logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मलनि:सारण प्रकल्पांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथे मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारणी आणि घाटकोपर उदंचन केंद्राच्या (Pumping Station) दर्जोन्नतीची कामे वेगाने सुरू आहेत. या दोन्ही प्रकल्पांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामध्ये मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम, प्रचालन आणि परिरक्षण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागाच्या वतीने सुरू असलेल्या ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. तसेच कामे विहित वेळेत व वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कुमक वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यासोबतच, त्यांनी घाटकोपर उदंचन केंद्राच्या प्रकल्प स्थळाला भेट देऊन तेथील स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी कामांचा आढावा घेतला आणि हे काम ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण झाल्यानंतर सांडपाण्यावर अधिक प्रभावी प्रक्रिया होणार असून, समुद्रात जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होण्यास मोठी मदत होणार आहे.

3 hrs ago
user_Ajinkya
Ajinkya
मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
3 hrs ago
e234af98-7664-4c3c-8cd3-4abd4aed3df7

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंब्रा येथे अब्दुल करीम नावाच्या व्यक्तीचा मिरगीचा (फिट्सचा) झटका आल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती देताना नईम खान यांनी सांगितले की, अब्दुल करीम यांना आधीपासूनच मिरगीचा आजार होता. ते जेव्हा आत गेले, तेव्हा त्यांना मिरगीचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
    1
    मुंब्रा येथे अब्दुल करीम नावाच्या व्यक्तीचा मिरगीचा (फिट्सचा) झटका आल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती देताना नईम खान यांनी सांगितले की, अब्दुल करीम यांना आधीपासूनच मिरगीचा आजार होता. ते जेव्हा आत गेले, तेव्हा त्यांना मिरगीचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आई भवानीची कथा ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    आई भवानीची कथा ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Shyam pokra
    Shyam pokra
    Mumbai, Maharashtra•
    4 hrs ago
  • अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सांगोला येथे एक मोठी धाड टाकली आहे. या धडक कारवाई दरम्यान तब्बल १५ लाख रुपयांचे संशयास्पद भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. एफडीएच्या या अत्यंत आक्रमक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।
    1
    अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सांगोला येथे एक मोठी धाड टाकली आहे. या धडक कारवाई दरम्यान तब्बल १५ लाख रुपयांचे संशयास्पद भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. एफडीएच्या या अत्यंत आक्रमक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।
    user_Aleem Inamdar
    Aleem Inamdar
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुंबई येथील 'ROKHTOKHMUMBAINEWS' ने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये, SRI न केल्यामुळे भारतीय नागरिकत्वावर काही परिणाम होतो का, याबाबत एका वकिलांनी कायदा आणि संविधानाच्या आधारे महत्त्वाची माहिती आणि आपली मते मांडली आहेत. लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा या व्हिडिओचा मुख्य हेतू आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणताही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सरकारी नियम आणि अधिकृत माहितीची पडताळणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
    1
    मुंबई येथील 'ROKHTOKHMUMBAINEWS' ने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये, SRI न केल्यामुळे भारतीय नागरिकत्वावर काही परिणाम होतो का, याबाबत एका वकिलांनी कायदा आणि संविधानाच्या आधारे महत्त्वाची माहिती आणि आपली मते मांडली आहेत. लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा या व्हिडिओचा मुख्य हेतू आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणताही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सरकारी नियम आणि अधिकृत माहितीची पडताळणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
    user_Qureshi Sakeel WJNP News
    Qureshi Sakeel WJNP News
    Media Consultant मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नायगाव वेस्टमध्ये बेकायदेशीर गावठी दारूचा मोठा महाभांडाफोड उघडकीस आला आहे. या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूच्या धंद्याचा हा पर्दाफाश करण्यात आला आहे.
    1
    नायगाव वेस्टमध्ये बेकायदेशीर गावठी दारूचा मोठा महाभांडाफोड उघडकीस आला आहे. या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूच्या धंद्याचा हा पर्दाफाश करण्यात आला आहे.
    user_MI MARATHI INDIA
    MI MARATHI INDIA
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मॅरेथॉन कंपनीवर शेतकऱ्यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आता बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
    1
    मॅरेथॉन कंपनीवर शेतकऱ्यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आता बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुंब्रा येथील कादर पॅलेसमध्ये असलेल्या 'गरीब नवाज बीफ शॉप'मध्ये दिवसाढवळ्या चोरीची घटना समोर आली आहे. दुकानाचा मालक जेवण करत असताना एका अज्ञात तरुणाने दुकानात प्रवेश केला. त्याने गल्ला उघडून त्यातील रोकड चोरली आणि तो तिथून फरार झाला. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी दुकान चालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. दरम्यान, चोरीला गेलेल्या रोकडची अचूक रक्कम अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची आणि परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे।
    1
    मुंब्रा येथील कादर पॅलेसमध्ये असलेल्या 'गरीब नवाज बीफ शॉप'मध्ये दिवसाढवळ्या चोरीची घटना समोर आली आहे. दुकानाचा मालक जेवण करत असताना एका अज्ञात तरुणाने दुकानात प्रवेश केला. त्याने गल्ला उघडून त्यातील रोकड चोरली आणि तो तिथून फरार झाला.

चोरीची ही संपूर्ण घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी दुकान चालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. दरम्यान, चोरीला गेलेल्या रोकडची अचूक रक्कम अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची आणि परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे।
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.