गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलाणी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आह
गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलाणी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी
बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आह
- Somnath Ahireबार्शी, सोलापूर, महाराष्ट्र🙏on 11 January
- कर वसुलीत महापालिकेची धडाकेबाज कामगिरी एका दिवसात ४ कोटींचा रेकॉर्ड; लातूर महापालिकेची ७५ कोटींची ऐतिहासिक झेप...! व्यापाऱ्यांनी कर भरूना, सहकार्याचे आवाहन. शूरू ॲप, मराठी न्यूज. बुधवार दि. 01 एप्रिल 2026. लातूर महानगरपालिकेकडून एका दिवसात तब्बल ४ कोटी रुपयांचा कर संकलन करण्यात आला असून, एकूण वसुलीचा आकडा ७५ कोटींहून अधिक पार करण्यात यश आले आहे. या यशामागे महापालिकेचे कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी घेतलेली अथक मेहनत कारणीभूत ठरली असल्याचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाने ठेवलेले कर वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून, आगामी काळातही कर वसुलीची मोहीम अधिक गतीने सुरू ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शहरातील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि अनावश्यक कारवाई टाळावी, असे आवाहनही उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले.1
- घनसावंगी - हनुमान जयंतीनिमित्त भव्य कुस्ती दंगल ! हनुमान जयंतीनिमित्त घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.1
- महिला व बालकल्याण समिती सभापतीपती ऐश्वर्या अजय चव्हाण तर समाज कल्याण सभापतीपदी पार्वती मुंढे बिनविरोध1
- मंठा : शहरात कोयता गँगने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीनंतर मंठा पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत ३ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई विशेष पथकाने करून आरोपींना काल रात्री जालना येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली असून ती मंठा पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना अटक केल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत असून इतर आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.1
- जालन्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाउद्दीन यांनी आज आपल्या असंख्य मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. सलाउद्दीन यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे1
- विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.1
- अनोख्या परंपरेने हनुमान जयंती उत्सव १०० वर्षांची परंपरा, सर्वधर्म समभावाचा सुंदर संगम! जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथे हनुमान जयंती एक आगळी-वेगळी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा जपत साजरी केली जाते. तब्बल १०० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम आहे. हनुमान जयंतीनिमित्त गावातील प्रत्येक घरातून ‘शिदा’ गोळा करण्याची अनोखी प्रथा येथे पाहायला मिळते. हरभरा, डाळी, भाजीपाला, मसाले अशा विविध साहित्याचा संग्रह करून संध्याकाळी मारोती मंदिरात मोठ्या प्रमाणावर चविष्ट भाजी तयार केली जाते. यानंतर ग्रामस्थ आपल्या घरातून आणलेल्या भाकऱ्यांसह मंदिरात एकत्र बसून महाप्रसादाचा आनंद घेतात. विविध घरांमधून आलेल्या साहित्यामुळे या भाजीची चवही खास आणि आगळीवेगळी लागते, ज्याची सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. या परंपरेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्म समभाव. धर्म, जात, वय किंवा आर्थिक स्थिती याचा कोणताही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सहकार्याची भावना दृढ करणारा ठरतो. बानेगावची ही परंपरा आजच्या काळातही सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरत असून इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.1
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली1
- आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1