Shuru
Apke Nagar Ki App…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघाचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर हे सोमवार, १ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. विवेक नावंदर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विवेक नावंदर यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे, यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Abn news
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघाचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर हे सोमवार, १ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. विवेक नावंदर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विवेक नावंदर यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे, यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
More news from Maharashtra and nearby areas
- संबोधी अकादमीने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 110 जोडपी विवाहबद्ध झाली.1
- खासदार संजय जाधव यांनी आंतरवाली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे," अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी व्यक्त केली.1
- परभणी जिल्ह्यातील खळी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली.1
- मंठा तालुक्यात दि. २६ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केहाळ वडगाव परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गावातील एक वीज पोल कोसळला असून, शेतातील दोन ठिकाणी प्रत्येकी चार-चार वीज पोल मोडून पडल्याने विद्युत तारा तुटल्या आहेत. या घटनेला तब्बल पाच दिवस उलटूनही महावितरणकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत कठीण झाले आहे. विहिरी व बोअरवेलच्या मोटारी बंद पडल्याने अनेक शेतकऱ्यांना जनावरांना हाताने पाणी शेंदून पाजावे लागत आहे, ज्यामुळे पशुपालक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, गावात कोसळलेला वीज पोल रस्त्यावर आडवा पडल्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय, अनेक मीटरधारकांनी स्वतःच्या खर्चाने वायर खरेदी करून दूरवरून घरापर्यंत वीज जोडणी केल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या गोरगरीब नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडला आहे. पावसाळा तोंडावर आला असून लवकरच खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू होणार आहेत. पेरणी झाल्यानंतर शेतांमध्ये वीज पोल उभारणे व दुरुस्तीची कामे करणे अधिक अवघड होणार असल्याने, पाऊस व पेरणीपूर्वीच तातडीने नवीन पोल उभारून तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्यात आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केहाळ वडगाव येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महावितरणच्या या दिरंगाईमुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना व पशुपालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून ही समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.1
- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.1
- सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा एक भाग म्हणून संबोधी अकादमीचे अध्यक्ष डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांनी विवाह सोहळ्याच्या मंडपाची पाहणी केली.1
- परभणी जिल्ह्यातील मानवत येथे झालेल्या एका घटनेत, खाजगी ट्रॅव्हल्सच्या धडकेमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.1