पंढरपूर सिंहगडच्या १६ विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंगमध्ये निवड* *कॅम्पस प्लेसमेंटमधून वार्षिक ४ लाख पॅकेजची नोकरी* *पंढरपूर सिंहगडच्या १६ विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंगमध्ये निवड* *कॅम्पस प्लेसमेंटमधून वार्षिक ४ लाख पॅकेजची नोकरी* पंढरपूर : प्रतिनिधी — पंढरपूर कोर्टी येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या १६ विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंग, पुणे या नामांकित कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गीतांजली विक्रांत सोनवणे (म्हसवड, ता. माण), रोहित बाळासो खपाले (रोपळे, ता. पंढरपूर), गायत्री बापूराव फुले (चुंडेश्वरवाडी, ता. माळशिरस), शुभम बाळासाहेब जोशी (भाळवणी, ता. पंढरपूर), चेतन लक्ष्मण मासाळ (नंदेश्वर, ता. मंगळवेढा), संतोष मल्लिकार्जुन कोळी (हिंगणी-घाटणे), उदय राजेंद्र कांबळे (फुलचिंचोली, ता. पंढरपूर), आकांक्षा संदीप घोलप (विगडी, ता. कराड), संदेश सुनील सुडके (महमदाबाद-शेटफळ, ता. मंगळवेढा), वैष्णवी राहुल जगताप (सांगोला), श्वेताली संभाजी कोंडुभैरी (मंगळवेढा), सुयश मनोहर घोडके (आंबे, ता. पंढरपूर), सुशांक सुरेश राऊत (सांगोला), ओंकार संभाजी बागल (गादेगाव, ता. पंढरपूर), वैष्णवी धनंजय पाटील (पिंपळनेर, ता. माढा) आणि गीतांजली जगन्नाथ देशमुख (झेंडे गल्ली, पंढरपूर) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंग, पुणे या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. एचव्हायटी इंजिनिअरिंग ही पुणे येथील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनी असून कंपनीची स्थापना १९८९ मध्ये झाली आहे. कंपनीचे मुख्यालय चिंचवड, पुणे येथे आहे. रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रासाठी अत्याधुनिक मशिनरी, ट्रंकी प्रकल्प तसेच देखभाल व अभियांत्रिकी उपाययोजना पुरविण्याचे काम कंपनी करते. भारतीय रेल्वे व मेट्रो प्रकल्पांसाठी विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीच्या निर्मितीत कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पंढरपूर सिंहगडच्या १६ विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंगमध्ये निवड* *कॅम्पस प्लेसमेंटमधून वार्षिक ४ लाख पॅकेजची नोकरी* *पंढरपूर सिंहगडच्या १६ विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंगमध्ये निवड* *कॅम्पस प्लेसमेंटमधून वार्षिक ४ लाख पॅकेजची नोकरी* पंढरपूर : प्रतिनिधी — पंढरपूर कोर्टी येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या १६ विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंग, पुणे या नामांकित कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गीतांजली विक्रांत सोनवणे (म्हसवड, ता. माण), रोहित बाळासो खपाले (रोपळे, ता. पंढरपूर), गायत्री बापूराव फुले (चुंडेश्वरवाडी, ता. माळशिरस), शुभम बाळासाहेब जोशी (भाळवणी, ता. पंढरपूर), चेतन लक्ष्मण मासाळ (नंदेश्वर, ता. मंगळवेढा), संतोष मल्लिकार्जुन कोळी (हिंगणी-घाटणे), उदय राजेंद्र कांबळे (फुलचिंचोली, ता. पंढरपूर), आकांक्षा संदीप घोलप (विगडी, ता. कराड), संदेश सुनील सुडके (महमदाबाद-शेटफळ, ता. मंगळवेढा), वैष्णवी राहुल जगताप (सांगोला), श्वेताली संभाजी कोंडुभैरी (मंगळवेढा), सुयश मनोहर घोडके (आंबे, ता. पंढरपूर), सुशांक सुरेश राऊत (सांगोला), ओंकार संभाजी बागल (गादेगाव, ता. पंढरपूर), वैष्णवी धनंजय पाटील (पिंपळनेर, ता. माढा) आणि गीतांजली जगन्नाथ देशमुख (झेंडे गल्ली, पंढरपूर) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची एचव्हायटी इंजिनिअरिंग, पुणे या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. एचव्हायटी इंजिनिअरिंग ही पुणे येथील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनी असून कंपनीची स्थापना १९८९ मध्ये झाली आहे. कंपनीचे मुख्यालय चिंचवड, पुणे येथे आहे. रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रासाठी अत्याधुनिक मशिनरी, ट्रंकी प्रकल्प तसेच देखभाल व अभियांत्रिकी उपाययोजना पुरविण्याचे काम कंपनी करते. भारतीय रेल्वे व मेट्रो प्रकल्पांसाठी विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीच्या निर्मितीत कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न! 🚩 वर्धापन दिन सोहळा २०२६! 🚩 राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती! 🔹 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ 🔹 वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता 🔹 स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (महात्मा फुले वाडा जवळ), पुणे. चला, एकत्र येऊया आणि पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देऊया! तुमच्या उपस्थितीची आणि शुभेच्छांची आम्हाला प्रतीक्षा राहील. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य1
- बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन1
- शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिवसेना नेते तथा अक्कलकोट तालुक्याचे दानशूर नेतृत्व मा. शंकर (मालक) म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुबारक कोरबू, आझम शेख, जी. अशपाक मुजावर, मजीद कोरबू आदी उपस्थित होते.1
- निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.1
- मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. *प्रमुख मागण्या:* 1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात. 2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी. 3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत. 4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत. 6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा. 7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात . 8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा. 9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.1
- *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे* बीड दि. २१ (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी व औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे यांनी १५ आॅगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती . आज आंदोलनाचा 7 वा दिवस सुरू झाला तरी त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच होते, जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आज ते टोकाची भूमिका घेतील असा इशारा संघटनेच्या वतीने दिला होता. त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र दिल्यामुळे सलग सात दिवस सुरू असलेले अन्नत्याग उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्थ कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ आजतागायत मिळत नाही तो मिळावा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रक / आदेश निर्गमित केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर ७ व्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्याला यश मिळाले.वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्य अभियंता यांनी दि . २४ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त बैठक आयोजित केली , तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना येत्या १५ दिवसात त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी लेखी पत्र देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. नगरपरिषद बीड च्या सफाईची निविदा काढून कामगारांना लवकरच कामावर रुजू करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी दिल्यामुळे सलग ७ दिवस सुरू असलेले भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल सहायक शिवाजी पाटील यांनी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पतंगे यांना लिंबू सरबत दिले तर जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे प्रतिनिधी सुधाकर नागरगोजे, किशोर डमाले यांनी रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड तथा सफाई कामगारांचे प्रतिनिधी यांना जलपान देऊन अन्नत्याग उपोषणाची सांगता केली, सदरील आंदोलनास भारतीय दलित पँथर चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे सर, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी पाठिंबा दिला होता. अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.1
- लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर लातूर शहर वाहतूक शाखेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. काल राबवलेल्या विशेष मोहिमेत अशा 7 बुलेटस्वारांवर दंडात्मक कार्यवाही करत ७,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. काही वाहनचालक आपल्या बुलेटमध्ये बेकायदेशीरपणे फटाका सायलेन्सर बसवून शहरातून वावरत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या कर्णकर्कश आणि अवाजवी आवाजामुळे लहान मुले, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली. नॉईज लेव्हल मीटरने होणार तपासणी: येत्या दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. वाहनांच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी 'नॉईज लेव्हल मीटर'चा वापर करून थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या दुचाकीस्वारांनी नियमबाह्य सायलेन्सर बसवले आहेत, त्यांनी ते तात्काळ काढून कंपनीचे अधिकृत सायलेन्सर लावावेत, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाचे आवाहन: "वाहनाचा कर्णकर्कश आवाज ही स्टाईल नसून, तो इतरांच्या त्रासाचे कारण ठरतो. सायलेन्सरचा गैरवापर करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे."3
- दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — ५ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवर इचलकरंजी पोलिसांची अरेरावी? खाकीच्या दादागिरीवर संताप! इचलकरंजीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत कथितरित्या झालेल्या ‘घाणेरड्या स्पर्शा’च्या गंभीर प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा, यासाठी आई पोलीस ठाण्यात धाव घेते; मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून कथितरित्या “आम्ही दखल घेणार नाही, कोर्टात जा” असे सांगण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या सुरक्षेचा आणि लैंगिक अत्याचाराच्या संशयाचा प्रश्न असताना, तक्रारदार महिलेची व्यथा ऐकून घेणे आणि कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करणे अपेक्षित असताना तिला थेट न्यायालयाचा मार्ग दाखवण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे. POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज असते. अशा संवेदनशील प्रकरणात पीडित बालक आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर पोलीस अधिकाऱ्याकडून अरेरावी झाली असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते. आई आपल्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर केवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीची सुरक्षितता आणि न्याय असतो. अशा वेळी खाकी वर्दीकडून तिला धीर, कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षणाची अपेक्षा असते. मात्र, तक्रारच ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप खरा असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्याने नेमके काय म्हटले, तक्रार घेण्यास नकार देण्यात आला का, घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया का सुरू झाली नाही आणि पीडित बालिकेच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलण्यात आली, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होईल; मात्र तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्या भूमिकेचीही चौकशी झालीच पाहिजे. बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा अरेरावी खपवून घेतली जाऊ नये. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी! विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चिमुकलीच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मदत मिळवून द्यावी. पाच वर्षांच्या लेकराच्या न्यायाचा प्रश्न आहे. हा प्रश्न दाबण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा आहे! खाकीचा मान राखायचा असेल तर आधी खाकीवरचा विश्वास कायम ठेवावा लागेल. #IchalkaranjiPolice #KolhapurPolice #JusticeForChild #POCSO #PoliceAccountability #KolhapurSP #IGPKolhapur #MaharashtraPolice #JusticeForVictim #ChildSafety1