पंचायत समिती अकोट अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ पं.स. अकोट अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ अकोट तालुका प्रतिनिधी.... देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक शासनाच्या पदावरील कारर्किदीला २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्य निर्देशानुसार "सेवा परमो धर्म" या उक्ती प्रमाणे सर्वसामान्या नागरिकांपर्यत सेवा पुरविण्याबाबत सेवासंकल्प पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी केला आहे.. यावेळी अभियानाचा शुभारंभ सेवा संकल्प करून, स्वच्छते बाबतची शपथ घेवुन कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी व पंचायत समिती मधील ईतर अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच गावपातळीवर ग्राम पंचायत लोहारी, येथे सदर अभियानाची सुरुवात सेवाज्योत, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी व मशालफेरी काढुन सुरुवात करण्यात आली आहे. सदर अभियान कालावधी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते १७ऑक्टोंबर २०२६ असून पहिला सप्ताह-सुशासन व नागरीक सेवा दुसरा सप्ताह- संस्था व सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण तिसरा सप्ताह-जलसमृध्द, स्वच्छ व हरित गांव उपक्रम तिसरा सप्ताह-जलसमृध्द, स्वच्छ व हरित गांव उपक्रम असा असून विविध विभागाच्या समन्वयातून एकूण २२ प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देऊन गरजेनुसार शिबीर सुद्धा आयोजीत करण्यात येतील. पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागानी ग्राम पंचायतीने सदर अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत चे आवाहन पंचायत समितीचा वतीने गटविकास अधिकारी यांनी केले आहे.
पंचायत समिती अकोट अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ पं.स. अकोट अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ अकोट तालुका प्रतिनिधी.... देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक शासनाच्या पदावरील कारर्किदीला २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्य निर्देशानुसार "सेवा परमो धर्म" या उक्ती प्रमाणे सर्वसामान्या नागरिकांपर्यत सेवा पुरविण्याबाबत सेवासंकल्प पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी केला आहे.. यावेळी अभियानाचा शुभारंभ सेवा संकल्प करून, स्वच्छते बाबतची शपथ घेवुन कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी व पंचायत समिती मधील ईतर अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच गावपातळीवर ग्राम पंचायत लोहारी, येथे सदर अभियानाची सुरुवात
सेवाज्योत, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी व मशालफेरी काढुन सुरुवात करण्यात आली आहे. सदर अभियान कालावधी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते १७ऑक्टोंबर २०२६ असून पहिला सप्ताह-सुशासन व नागरीक सेवा दुसरा सप्ताह- संस्था व सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण तिसरा सप्ताह-जलसमृध्द, स्वच्छ व हरित गांव उपक्रम तिसरा सप्ताह-जलसमृध्द, स्वच्छ व हरित गांव उपक्रम असा असून विविध विभागाच्या समन्वयातून एकूण २२ प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देऊन गरजेनुसार शिबीर सुद्धा आयोजीत करण्यात येतील. पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागानी ग्राम पंचायतीने सदर अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत चे आवाहन पंचायत समितीचा वतीने गटविकास अधिकारी यांनी केले आहे.
- बुलढाणा :-सापाच्या विषाने नव्हे, आरोग्य यंत्रणेच्या निर्दयी दुर्लक्षाने घेतला २ जीव! रस्ता नसल्याने ३ किमी झोळीतून प्रवास, रुग्णालयात लस मिळेना; २२ वर्षीय गर्भवती मातेचा बाळासह तडफडून मृत्यू, दोषींवर कारवाई कधी?*1
- देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन! सेनगाव/विश्वनाथ देशमुख तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.2
- दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा1
- इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.1
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.1
- चिखली:-धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत कवठळच्या महिलांची महादेवाला आर्त हाक; दीड महिन्यांचा दुष्काळ अन् विजेच्या लपंडावाने पिके करपली, तातडीने भरघोस मदतीची मागणी1
- पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.1
- पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.1