logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालिका आयुक्तांनी घेतली गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण मोहिमेची आढावा बैठक! नांदेड: प्रतिनिधी मोहम्मद रफीख नांदेड, दि.१० :- गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) रोखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेसाठी महानगरपालिका *आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १०.०३.२०२६ रोजी पालिका मुख्यालयात टास्कफोर्स कमिटीची बैठक घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील किशोरवयीन मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बैठकीत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी आरोग्य केंद्र आणि शाळांमध्ये या लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे सर्व लाभार्थी मुलींची नोंदणी केंद्र सरकारच्या 'यू-विन' (U-WIN) पोर्टलवर डिजिटल पद्धतीने केली जाणार असून पालकांमध्ये या लसीबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांची मदत घेण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. ही लस महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विनामूल्य उपलब्ध असणार आहे. भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगा पैकी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा दुसारा क्रमांक लागतो.हा आजारा रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंधात्मक 'एचपीव्ही' (HPV) लस देणे अत्यंत आवश्यक असून ही लस प्रामुख्याने १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी (ज्या मुलींनी १४ वर्षे पूर्ण केली आहेत पण १५ पूर्ण नाहीत) मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. 'गार्डासिल-४' (Gardasil-4) ही लस या मोहिमेत वापरली जात आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार असून, योग्य वयात (९ ते १४/१५ वर्षे) लस घेतल्यास तो टाळता येतो. या मोहिमेसाठी पालकांची संमती अनिवार्य असून, लसीकरणानंतर लाभार्थ्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर शाईने खूण केली जाणार आहे. या आढावा बैठकिस अतिरिक्त आयुक्त निलेश सुनकेवार, उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, उपवैद्यकिय आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ.बालाप्रसाद कुंटुरकर, डॉ.सुप्रिया पंडीत, डॉ.मो.बदीयोद्यीन,डॉ.कल्याण पवार, डॉ.काझीम, शहर कार्यक्रम व्यवस्थापक सुहास सोनुले, बालाजी चव्हाण, आयएमएचे अध्यक्ष, डॉ.प्रल्हाद कोटकर, फॉक्सीचे डॉ.मिनल पाटील, लायन्यस कल्बचे अध्यक्ष विश्वजीत राठोड, सचिव प्रविण अग्रवाल तसेच महिला व बालकल्याण विकास विभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या लसिकरण मोहिमेचा शहरातील १४ वर्षे पूर्ण केलेल्या मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.

on 10 March
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer Nanded, Maharashtra•
on 10 March
9b22d233-2689-4728-a6b3-677deee2592b

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews
    1
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष!
हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
#DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    user_सारथी महाराष्ट्र न्यूज
    सारथी महाराष्ट्र न्यूज
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
    5
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. “परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
“परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मराठी शाळा वाचवा! शिक्षक सेनेचे ढोलबजाव आंदोलन
    1
    मराठी शाळा वाचवा! शिक्षक सेनेचे ढोलबजाव आंदोलन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    1
    🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩
हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या!
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.