logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संतवाङ्मयाच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संतवाङ्मयाच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव मुक्तेश्वर आश्रमात ‘संपूर्ण उपासना व भजन’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात: नागपूर : सोमलवाडा येथील श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमात प.पू. बाबा महाराज यांनी रचलेल्या दिव्य भजनांचा, संपूर्ण उपासना व भजन संहितेचा समावेश असलेल्या ‘संपूर्ण उपासना व भजन’ या आकर्षक पुस्तकाचे प्रकाशन भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. संतवाङ्मयाची अमूल्य परंपरा जपणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश एदलाबादकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुक्तेश्वर आश्रमाचे अध्यक्ष समीर खरे होते. विशेष अतिथी म्हणून नितीन तापस व अशोक तापस उपस्थित होते. राम गर्गे यांनी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. रेणुका करंदीकर यांनी केले. मार्गदर्शन करतांना प्रकाश एदलाबादकर यांनी सांगितले की, संतवाङ्मय हे समाजाला आध्यात्मिक मूल्यांशी जोडणारे प्रभावी माध्यम आहे. संतांनी रचलेले अभंग, गाथा, मनाचे श्लोक आणि इतर साहित्य हे केवळ भक्तीसाठी नसून संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरले आहे. या पुस्तकातील उपासना आणि भजने साधकांना आत्मशोध, आत्मजागृती आणि ईश्वरभक्तीचा सुंदर अनुभव देणारी असून त्यामधून आध्यात्मिक ऊर्जा व चैतन्याची अनुभूती मिळते, असे त्यांनी नमूद केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माची चेतना जागृत करण्यासाठी, साधनेची प्रेरणा देण्यासाठी आणि प्रत्येक साधकाला योग्य दिशा दाखविण्यासाठी हे पुस्तक प्रभावी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रकाशन सोहळ्यास आश्रमाचे पदाधिकारी, भाविक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत पुस्तक आध्यात्मिक साधनेसह समाजप्रबोधनासाठीही महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना व्यक्त केली. गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त केदार ‘गणेशसुत’ अभ्यंकर यांच्या ‘तुला पाहताना’ या भक्तिगीताचेही सादरीकरण करण्यात आले. गौरी सोमलवार, दीप्ती मुंजे, हृदया बडे, प्रचिती सहस्त्रबुद्धे, डॉ. अरुणा जगताप, भालचंद्र साठे, सतीश बल्लाळ यांनी गीत सादर केले. गोविंद गडीकर व विवेक लोहकरे यांनी साथसंगत केली, तर आभार अमित गोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव श्याम पोहनकर, विवेक प्रतापे, शशिकांत वाघमारे, शार्दूल महावादीवार, अमन लुंबा यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.

4 hrs ago
user_Pallavi Patil, निवासी संपादक
Pallavi Patil, निवासी संपादक
Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago
b56ef8e9-b393-42ef-855c-9f763189e11d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    1
    एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.....
तालुका प्रतिनिधी हिंगणा 
हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू 
उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की।
अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है।
उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी।
BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की।
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया
    1
    *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...*
शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही.
चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया.
चला, एकत्र काम करूया.
चला, भारतासाठी काम करूया
    user_Harshal kukadkar
    Harshal kukadkar
    Security Guard सावनेर, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तातडीची मदत, पंचनामा व सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, काटोल, जि. नागपूर. विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत व घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत विनंती. महोदय, मी, ज्ञानेश्वर धनराज जाधव, रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर, आपणास नम्र विनंती करतो की, आमचे घर लाकूड, माती व कौलांनी बांधलेले असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. अलीकडे आमच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली असून उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात आमच्या कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी मी घराच्या नुकसानीची छायाचित्रे सरपंच यांच्या मार्फत संबंधित तलाठी यांच्याकडे पाठविली होती. मात्र आजपर्यंत तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही, पंचनामा केलेला नाही आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तरीदेखील आजपर्यंत आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की : आमच्या घराचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा. शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. घरकुल योजनेसाठी आमच्या अर्जाची त्वरित पडताळणी करून पात्रतेनुसार लाभ मंजूर करण्यात यावा. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. आपण आमच्या अत्यंत गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती. आपला विश्वासू, ज्ञानेश्वर धनराज जाधव रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर मोबा. 8805377453
    2
    विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तातडीची मदत, पंचनामा व सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत
मा. तहसीलदार साहेब,
तहसील कार्यालय, काटोल, जि. नागपूर.
विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत व घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत विनंती.
महोदय,
मी, ज्ञानेश्वर धनराज जाधव, रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर, आपणास नम्र विनंती करतो की, आमचे घर लाकूड, माती व कौलांनी बांधलेले असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. अलीकडे आमच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली असून उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात आमच्या कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सुमारे एक महिन्यापूर्वी मी घराच्या नुकसानीची छायाचित्रे सरपंच यांच्या मार्फत संबंधित तलाठी यांच्याकडे पाठविली होती. मात्र आजपर्यंत तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही, पंचनामा केलेला नाही आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तरीदेखील आजपर्यंत आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही.
म्हणून आपणास नम्र विनंती आहे की :
आमच्या घराचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा.
शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी.
घरकुल योजनेसाठी आमच्या अर्जाची त्वरित पडताळणी करून पात्रतेनुसार लाभ मंजूर करण्यात यावा.
आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
आपण आमच्या अत्यंत गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
ज्ञानेश्वर धनराज जाधव
रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर
मोबा. 8805377453
    user_Dnyaneshwar Jadhav
    Dnyaneshwar Jadhav
    काटोल, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan
    2
    क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡
🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 

🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान  

✨ Heart Diseases
✨ Diabetes 
✨ Kidney Diseases
✨ Liver Diseases
✨ Lung(Asthma & TB)

📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से  
📞 Appointment Book करें: +91 9125734374
#DrMeherAbbas
#LiverFunctionTest
#LiverHealth
#FattyLiver&NAFLD
#Fibrousscan

@TopFan
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    19 hrs ago
  • अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    1
    अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली.
अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली.
आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे.
या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर गडचिरोली: (दि ३०) गडचिरोली–चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. तसेच दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर 
गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर 
गडचिरोली: (दि ३०) गडचिरोली–चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. तसेच दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आणि सिरोंचा परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.