logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या नालीला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने भगदाडावर मटेरियल टाकून घाईघाईत थातूरमातूर दुरुस्ती केल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या मते, नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने अनेक ठिकाणी तडे गेले असून तीन-चार ठिकाणी भगदाड पडले आहे. तसेच नालीवर टाकण्यात येणारे झाकणही फक्त दोन ते अडीच इंच जाडीचे असल्याने भविष्यात पहिल्याच पावसात नाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #Himayatnagar #NandedNews #HighwayWork #PoorConstruction #PublicIssue #MaharashtraNews #DevelopmentWork #CitizenVoice 🚧

3 hrs ago
user_NNL Marathi
NNL Marathi
Local News Reporter Nanded, Maharashtra•
3 hrs ago

हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या नालीला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने भगदाडावर मटेरियल टाकून घाईघाईत थातूरमातूर दुरुस्ती केल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या मते, नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने अनेक ठिकाणी तडे गेले असून तीन-चार ठिकाणी भगदाड पडले आहे. तसेच नालीवर टाकण्यात येणारे झाकणही फक्त दोन ते अडीच इंच जाडीचे असल्याने भविष्यात पहिल्याच पावसात नाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #Himayatnagar #NandedNews #HighwayWork #PoorConstruction #PublicIssue #MaharashtraNews #DevelopmentWork #CitizenVoice 🚧

More news from Maharashtra and nearby areas
  • *नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन;* *महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री* *मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी* नांदेड दि. 10 मार्च :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने रेणुका महोत्सव 2026 निमित्त ‘मिनी सरस’प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल, वजीराबाद येथे 13 ते 18 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. या मिनी सरस मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये बाजरीची खारोडी, व्हेज आम्लेट, अमरावतीची मांड्यावर मडक्यात तयार केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी-बेसन-ठेचा, काजू, मँगो पल्प, पापड, कुरडई, विविध प्रकारची लोणची, मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, डाळी, मनुका आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल, पुरुषांचे कपडे, साड्या, खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, बेन्टेक्स दागिने, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, लाकडी वस्तू, भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. मेळाव्यात दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आनंदही घेता येणार आहे. दर्जेदार साहित्य व माफक दरात उपलब्ध असलेल्या या मेळाव्याला भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक मेघना कावली तसेच उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
    1
    *नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन;* 
*महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री*
*मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी*
नांदेड दि. 10 मार्च :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने रेणुका महोत्सव 2026 निमित्त ‘मिनी सरस’प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल, वजीराबाद येथे 13 ते 18 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे.
या मिनी सरस मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये बाजरीची खारोडी, व्हेज आम्लेट, अमरावतीची मांड्यावर मडक्यात तयार केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी-बेसन-ठेचा, काजू, मँगो पल्प, पापड, कुरडई, विविध प्रकारची लोणची, मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, डाळी, मनुका आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
तसेच घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल, पुरुषांचे कपडे, साड्या, खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, बेन्टेक्स दागिने, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, लाकडी वस्तू, भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
मेळाव्यात दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आनंदही घेता येणार आहे. दर्जेदार साहित्य व माफक दरात उपलब्ध असलेल्या या मेळाव्याला भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक  मेघना कावली तसेच उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡
    1
    ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग
आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या.
सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.
जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार.
#Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
    1
    शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत  लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
    user_पत्रकार विश्वनाथ कांबळे
    पत्रकार विश्वनाथ कांबळे
    लोहा, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नांदेड उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा भरवला जाणार असून, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत तो नागरिकांसाठी खुला राहील
    1
    नांदेड उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा भरवला जाणार असून, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत तो नागरिकांसाठी खुला राहील
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
    2
    भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे 
मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक  व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे
मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महापालिकेच्या 'अतिक्रमण' मोहिमेचा फार्स; स्वतःच्या दारातील स्वच्छता, मात्र शहरात अतिक्रमणाचा विळखा कायम! नांदेड: महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची सध्याची कार्यपद्धती म्हणजे 'दिवाखाली अंधार' अशी झाली आहे. महापालिका प्रशासन केवळ आपल्या मुख्य कार्यालयाच्या आसपासच्या भागातील अतिक्रमण हटवून कारवाईचा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र, शहरातील इतर मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये अतिक्रमणाने रौद्र रूप धारण केले असून, पथक मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षपाती कारवाईचा संताप महानगरपालिकेचे पथक ठराविक भागांतच फिरताना दिसते. केवळ महापालिकेच्या बाजूचे रस्ते मोकळे करून आपण खूप मोठे काम केले आहे, अशा आविर्भावात प्रशासन वावरत आहे. या 'कलगीतुऱ्या'मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाला फक्त आपल्या कार्यालयाचा परिसर सुशोभित ठेवायचा आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शहराच्या इतर भागांत अतिक्रमणाचे साम्राज्य शहरातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि रहिवासी भागांत पदपथांवर फेरीवाले, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांनी पाय ठेवायला जागा उरलेली नाही. * वाहतूक कोंडी: रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, वाहनांच्या रांगा लागत आहेत. * पथक आहे की सुस्त? शहराच्या इतर भागात जेव्हा नागरिक तक्रारी करतात, तेव्हा अतिक्रमण पथक कुंभकर्णी झोपेत असल्याचे भासते. नागरिकांची मागणी "अतिक्रमण काढायचे असेल तर ते संपूर्ण शहराचे काढावे, फक्त स्वतःच्या इमारतीभोवती कारवाई करून प्रशासन काय साध्य करत आहे?" असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. जर लवकरच शहरातील मुख्य रस्त्यांवरील हे अतिक्रमण हटवले नाही, तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आता महापालिका आयुक्त या सुस्त यंत्रणेला जागे करून संपूर्ण शहरात समान कारवाई करण्याचे आदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    महापालिकेच्या 'अतिक्रमण' मोहिमेचा फार्स; स्वतःच्या दारातील स्वच्छता, मात्र शहरात अतिक्रमणाचा विळखा कायम!
नांदेड:
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची सध्याची कार्यपद्धती म्हणजे 'दिवाखाली अंधार' अशी झाली आहे. महापालिका प्रशासन केवळ आपल्या मुख्य कार्यालयाच्या आसपासच्या भागातील अतिक्रमण हटवून कारवाईचा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र, शहरातील इतर मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये अतिक्रमणाने रौद्र रूप धारण केले असून, पथक मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.
पक्षपाती कारवाईचा संताप
महानगरपालिकेचे पथक ठराविक भागांतच फिरताना दिसते. केवळ महापालिकेच्या बाजूचे रस्ते मोकळे करून आपण खूप मोठे काम केले आहे, अशा आविर्भावात प्रशासन वावरत आहे. या 'कलगीतुऱ्या'मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाला फक्त आपल्या कार्यालयाचा परिसर सुशोभित ठेवायचा आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शहराच्या इतर भागांत अतिक्रमणाचे साम्राज्य
शहरातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि रहिवासी भागांत पदपथांवर फेरीवाले, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांनी पाय ठेवायला जागा उरलेली नाही.
* वाहतूक कोंडी: रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, वाहनांच्या रांगा लागत आहेत.
* पथक आहे की सुस्त? शहराच्या इतर भागात जेव्हा नागरिक तक्रारी करतात, तेव्हा अतिक्रमण पथक कुंभकर्णी झोपेत असल्याचे भासते.
नागरिकांची मागणी
"अतिक्रमण काढायचे असेल तर ते संपूर्ण शहराचे काढावे, फक्त स्वतःच्या इमारतीभोवती कारवाई करून प्रशासन काय साध्य करत आहे?" असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. जर लवकरच शहरातील मुख्य रस्त्यांवरील हे अतिक्रमण हटवले नाही, तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
आता महापालिका आयुक्त या सुस्त यंत्रणेला जागे करून संपूर्ण शहरात समान कारवाई करण्याचे आदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.