शंभर दिवसाच्या कार्यकाळात वादग्रस्त मुद्दे चर्चेत, शहराचा विकास मात्र कोसो दूर ० माजी आमदारच्या नेतृत्वावर नगरसेवकांचा रोष ० सत्तारूढ दोन गट आमने सामने भिवापूर (राजु जांभुळे ) भिवापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका नोव्हेबर महिन्यात पार पडल्या यात भाजपा व मित्रपक्ष यांच्या पांठिब्यावर जनतेतून निवडूण ।येवून नगराध्यक्ष होण्याचा मान सुषमा श्रीरामे यांना प्राप्त झाला. निवडून आलेले पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा पदभार मोठ्या उत्साहात स्विकारला. नव्याने स्थापन झालेली बॉडी नगरपंचायतीचा कार्यभार चांगल्या पद्धतीने चालवेल अशी भिवापूर शहरवासीयांची माफक अपेक्षा होती. परंतू या शंभर दिवसा पेक्षा जास्त कार्यकाळ झाला असून शहराचा विकास नाही तर भलताच प्रकार सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे. या शंभर दिवसाच्या कार्यकाळात नगराध्यक्षा च्या कामात उपाध्यक्ष यांनी हस्तक्षेप करू नये यात हस्तक्षेप केल्यास कारवाई करण्यात येइल ही माहिती मोबाईलच्या स्टेटस मध्ये ठेवल्याचा मॅसेज समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला. व याबाबतचे वृत्त पेपरमध्ये झळकले होते. या प्रकरणा पासूनच नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे आपसात बोलणे बंद झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषांचे नगराध्यक्ष यांच्या दालनातील काढलेल्या फोटोचा विषय हा मुद्दा बहुजन समाज पार्टीने लावून धरला डॉ. बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असे ठणकावून सांगत नगरपंचायत कार्यालयात बहुजन समाज पक्ष पदाधिकारी व शहरातील बहुसंख्य नागरीका सोबत शिष्टमंडळ नेले होते. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी यांची भेट देत नागरीकांच्या तीव्र भावना यावेळी त्यांना सांगण्यात आल्या. यावेळी त्यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटले होते. हे प्रकरण मिटत नाही तर जागतिक महिला दिवस कार्यक्रम आयोजित करतांना महिला नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याने या कार्यक्रमात तब्बल आठ महिला नगरसेविकांची अनुपस्थिती खटकणारी होती. यानंतर नगराध्यक्षा च्या एकला चलोच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याची शहरात चर्चा रंगत असल्याची दिसून येत होती. अशातच शहरामध्ये १ कोटी रुपयाचे नमो उद्यान तयार करण्याच्या जागेच्या विषयावरून सत्तारूढ गटामध्ये दोन गट पडले असून नमो गॉर्डन नेमकं कुठल्या जागी तयार करायचे याविषयी चांगलेच राजकारण तापले असल्याचे दिसून येत असून विकासाचे मुद्दे बाजुला पडले व भलतेच मुद्दे समोर येत आहे. भलतेच करून दाखविल ! नगरपंचायत निवडणूकीत आठ भाजपा नगरसेवक व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आणले व भाजपा पक्षाची नगरपंचायत मध्ये प्रथमच सत्ता स्थापन करण्यात आली. याचे श्रेय भिवापूर नगरपंचायत निवडणूकीची जवाबदारी घेतलेल्या माजी आमदार यांना जाते. मात्र आता त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पडण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. सत्तारूढ पक्षाकडे स्पष्ट बहुमत असतांना बाहेरच्या उमेदवाराचा पक्षप्रवेश करून त्याला उपाध्यक्ष पदी नियुक्ती करणे हे बरेच जणांना पसंद पडले नाही. तर नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवारी करीता पक्षाने केलेल्या सर्वे मध्ये पक्षाने ज्याचे नाव आले होते. त्यांच्या नावाने ए बी फार्म आला होता तो बदलविल्या ची किमिया माजी आमदार यांनी करून दाखविल्याचा बोलले जाते. हे गुपीत जास्त वेळ लपून राहिले राहिले नाही व या प्रकरणाची पोल खोल झाली. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात लढलेल्या पराभूत उमेदवाराला स्विकृत नगरसेवक म्हणून सभागृहात पाठविले. एकीकडे भाजपा जिल्हाध्यक्ष नगरपरिषदेच्या निवडणूकीत पक्षाविरोधी काम केल्याबद्ल 6 जणांवर पक्षातून निलंबित केले गेले तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 2 मध्ये पक्षाच्या विरोधात उभे राहून निवडणूक लढवली व पक्षाविरोधी काम या उमेदवाराने केले होते. हा उमेदवार पराभूत झाला असतांना. अशा व्यक्तिला स्वीकृत नगरसेवक केले गेले. या स्विकृत सदस्याचा सभागृहाला कोणता लाभ होणार आहे. हे न समजलेल कोड आहे. त्यामुळे पक्षाचा प्रमाणिक कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर दिसून येत असून. नमो उद्यान तयार करण्याच्या जागेच्या मुद्यावरून दोन गट पडले असून एका गटातील नगरसेवक खुलेआम माजी आमदारला खरीखोटी सुनवित असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. त्यामुळे पक्षाची चांगलीच किरकिरी होत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभुमिवर भिवापूर नगरपंचायतीच्या सत्तारूढ गटामध्ये सुरू असलेल्या अनागोंदी व भोगंड कारभाराची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष यांना नुकतीच देण्यात आली असून यावेळी बरेच नगरसेवकांची उपस्थिती होती.

- *९४*रक्तदात्यांनी केले रक्तदान* उमरेड (प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला.अगदी तोच सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंती दिनी काही तरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात १३५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण *९४* रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले. स्थानिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा यामध्ये पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले.प्रसंगी डॉ.हर्षल रेवतकर, डॉ.जितेश चव्हाण,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,अध्यक्ष मनीष बालपांडे ,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दीपक पटले,ओम साई स्पोर्टिंग क्लब चे रितेश राऊत, रिलायबल कोचिंग चे संचालक सुबोध धनविजय,नगरसेविका शालिनी गवळी,इंडिया पॉवर जिम चे किशोर आदमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रक्तपेढी लाईफ लाइन ब्लड बँक नागपूर चे डॉ.अविनाश बभारे,प्रवीण साठवणे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृती चिन्ह भेट अभिनंदन केले.कार्यक्रम संयोजक किशोर आदमने यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडला.यशस्वीतेसाठी आशिष वंजारी,विशाल बावणे,मुकेश गौतम,अक्षय श्रीखंडे,नरेंद्र बालपांडे,दिनेश ढेबूदास,प्रवीण लाडेकर,सतीश चकोले,समीर वैद्य,प्रांजल डहाके,रोशन पोकळे,उज्वल चिंदमवार,तोसिफ शेख,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,शुभम सिर्सिकर,सतीश तांबेकर ,सचिन जोधे ,राजू चाचरकर,संदीप दांडेकर,आदींचे योगदान लाभले.1
- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात गुप्ताजी हॉटेलसमोर प्रचंड ट्रॅफिक जाम नागपूर :- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची लांबलचक रांग लागते, ज्यामुळे प्रवासाला उशीर होतो आणि अपघाताचा धोका देखील वाढला आहे. स्थानिकांच्या मते, रस्त्यावर अनियमित पार्किंग, फेरीवाले आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. अनेकदा आपत्कालीन वाहनांनाही मार्ग काढणे कठीण जाते, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून, वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून ट्रॅफिक सुरळीत करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जर याकडे दुर्लक्ष झाले, तर येणाऱ्या काळात समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.1
- नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1
- Post by धरती पुत्र4
- *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- सिनेस्टाईल पद्धतीने वर्धा पोलिसांनी केली आरोपीला अटक news # live1