logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांच्या तिसऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – दि. १४ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे कारी अब्दुल्ला खान मार्कोनी लिखित "तोहफतुल हदीस" या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सकाळी १०:०० वाजता सुरू होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शेख-उल-हदीस हज़रत मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मखदूम फारुक़ी भूषवणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मौलाना डॉ. सदरुलहसन नदवी मदनी, मौलाना डॉ. अब्दुल रशीद नदवी मदनी, आर्किटेक्ट अरशद अहमद, मेजर सैय्यदा फरासत तसेच डॉ. शाझिया नहरी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय डॉ. अनवरुल्ला क़ादरी, सय्यद शाहिद हमीद, डॉ. इक़बाल मिन्ने आणि डॉ. अझहर सिद्दीक़ी यांसारखे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. औरंगाबादसह विविध शहरांमध्ये कुरआनचे भाषांतर शिकवणाऱ्या "इल्मुल कुरआन व हदीस अकॅडमी" चे प्रमुख क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांनी कुरआनसोबत हदीस शिक्षणाला देखील प्राधान्य दिले आहे. परलोकातील यशासाठी कुरआन आणि हदीस या दोन्हींचे ज्ञान आवश्यक असल्याचे ते मानतात. या विचारातून "तोहफतुल हदीस" हे पुस्तक तयार करण्यात आले असून, समाजात मानवता, परस्पर सहानुभूती, शांतता, योग्य आचार-विचार, इबादत, शेजाऱ्यांचे हक्क, मत्सर व गैरसमज दूर करणे तसेच हलाल-हराम याबाबत योग्य मार्गदर्शन करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. समाजात बंधुभाव वाढवणे आणि देशाच्या प्रगतीत सकारात्मक योगदान देणे, या हेतूने हे पुस्तक लिहिण्यात आले असल्याचे लेखकांनी स्पष्ट केले आहे

on 13 April
user_देविदास कोळेकर
देविदास कोळेकर
पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
on 13 April
6db34450-f212-4bd8-9315-d26321a2ea27

कारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांच्या तिसऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – दि. १४ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे कारी अब्दुल्ला खान मार्कोनी लिखित "तोहफतुल हदीस" या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सकाळी १०:०० वाजता सुरू होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शेख-उल-हदीस हज़रत मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मखदूम फारुक़ी भूषवणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मौलाना डॉ. सदरुलहसन नदवी मदनी, मौलाना डॉ. अब्दुल रशीद नदवी मदनी, आर्किटेक्ट अरशद अहमद, मेजर सैय्यदा फरासत तसेच डॉ. शाझिया नहरी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय डॉ. अनवरुल्ला क़ादरी, सय्यद शाहिद हमीद, डॉ. इक़बाल मिन्ने आणि डॉ. अझहर सिद्दीक़ी यांसारखे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. औरंगाबादसह विविध शहरांमध्ये कुरआनचे भाषांतर शिकवणाऱ्या "इल्मुल कुरआन व हदीस अकॅडमी" चे प्रमुख क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांनी कुरआनसोबत हदीस शिक्षणाला देखील प्राधान्य दिले आहे. परलोकातील यशासाठी कुरआन आणि हदीस या दोन्हींचे ज्ञान आवश्यक असल्याचे ते मानतात. या विचारातून "तोहफतुल हदीस" हे पुस्तक तयार करण्यात आले असून, समाजात मानवता, परस्पर सहानुभूती, शांतता, योग्य आचार-विचार, इबादत, शेजाऱ्यांचे हक्क, मत्सर व गैरसमज दूर करणे तसेच हलाल-हराम याबाबत योग्य मार्गदर्शन करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. समाजात बंधुभाव वाढवणे आणि देशाच्या प्रगतीत सकारात्मक योगदान देणे, या हेतूने हे पुस्तक लिहिण्यात आले असल्याचे लेखकांनी स्पष्ट केले आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Anis qureshi sillod
    1
    Post by Anis qureshi sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • वाघरुळ शिवारात घटना; छोटा हत्ती दोन पलट्या मारून उलटला, बोलेरो थेट हॉटेलमध्ये घुसली; चालक नशेत असल्याचा आरोप जालना–देऊळगाव राजा मार्गावरील वाघरुळ शिवारात आज भीषण अपघात घडला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
    1
    वाघरुळ शिवारात घटना; छोटा हत्ती दोन पलट्या मारून उलटला, बोलेरो थेट हॉटेलमध्ये घुसली; चालक नशेत असल्याचा आरोप
जालना–देऊळगाव राजा मार्गावरील वाघरुळ शिवारात आज भीषण अपघात घडला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
    user_जालना आंदोलन
    जालना आंदोलन
    मुख्य संपादक - जालना आंदोलन जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जालना जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू
    1
    जालना जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    1
    मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    user_अरबाज शेख.सावरगाव कर
    अरबाज शेख.सावरगाव कर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    16 hrs ago
  • जालना महानगरपालिका चे सोचतावर दुर लक्ष वाड क्रमांक 10 वर दीड महिना झाला आहे चेंबर काढून आजुन पण कोणी कचरा उचलला नाही आले वारंवार तक्रार करूनही या वर कोणी या कोणत्याही कर्मचारी यांनी लक्ष नाही दिले यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो सोचता वीभागाला व जेष्ठ अधिकारी यांना विनंती करतो एक नागरिक म्हणून प्रशासनाने या गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी करतोय मी एक नागरिक म्हणून 🙏🇮🇳 जय हिंन्द जय भारत जय महाराष्ट्र 🙏🙏....
    1
    जालना महानगरपालिका चे सोचतावर दुर लक्ष वाड क्रमांक 10 वर दीड महिना झाला आहे चेंबर काढून आजुन पण कोणी कचरा उचलला नाही आले वारंवार तक्रार करूनही या वर कोणी या कोणत्याही कर्मचारी यांनी लक्ष नाही दिले यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो सोचता वीभागाला व जेष्ठ अधिकारी यांना विनंती करतो एक नागरिक म्हणून प्रशासनाने या गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी करतोय मी एक नागरिक म्हणून 🙏🇮🇳 जय हिंन्द जय भारत जय महाराष्ट्र 🙏🙏....
    user_संभाजी कीसन राव नागे पाटील
    संभाजी कीसन राव नागे पाटील
    Engraver जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जालन्यात बौद्ध जयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामुहिक वाचन प्रतिनिधी जालना . जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे दिनांक 1 मे 2026 रोजी बौद्ध जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी एम .व्ही चौधरी, सिध्दार्थ इंगळे, विलास दाभाडे,मैनाबाई खंडागळे आदीं प्रमुख उपस्थित होते .यावेळी उपासक शेषराव रनविर, किरण इंगळे,वामनराव दांडगे, साहेबराव साळवे, सिध्दार्थ पाईकराव,भुपेश पारधे, भाऊसाहेब दिवेकर,किरण कोळे, प्रशांत खंडागळे,येतेस सुकधाने, युवराज रनविर, किरण साळवे यांच्यासह महिलांचा मोठा सहभाग होता कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सुरेश सुकधाने यांनी मानले.
    2
    जालन्यात बौद्ध जयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामुहिक वाचन
प्रतिनिधी जालना 
.                                    जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे दिनांक 1 मे 2026 रोजी बौद्ध जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी एम .व्ही चौधरी, सिध्दार्थ इंगळे, विलास दाभाडे,मैनाबाई खंडागळे आदीं प्रमुख उपस्थित होते .यावेळी उपासक शेषराव रनविर, किरण इंगळे,वामनराव दांडगे, साहेबराव साळवे, सिध्दार्थ पाईकराव,भुपेश पारधे, भाऊसाहेब दिवेकर,किरण कोळे, प्रशांत खंडागळे,येतेस सुकधाने, युवराज रनविर, किरण साळवे यांच्यासह महिलांचा मोठा सहभाग होता कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सुरेश सुकधाने यांनी मानले.
    user_Sudarshan Raut
    Sudarshan Raut
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Anis qureshi sillod
    1
    Post by Anis qureshi sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बातमी: परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती. साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
    1
    जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बातमी:
परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती.
साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता.
सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
    user_जालना आंदोलन
    जालना आंदोलन
    मुख्य संपादक - जालना आंदोलन जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.