राज्य परिवहन महामंडळामार्फत आता विद्यार्थ्यांना ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड वितरित केले जाणार आहे. सध्या विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात मिळणाऱ्या सवलतींसाठी आधारकार्ड संलग्न ‘एनसीएमसी अनेब्ल्ड स्मार्ट कार्ड’ दिले जात असून, लवकरच शालेय व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासेससाठीही ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शासनाच्या ९ ऑक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसार सवलतधारी प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार एसटी महामंडळ, मे. ईबिक्स टेक्नोलोजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व आगारांमध्ये हे कार्ड देण्याची कार्यवाही सुरू आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारी प्रवाशांसाठी नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू झाली असून, याच धर्तीवर आता विद्यार्थ्यांनाही हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे. या 'एनसीएमसी' कार्डसाठी शालेय, शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक आवश्यक असतील. हे दोन्ही क्रमांक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. शालेय विद्यार्थ्यांना मासिक पासासाठी लागणाऱ्या या स्मार्ट कार्डचा मागणी अर्ज एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे. अर्जात नमूद केलेली माहिती व जोडलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असून, त्यानंतरच हा अर्ज आगारातील किंवा बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक किंवा अधिकृत एजंट यांच्याकडे जमा करायचा आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा चालू मोबाईल क्रमांक देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. अर्जाची तपासणी व पडताळणी झाल्यानंतर आवश्यक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पावती दिली जाईल. नोंदणी पूर्ण झालेले हे एनसीएमसी कार्ड ३० दिवसांच्या आत प्रिंट होऊन संबंधित आगारास प्राप्त होईल. त्यानंतर आगारामध्ये पॉस (पीओएस) मशिनद्वारे हे कार्ड ॲक्टिव्ह करून ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल. त्यामुळे सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची आगाऊ पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन लातूर राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभाग नियंत्रकांनी केले आहे.

- लातूर शहरात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा दिसून आली आहे, जिथे बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात एका महिला आणि एका लहान मुलाला कोयत्याने व दगडाने मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- मुंबई, दि. २० रोजी न्यायालयाने बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण आठ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुराव्यांच्या अभावामुळे आणि तपास यंत्रणेला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे दीर्घकाळापासून लक्ष लागून होते, कारण हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गुन्हेगारी आणि राजकीय प्रकरणांपैकी एक मानले जाते. अनेक वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर हा निकाल जाहीर झाल्यामुळे संबंधित पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून, या निर्णयाची राज्यभर चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले असून, पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.1
- परळी वैजनाथमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना संत भगवान बाबा चौक ते तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका थार गाडीने धडक दिली. या घटनेनंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परळी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून प्रशांत देशमुख यांना जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे कैद झाली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबीयांसह नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. "सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा," अशी जोरदार मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण परळीकरांचे लक्ष लागले आहे.1
- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या यशवाडी गावात 20 जून रोजी एक घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.1
- परभणी जिल्ह्यात एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई करत १५ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीदरम्यान, एटीएसने काही युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.1
- भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.1
- लातूर शहरात 'कोयता गॅंग' पुन्हा सक्रिय झाली असून, या टोळीने केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत, ज्यामुळे लातूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1