logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पोलीस स्टेशन उमरखेड हददीत अवैध पिवळी रेती वाहतुक करणा-या डुग्गा जप्त करुन चालक यांच्यावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 26/08/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपविभागात उमरखेड हददीत ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी रवाना झाले. पोलीस स्टेशन उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, उमरखेड ते ढाणकी रोडने डुग्गा (टिपर) व्दारे अवैध विनारॉयल्टी चोराटी पिवळी रेती वाहतुक होत आहे अशी माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे हरदडा फाटा रोडवर सापळा लावला असता एक डुग्गा अवैध विना परवाना पिवळी रेती वाहतुक करुन नेत असतांना मिळून आल्याने डुग्गा (टिपर) क्रमांक MH-04-EL-5753 व त्यामधील पिवळी रेती असा एकूण 4,05,000/- रु मुददेमाल जप्त करुन इसम नामे 1) सय्यद शाहीद सय्यद वहीद वय 20 वर्षे, रा.वार्ड क्रमांक 15 ढाणकी ता.उमरखेड जि. यवतमाळ यांस डुग्गा टॅक्टरसह ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे कलम 303(2) भान्यास सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (8), अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ / मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

2 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
2 hrs ago
092b07c1-1305-4d88-b367-138adfe529c7

पोलीस स्टेशन उमरखेड हददीत अवैध पिवळी रेती वाहतुक करणा-या डुग्गा जप्त करुन चालक यांच्यावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 26/08/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपविभागात उमरखेड हददीत ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी रवाना झाले. पोलीस स्टेशन उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, उमरखेड ते ढाणकी रोडने डुग्गा (टिपर) व्दारे अवैध विनारॉयल्टी चोराटी पिवळी रेती वाहतुक होत आहे अशी माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे हरदडा फाटा रोडवर सापळा लावला असता एक डुग्गा अवैध विना परवाना पिवळी रेती वाहतुक करुन नेत असतांना मिळून आल्याने डुग्गा (टिपर) क्रमांक MH-04-EL-5753 व त्यामधील पिवळी रेती असा एकूण 4,05,000/- रु मुददेमाल जप्त करुन इसम नामे 1) सय्यद शाहीद सय्यद वहीद वय 20 वर्षे, रा.वार्ड क्रमांक 15 ढाणकी ता.उमरखेड जि. यवतमाळ यांस डुग्गा टॅक्टरसह ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे कलम 303(2) भान्यास सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (8), अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ / मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .
    1
    नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती
    1
    जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    1
    वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.
शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले.
यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    1 hr ago
  • 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    1
    🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा
📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे.
📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा.
☎️ 02462-235077
☎️ 1077 — टोल फ्री
माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा.
⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    15 hrs ago
  • [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न ​नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ​या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ​समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो
    1
    [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
​नांदेड:
लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
​या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
​समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
[26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी  उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    1
    बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय  म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील
हृदया दीपक शेठ पाटील  हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    user_Vishnu shirame
    Vishnu shirame
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • *ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मुजीब भाई मित्र मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम* नांदेड शहरातील ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शहरात ईद-ए-मिलादचा उत्साह दिसून येत होता. शहरातील मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मुजीब भाई मित्र मंडळाने शहरातील मुख्य चौकात सेवा उपक्रमाला सुरुवात केली. मानवतेचा संदेश देण्यासाठी मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने पाणी बॉटल, बुंदीचे लाडू आणि पार्ले बिस्किटाचे वाटप करण्यात आले. उन्हाची तमा न बाळगता आलेल्या प्रत्येक भाविकाला थंड पाण्याची बॉटल आणि प्रसाद म्हणून बुंदी लाडू देण्यात आला, तर लहान मुलांना आवडीने पार्ले बिस्कीट वाटण्यात आले. मुजीब भाई आणि त्यांच्या सर्व मित्रांनी दिवसभर स्वतः उभे राहून हे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शांततेत आणि सेवाभावाने सण साजरा करून मुजीब भाई मित्र मंडळाने पैगंबर साहेबांच्या शिकवणीचा आदर्श जपला आहे.
    1
    *ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मुजीब भाई मित्र मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम*

नांदेड शहरातील ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळपासूनच शहरात ईद-ए-मिलादचा उत्साह दिसून येत होता. शहरातील मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मुजीब भाई मित्र मंडळाने शहरातील मुख्य चौकात सेवा उपक्रमाला सुरुवात केली. मानवतेचा संदेश देण्यासाठी मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले.

यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने पाणी बॉटल, बुंदीचे लाडू आणि पार्ले बिस्किटाचे वाटप करण्यात आले. उन्हाची तमा न बाळगता आलेल्या प्रत्येक भाविकाला थंड पाण्याची बॉटल आणि प्रसाद म्हणून बुंदी लाडू देण्यात आला, तर लहान मुलांना आवडीने पार्ले बिस्कीट वाटण्यात आले. 

मुजीब भाई आणि त्यांच्या सर्व मित्रांनी दिवसभर स्वतः उभे राहून हे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शांततेत आणि सेवाभावाने सण साजरा करून मुजीब भाई मित्र मंडळाने पैगंबर साहेबांच्या शिकवणीचा आदर्श जपला आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.