Kolhapur: ट्रक-एसटी बसची समोरासमोर भीषण धडक, बसचालक जागीच ठार; सहा जण जखमी चंदगड : ट्रक व एसटी बसची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत बसचालक जागीच ठार झाला. लक्ष्मण पांडुरंग हळदणकर (वय ४८, ... Kolhapur: ट्रक-एसटी बसची समोरासमोर भीषण धडक, बसचालक जागीच ठार; सहा जण जखमी चंदगड : ट्रक व एसटी बसची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत बसचालक जागीच ठार झाला. लक्ष्मण पांडुरंग हळदणकर (वय ४८, रा. चंदगड) असे मृत चालकाचे नाव आहे. तर, ट्रक चालकासह बसमधील वाहकासह सहाजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आज, मंगळवारी दुपारी बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर सुपे फाट्याजवळ झाला. अधिक माहिती अशी की, आज, मंगळवारी दुपारी चंदगड आगाराची (एमएच १४, बीटी १५४१) या क्रमांकाची बस बेळगावला जात असताना सुपे फाट्याजवळील एका वळणावर (केए २५, एबी ९७७५) या क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बसला जोराची धडक दिली. यामध्ये बसचालक जागीच ठार झाला. त्याच्या मागील सीटवर बसलेले पॅसेंजरंही जखमी झाले असून वाहक सुरेश मरणहोळकर (रा. घुल्लेवाडी) ट्रक चालक ही जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून चंदगड ग्रामीण रुग्णालय व बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर अपघात मधोमधच झाल्याने दोन्ही वाहने एकमेकात अडकल्याने रस्ता ब्लॉक झाला होता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस उपनिरीक्षक अरुण ढोंबे, पोलिस हवालदार अमोल पाटील, नितीन पाटील यांनी जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. अपघाताची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे तत्काळ मदतकार्य अपघाताची भीषणता ओळखून तपासणी नाक्यावरील कर्मचारी अमोल देसाई, राहूल जांबोटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय मदतीची वाट न बघता तत्काळ मदतकार्य राबवत जखमींना रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी पाठवले. त्यामुळे जखमींवर वेळेत उपचार सुरू झाले.

- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- kondhwa budruk kya hal banaa Rakha hai4
- पुण्यातील बाबासाहेबांचे महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले हे दुसरे घर... मावळ पुणे :- पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आपण पाहिलंय का..? सन १९४९ ते १९५६ च्या काळात ७ वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं जाणकार सांगतात. तळेगाव चाकण रोडवर असलेल्या हरणेश्र्वर टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली १६ हजार रुपयांना खरेदी केला होता. मावळचा निसर्गरम्य परिसर , सह्याद्री पर्वताच्या रांगा, कणखर कातळात कोरलेल्या कार्ले,भाजे आणि बेडसे च्या लेण्या यामुळं बाबासाहेबांना या जागेविषयी मोठं आकर्षण होत म्हणून त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. बाबासाहेब या बंगल्यात ये जाऊन राहत असतं. ज्या वेळी बाबासाहेब पुणे मुक्कामी असायचे तेव्हा ते या बंगल्यात ज्ञानसाधना करत,राजकीय ,सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत असत. या बंगल्याच्या परिसरात अनेक झाडे बाबासाहेबांनी लावली होती. ती आजही पाहायला मिळतात. १४ एप्रिल १९५१ रोजी बाबासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी याच बंगल्यात शेड्युल कास्ट फेडरेशन ची बैठक पार पडली होती. या बंगल्यात डॉ. बाबासाहेबांनी वापरलेल्या टेबल ,खुर्ची, अनेक महत्वाच्या घडामोडींचे चित्रे या बंगल्यात लावण्यात आली आहेत. सध्या या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. या बंगल्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी आणि वाचनासाठी या बंगल्यात येत असतात. बाबासाहेब आंबेडरांचे हे घर म्हणजे विचारांची शाळा होते, अनेक मोठ्या व्यक्ती आणि विचारवंत यांचे चर्चा करण्याचे हे ठिकाण होते. यात आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, गाडगे महाराज, शाहीर पठ्ठे बापूराव , कवी राजानंद गडपायले अनेकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या..... : लिंबराज कांबळे - ग्रामस्थ #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #तळेगावदाभाडे #मावळपुणे #आंबेडकरस्मारक #इतिहासाचीसाक्ष #प्रेरणास्थळ #विचारांचीशाळा #सह्याद्री #कार्लेलेंणी #भाजेलेंणी #बेडसेलेणी #सामाजिकचळवळ #विद्यार्थीप्रेरणा #महाराष्ट्रइतिहास #DrBabasahebAmbedkar #TalegaonDabhade #MavalPune #AmbedkarMemorial #HistoricPlace #InspirationSpot #HouseOfIdeas #Sahyadri #KarleCaves #BhajeCaves #BedseCaves #SocialMovement #StudentInspiration #MaharashtraHistory1
- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: संत तुकारामनगर तपास पथकाकडून दोन गावठी पिस्तूल जप्त, ३ आरोपींना बेड्या1
- Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- मावळ पुणे :- बोरघाटातील खंडाळा परिसरात माणुसकीचं हृदयस्पर्शी चित्र समोर आलं आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांची व्यथा पाहून भाजपचे नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख यांनी पुणे मुंबई प्रवासा दरम्यान माकडांना थंडगार पाणी पाजत बिस्किटे खाऊ घातली. या प्रसंगाने “मानसातली माणुसकी” अजून जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक आणि वन विभागाला भावनिक साद घालत, बोरघाट-खंडाळा परिसरात या मुक्या प्राण्यांसाठी कायमस्वरूपी पाण्याची टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, परवानगी मिळाल्यास स्वतःच्या खर्चातून पाण्याची टाकी उभारण्याची तयारीही संबंधितांकडून दर्शवण्यात आली आहे. माणुसकी आणि दयाभाव जपत, आवाज नसलेल्या जीवांसाठी पुढे येणं हाच खरा मानवधर्म असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे... #मावळ #पुणे #बोरघाट #खंडाळा #माणुसकी #मुक्याप्राणी #प्राणीसंवर्धन #वनविभाग #पाणीटंचाई #उन्हाळा #सामाजिककार्य #दयाभाव #हाजीअराफतशेख #भाजप #पर्यावरण #Maval #Pune #BorGhat #Khandala #Humanity #AnimalCare #StrayAnimals #WildlifeCare #ForestDepartment #WaterScarcity #SummerHeat #SocialWork #Compassion #HajiArafatSheikh #BJP #Environment1
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आकर्षण गोल्डन रथ दुर्गामाता रथ निगडी1