Shuru
Apke Nagar Ki App…
कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील वाळलेला पिंपळवृक्ष तोडा : वादळामुळे वृक्ष पडून धोका होण्याचा संभव ब्रह्मपुरी : नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या बाजूला आणि कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील बोडेगाव रस्त्यालगत असलेला पिंपळवृक्ष कितीतरी दिवसांपासून सुकलेल्या अवस्थेत उभा आहे.इथून शाळेकरी मुलं,बोंडेगाव - कुर्झा वार्डातील नागरिक ये-जा करतात.एखाद्यावेळी हा वृक्ष कोलमडून जीवीतहानी होऊ शकते. नगर परिषदेने ही बाब लक्षात घेऊन पुढील धोका टाळण्यासाठी तात्काळ या मोठया वृक्षाला तोडून पुढील धोका टाळवा.सध्या पावसाचे दिवस सुरू असून ऐन रोडवर असलेला हा झाड केव्हाही पडू शकतो,त्याआधी हा पिंपळवृक्षाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.अनेकांच्या हे लक्षात येऊनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे,तरी तातडीने हा प्रश्न नगर पालिकेने निकाली काढावा.
Disha News
कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील वाळलेला पिंपळवृक्ष तोडा : वादळामुळे वृक्ष पडून धोका होण्याचा संभव ब्रह्मपुरी : नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या बाजूला आणि कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील बोडेगाव रस्त्यालगत असलेला पिंपळवृक्ष कितीतरी दिवसांपासून सुकलेल्या अवस्थेत उभा आहे.इथून शाळेकरी मुलं,बोंडेगाव - कुर्झा वार्डातील नागरिक ये-जा करतात.एखाद्यावेळी हा वृक्ष कोलमडून जीवीतहानी होऊ शकते. नगर परिषदेने ही बाब लक्षात घेऊन पुढील धोका टाळण्यासाठी तात्काळ या मोठया वृक्षाला तोडून पुढील धोका टाळवा.सध्या पावसाचे दिवस सुरू असून ऐन रोडवर असलेला हा झाड केव्हाही पडू शकतो,त्याआधी हा पिंपळवृक्षाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.अनेकांच्या हे लक्षात येऊनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे,तरी तातडीने हा प्रश्न नगर पालिकेने निकाली काढावा.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.1
- क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan2
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.1
- SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- मुसळधार पावसाने पिपरीचा संपर्क तुटला; नाल्याला पूर आल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ तासन्तास अडकले वर्धा ..हिंगणघाट काल दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्ध्याच्या गिरड–कोरा मार्गावरील पिपरी बसस्थानकाजवळील दोन नाल्यांना पूर आला. पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने पिपरी गावाकडे जाणारा मुख्य मार्ग अनेक तास बंद राहिला. परिणामी शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांना नाल्याच्या दोन्ही बाजूंना तासन्तास थांबावे लागले, तर काहींना शेजारच्या गावात मुक्काम करण्याची वेळ आली. पिपरी गावासाठी हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. नाल्यावरील पूर तीन ते चार तास कायम राहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. विशेषतः शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, तर ग्रामस्थांनाही दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उंच पुलाची उभारणी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरवर्षी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाने तातडीने पूल उभारणीस मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.1
- वाडा बिअर बार मध्ये जुगार खेळतां ना सात आरोपीवर कारवाई , शहरात एकच खळबळ ८ कक्ष ५६ हजार ५० हजारचा मुद्देमाल जप्त उमरेड । भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २ किमी अंतरावर असलेल्या भिवापूर - उमरेड महामार्गवर असलेला वाडा बार मधील एका खोलीत जुगार खेळत असतांना ७ जणांवर कारवाई करीत ८ लक्ष ५६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला. सदरच्या कारवाई मुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. दि. ३० जुलै सायंकाळच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर वाडा बार येथे एका बंदिस्त जागेत सात व्यक्ति पैशाची बाजी लावून हारजीत जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय किशोर सिंग ठाकूर यांनी केली आहे.सदरच्या कारवाई मध्ये आरोपीकडून ४४ ६०० रूपये नगदी, मोबाईल हन्डसेट ९ नग २,६५, ००० रुपये , दुचाकी वाहने १,४५, ००० रुपये, चारचाकी वाहन ४,००, ००० रुपये असा सर्व मिळून एकूण ८, ५६, ०५० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.1