logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुख्यमंत्रीपद मिळालं पण कुटुंब दुरावलं..; थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी-मुलांनी फिरवली पाठ तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि तमिळगा वेत्री कझमगचे (टीव्हीके) प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आज (रविवारी) तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.यावेळी राहुल गांधीसुद्धा मंचावर विजय यांच्यासोबत उपस्थित होते. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये विजय यांचे आई-वडील आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन हजर होते. सर्वांच्या नजरा त्रिशाच्या उपस्थितीकडे खिळल्या होत्या. कारण गेल्या काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या सर्वांत विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगम आणि दोन्ही मुलं अनुपस्थित होते. काही महिन्यांपूर्वीच विजय यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डीएमके आणि एआयएडीमके या दोन मोठ्या पक्षांना त्यांनी मात दिली. विजय यांच्यासाठी ही खूप मोठी बाब आहे. पक्षाला मिळालेल्या या यशानंतर विजय यांच्या कुटुंबीयांनी आनंद साजरा केला. तर त्रिशानेही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. परंतु या सर्वांत विजय यांची पत्नी आणु मुलं कुठेच दिसली नाहीत. विजय यांनी निवडणूक जिंकल्यानंतरही संगीता किंवा मुलांची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता शपथविधी सोहळ्यालाही त्यांची अनुपस्थिती असल्यामुळे संगीता आणि मुलं विजय यांच्यापासून दुरावल्याचं स्पष्ट दिसत आहे.

5 hrs ago
user_अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
Voice of people Sillod•
5 hrs ago
7dff651d-eb99-44ad-9d42-7d5377e3173d

मुख्यमंत्रीपद मिळालं पण कुटुंब दुरावलं..; थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी-मुलांनी फिरवली पाठ तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि तमिळगा वेत्री कझमगचे (टीव्हीके) प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आज (रविवारी) तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.यावेळी राहुल गांधीसुद्धा मंचावर विजय यांच्यासोबत उपस्थित होते. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये विजय यांचे आई-वडील आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन हजर होते. सर्वांच्या नजरा त्रिशाच्या उपस्थितीकडे खिळल्या होत्या. कारण गेल्या काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या सर्वांत विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगम आणि दोन्ही मुलं अनुपस्थित होते. काही महिन्यांपूर्वीच विजय यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डीएमके आणि एआयएडीमके या दोन मोठ्या पक्षांना त्यांनी मात दिली. विजय यांच्यासाठी ही खूप मोठी बाब आहे. पक्षाला मिळालेल्या या यशानंतर विजय यांच्या कुटुंबीयांनी आनंद साजरा केला. तर त्रिशानेही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. परंतु या सर्वांत विजय यांची पत्नी आणु मुलं कुठेच दिसली नाहीत. विजय यांनी निवडणूक जिंकल्यानंतरही संगीता किंवा मुलांची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता शपथविधी सोहळ्यालाही त्यांची अनुपस्थिती असल्यामुळे संगीता आणि मुलं विजय यांच्यापासून दुरावल्याचं स्पष्ट दिसत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. घरे रिकामी सोडून जाताना चोरी आणि घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. घरे रिकामी सोडून जाताना चोरी आणि घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.
    1
    पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध

आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.
    1
    ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.
    1
    बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपास परिसरात एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपास परिसरात एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    12 hrs ago
  • जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विष्णूपुरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून, कामाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी होत आहे.
    1
    जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विष्णूपुरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून, कामाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी होत आहे.
    user_Nanuram pawara
    Nanuram pawara
    जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की, शेतकऱ्यांची वहिवाट बंद करता येणार नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे पारंपरिक वहिवाटीचे हक्क कायम राहतील.
    1
    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की, शेतकऱ्यांची वहिवाट बंद करता येणार नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे पारंपरिक वहिवाटीचे हक्क कायम राहतील.
    user_अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    Voice of people Sillod•
    13 hrs ago
  • मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनीत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीनगर : मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रयत्नातून मंजूर केले. त्यामुळे मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्वाही शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी दिली. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी केलेल्या मागणीनुसार प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनी येथे 20 लक्ष रुपये निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सेवासुविधा तात्काळ देण्यासाठी कटीबद्ध असून, हक्काने आदेश द्या, असे आवाहन जैस्वाल यांनी केले. याप्रसंगी शिवसेना गटनेते किशोर नागरे, सिनेट सदस्या पूनम पाटील खरगे, युवासेना शहर अधिकारी सागर खरगे, शिवसैनिक रमेश इधाटे, रविंद्र देशमुख, बाबासाहेब घुगे, तेजस पाटील, अविष्कार राजपूत , निखिल चव्हाण आदिसह स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित होते.
    2
    मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल 

प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनीत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
छत्रपती संभाजीनगर : मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रयत्नातून मंजूर केले. त्यामुळे मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्वाही शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी दिली.
स्थानिक नागरिक आणि भाविकांनी केलेल्या मागणीनुसार प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनी येथे 20 लक्ष रुपये निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सेवासुविधा तात्काळ देण्यासाठी कटीबद्ध असून, हक्काने आदेश द्या, असे आवाहन जैस्वाल यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना गटनेते किशोर नागरे, सिनेट सदस्या पूनम पाटील खरगे, युवासेना शहर अधिकारी सागर खरगे, शिवसैनिक रमेश इधाटे, रविंद्र देशमुख, बाबासाहेब घुगे, तेजस पाटील, अविष्कार राजपूत , निखिल चव्हाण आदिसह स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित होते.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
    1
    न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.