logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कुरखेडा हादरलं! सती नदीत बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी एक बचावला; राणी खेडेगावातील हृदयद्रावक घटना कुरखेडा हादरलं! सती नदीत बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी एक बचावला; राणी खेडेगावातील हृदयद्रावक घटना कुरखेडा (गडचिरोली) | चंद्रपूर नगरी प्रतिनिधी : कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आंघोळीसाठी सती नदीवर गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तब्बल तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर एका विद्यार्थ्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राणी खेडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी दुपारच्या सुमारास जवळच असलेल्या सती नदीत आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका विद्यार्थ्याला बचावण्यात यश आले असून त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. पोलिस व महसूल प्रशासनाकडूनही घटनेची माहिती घेतली जात असून मृत विद्यार्थ्यांची ओळख आणि दुर्घटनेचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राणी खेडेगाव परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला आहे. नदी, नाले आणि जलसाठ्यांमध्ये पावसाळ्यात पाण्याची पातळी व प्रवाह अचानक वाढत असल्याने पालकांनी आपल्या मुलांना अशा ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी

1 hr ago
user_Vainganga News Live Network
Vainganga News Live Network
Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
f1bf52fb-bf11-47aa-8b5a-377cf2926977

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले
    1
    वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा
वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम
माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते 
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न
    1
    अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    14 min ago
  • अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    1
    अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!
नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे.
या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    1
    साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    1
    NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,,
आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    1 hr ago
  • वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विकास भवनात समाधान शिबिर वर्धा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला भेट देत आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधला व महसूल विभागाच्या विविध सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात स्वामित्व सनद, जिवंत सातबारा, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभ, कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी आदी सेवांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निराकरण करून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले.
    1
    वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विकास भवनात समाधान शिबिर
वर्धा
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला भेट देत आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधला व महसूल विभागाच्या विविध सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात स्वामित्व सनद, जिवंत सातबारा, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभ, कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी आदी सेवांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निराकरण करून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
    1
    शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
    1
    देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी 
आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले.
या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.