logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी सहकार क्षेत्र विकासाचा कणा ठरत आहे - सहकार महर्षी दिलीपराव देशमुख शेतकरी व सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सहकार महत्त्वाचा— दिलीपराव देशमुख लातूर (प्रतिनिधी) सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाची प्रगती सहज शक्य आहे. त्यासाठी सहकार क्षेत्राची जेवढी प्रगती होईल तेवढी सर्वसामान्य माणसाचे प्रगती होऊ शकेल अशी विचार सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा हिप्पळगाव यांच्या नव्या सुसज्ज इमारतीचे स्थलांतर तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, हिप्पळगाव यांच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री  दिलीपरावजी देशमुख आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या इमारतीमुळे ग्राहकांना अधिक चांगल्या, गतिमान व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, सहकार क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ आहे. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देत शेतकरी, सभासद आणि युवकांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा बँक कायम कटिबद्ध असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा अधिक सक्षम, पारदर्शक व दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती बँक सातत्याने कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नव्या इमारतीमुळे ग्राहकांना आधुनिक सुविधा, प्रशस्त कार्यालयीन व्यवस्था तसेच अधिक जलद सेवा मिळणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे. जिल्हा बँक नेहमीच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असून शेतकरी हिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. भविष्यातही सक्षम नेतृत्वाखाली जिल्हा बँक अशीच प्रगती करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, डी. एन. शेळके, अनुप शेळके, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर डी. एल. पोतंगले, सहायक निबंधक एन. एस. किलजे, अशोक गोविंदपुरकर, व्यंकटराव बिराजदार, जयेश माने, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, माणिक गायकवाड, बापूराव माने, नवनाथ गिरी, दिलीप गड्डीमे, तुकाराम मोरमपल्ले, भगवत व्यंजने, सुरेखाताई साबदे, विजयकुमार माने, रमेश सोनवणे, अनंत शेळके, पांढरे, अल्लाउद्दीन मुजावर, अंकुश बोळगावे, अविनाश खांडेकर, गणेश माने, मेहताब शेख व सुनंदाताई कोकरे यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
6568dd7a-64e8-44bd-8bb6-68a21f4417be

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    user_RAFTAR HINDUSTAN KI
    RAFTAR HINDUSTAN KI
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७%  दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७%  दमदार निकाल
लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    43 min ago
  • 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. मृत्यू झालेला तरुण हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
    1
    📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात.
अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू.
📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात.
अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू.
मृत्यू झालेला तरुण हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
    1
    चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
    2
    लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
    user_Mahesh NIKAM
    Mahesh NIKAM
    औसा, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
    1
    नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    14 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.