष पराणे, संजय पवार, प्रसाद सोनार, मोहन जाधव, प्रसाद पाटील, नितीन शिंदे, गणेश दिवाणजी, किरण किरात, योगेश पवार, संजय बडवे, रवी मलवे, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी, गोकुळ गवंडी, सुनील गवंडी, आदीत्य गवंडी, सुनिल पवार, बंडेराव घाटगे, लक्ष्मण घंटे, स्वामीराव मोरे, अशोक घंटे, प्रशांत गुरव, ज्योती जरीपटके, सुवर्णा जाधव इत्यादींसह देवस्थानचे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कर्मचारी व सेवेकरी आदींसह शहरातील व परगावाचे अनेक स्वामी भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. .
    1
    श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न.
मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचा शुभारंभ.
शहरातील चौका चौकात भाविकांनी  रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने केले पालखी सोहळ्याचे स्वागत.
दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने संपन्न झाला. दिवसभर पुण्यतिथी महोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर सायंकाळी साडे पाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने प्रारंभ झाला. प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब, सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूरचे उद्योजक राणा सुर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदूंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर, तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद, येथून आलेल्या वारकरी दिंडया, ढोल पथक, नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी  यामुळे पालखी सोहळा रंगला होता. शहरातील चौका चौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या निमीत्ताने संपूर्ण मंदिरास नयनरम्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 
पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी व गुलाबपुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले. फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली. वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन शिरा प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. आज स्वामी पुण्यतिथी निमित्त आ.सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन 
कल्याणशेट्टी, मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे आदीसह विविध मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते, त्यामुळे अक्कलकोट शहरातील रस्ते गर्दीमुळे फुलून गेले होते.
यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रदीप झपके, विजय दास, नगरसेवक अविनाश मडीखांबे, महेश हिंडोळे, खाजप्पा झंपले, श्रीशैल गवंडी, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, राजेश नीलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील, रामचंद्र समाणे, शिवानंद स्वामी, प्रदीप हिंडोळे, पिंटू साठे, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, प्रा.शिवशरण अचलेर, संजय बडवे, 
शीवा जमगे, बाळासाहेब एकबोटे,  दर्शन घाटगे, रमेश शिंदे सर, प्रसाद पाटील सर, अमर पाटील, अंजय फुटाणे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पाठक, गिरीश पवार, शशिकांत लिंबीतोटे, श्रीनाथ महामूरे, अक्षय सरदेशमुख, काशिनाथ गुरव, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, मंगेश फुटाणे, स्वामीनाथ लोणारी, संतोष पराणे, संजय पवार, प्रसाद सोनार, मोहन जाधव, प्रसाद पाटील, नितीन शिंदे, गणेश दिवाणजी, किरण किरात, योगेश पवार, संजय बडवे, रवी मलवे, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी, गोकुळ गवंडी, सुनील गवंडी, आदीत्य गवंडी, सुनिल पवार, बंडेराव घाटगे, लक्ष्मण घंटे, स्वामीराव मोरे, अशोक घंटे, प्रशांत गुरव, ज्योती जरीपटके, सुवर्णा जाधव इत्यादींसह देवस्थानचे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कर्मचारी व सेवेकरी आदींसह शहरातील व परगावाचे अनेक स्वामी भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Sanjhsuyog News Channel
    1
    Post by Sanjhsuyog News Channel
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    3 hrs ago
  • नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली
    1
    नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महासज मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवाची सांगता मुंबई येथील पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य ख्यातनाम गायक पंं.हेमंत पेंडसे यांच्या सुरेल स्वरपूजेने झाली. गायन सेवेच्या सुरुवातीला सर्व कलाकारांचा परिचय ओंकार पाठक यांनी करत वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट यांचे वतीने सर्व कलाकारांचा अध्यक्ष महेश मालक इंगळे यांचे शुभहस्ते कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर गायक पं.हेमंत पेंडसे यांच्या गायनाला सुरुवात झाली. सुरुवातीला हिंडोल रागातीला रागमाला गात उपस्थित श्रोत्यांना अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली. त्यानंतर सुंदर भक्ती रचना त्यामध्ये आधी रचिली पंढरी, अबीर गुलाल उधळीत रंग, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, रंगी रंगिली राधा, मन राम रंगी रंगले, सुखाचे जे सुख, आदी अजरामर रचना गात अक्कलकोट स्वामी भक्तांना स्वरांनी चिंब करत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या अजरामर भैरवीने गायन सेवेसह १४८ व्या श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवाची सांगता मोठ्या भक्तीभावात केली. त्यांना तितकीच सुंदर साथसंगत हार्मोनियमवर ओंकार पाठक, तबल्यावर नितीन दिवाकर, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे, टाळवर अक्षय सरदेशमुख स्वरसाथ यश‌ कोल्हापूरे, देशमुख यांनी केली. यावेळी वटवृक्ष देवस्थानचे प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, बाळासाहेब कुलकर्णी, दिपक जरीपटके, सुनिल पवार, सुरेश भोसले, रमेश शिंदे सर, अमर पाटील, प्रसाद पाटील सर, स्वामीनाथ लोणारी, प्रकाश कासेगांवकर, मनोज जाधव, सागर गोंडाळ, विपूल जाधव आदींसह कलासाधक व कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गायन सेवेचा आनंद लुटला. .
    1
    श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महासज मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवाची सांगता मुंबई येथील पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य ख्यातनाम गायक पंं.हेमंत पेंडसे यांच्या सुरेल स्वरपूजेने झाली. गायन सेवेच्या सुरुवातीला सर्व कलाकारांचा परिचय ओंकार पाठक यांनी करत वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट यांचे वतीने सर्व कलाकारांचा अध्यक्ष महेश मालक इंगळे यांचे शुभहस्ते कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर गायक पं.हेमंत पेंडसे यांच्या गायनाला सुरुवात झाली. सुरुवातीला हिंडोल रागातीला रागमाला गात उपस्थित श्रोत्यांना अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली. त्यानंतर सुंदर भक्ती रचना त्यामध्ये आधी रचिली पंढरी, अबीर गुलाल उधळीत रंग, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, रंगी रंगिली राधा, मन राम रंगी रंगले, सुखाचे जे सुख, आदी अजरामर रचना गात अक्कलकोट स्वामी भक्तांना स्वरांनी चिंब करत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या अजरामर भैरवीने गायन सेवेसह १४८ व्या श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवाची सांगता मोठ्या भक्तीभावात केली. त्यांना तितकीच सुंदर साथसंगत हार्मोनियमवर ओंकार पाठक, तबल्यावर नितीन दिवाकर, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे, टाळवर अक्षय सरदेशमुख स्वरसाथ यश‌ कोल्हापूरे, देशमुख यांनी केली. यावेळी वटवृक्ष देवस्थानचे प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, बाळासाहेब कुलकर्णी, दिपक जरीपटके, सुनिल पवार, सुरेश भोसले, रमेश शिंदे सर, अमर पाटील, प्रसाद पाटील सर, स्वामीनाथ लोणारी, प्रकाश कासेगांवकर, मनोज जाधव, सागर गोंडाळ, विपूल जाधव आदींसह
कलासाधक व कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गायन सेवेचा आनंद लुटला.
.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.