लातूर जिल्ह्यातील नीट परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर जिल्ह्यातील 'नीट' परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर (प्रतिनिधी): राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित 'नीट युजी' परीक्षा येत्या ३ मे, २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत लातूर जिल्ह्यातील लातूर आणि निलंगा तालुक्यातील एकूण ३४ उपकेंद्रांवर पार पडणार असून, या परीक्षा कालावधीत केंद्रांच्या परिसरात होणारी संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेवून जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित जमण्यास, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक ही माध्यमे ३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल किंवा इतर कोणत्याही प्रसार माध्यमांसह प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून, कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीला किंवा वाहनाला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, जेणेकरून परीक्षा अत्यंत शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडेल. हा आदेश परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी, निगराणी करणारे पथक आणि पोलीस अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयीन कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाही, मात्र इतर सर्व नागरिकांनी या प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

- लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.1
- महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Ramesh Mulgir1
- सर्व शक्तीपीठग्रस्त शेतकरी बांधवांना विनंती आपल्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना 1 मे रोजी त्यांना शक्तीपीठ रद्द करा या मागणीचे निवेदन द्यायचे आहे. त्याप्रमाणे नियोजन करावे व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हिंगोली शासकीय विश्रामगृहावर सकाळी 9 वाजता अगदी वेळेवर उपस्थित राहावे.1
- लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले. शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.1
- उष्णतेची लाट… आणि वानरांचा दिलासा देणारा संदेश! हिमायतनगरमध्ये तापमान 44-45°C पर्यंत पोहोचलंय माणसांसोबतच प्राणीही उष्णतेने हैराण झाले आहेत. श्री परमेश्वर मंदिर परिसरात वानरांचा एक गट लिंबाच्या झाडाखाली शांतपणे विसावा घेताना दिसला जणू तेच सांगत आहेत — “बाहेर ऊन खूप आहे… सावलीतच आराम करा!” हे सुंदर दृश्य रामभाऊ सूर्यवंशी यांनी टिपले असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदेश स्पष्ट आहे: स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि दुपारच्या उन्हापासून दूर रहा! #हिमायतनगर #HeatWave #SummerAlert #StaySafe #NatureMessage ViralPost MonkeyLife SaveYourself Climate NNLDigitalMedia1
- फ्रूट अक्कलकोट तालुक्यातील जेऊर फळांचे कीटक, रोग आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करताना दर्जाही टिकवून ठेवणाऱ्या फ्रूट कव्हर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जेऊर येथील शेतकरी राजा चौगुले यांनी आपल्या केशर आंबा बागेत केला आहे. प्रत्येक आंब्याला कागदी फ्रूट कव्हर लावल्याने त्यांच्या १२०० झाडांच्या सेंद्रिय बागेची विशेष चर्चा होत आहे. राजा चौगुले आणि रुक्मिणी चौगुले या दाम्पत्याने ऊस शेतीऐवजी दोन एकर क्षेत्रावर घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड केली. कोकणातून रोपे आणून आधुनिक पद्धतीने उभारलेली ही बाग आता पूर्ण बहरात आली आहे. या बागेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे झाडावरील प्रत्येक फळाला दोन पदरी कागदी फ्रूट कव्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे फळांवर डाग पडत नाहीत, नैसर्गिक कव्हरमुळे फळांवर डाग पडत नाहीत आणि फळांचा नैसर्गिक, उठावदार रंग विकसित होतो. फळे कव्हरमध्ये सुरक्षित असल्याने बाहेरील कीटकनाशकांची फवारणी कमी करावी लागते. त्यामुळे फळे विषमुक्त तयार होतात. घनदाट लागवडीमुळे उत्पादन थोडे कमी होते; मात्र वादळात कोणतेही नुकसान होत नाही.1