विठ्ठल कांगणे यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा वैचारीक व्याख्यानाला हजारोच्या संख्येने उपस्थिती विठ्ठल कांगणे यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा वैचारीक व्याख्यानाला हजारोच्या संख्येने उपस्थिती नागपूर :- प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद प्रबोधन पर्व २०२६ यांच्या वतीने गायनाचे व प्रबोधनाचे चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वप्रथम महिला मंडळाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्षपदी लाभलेले दिगंबर जगताप सर मराठा सेवा संघ राज्य उपाध्यक्ष यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इतर मान्यवरांनी सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन सर्व महामानवांना अभिवादन केले. मार्गदर्शन तथा प्रबोधन सुरू होण्या अगोदर कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष जगताप सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिव, फुले,शाहू,आंबेडकर विचारधारा ही घराघरात पोहोचली पाहिजे असे उद्गार करून सर्व समाज बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रबोधन पर्वाचे दुसरे पुष्प दि.१७ एप्रिल २०२६ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा बहुजन विचाराचे अभ्यासक विठ्ठल कांगणे सर परभणी यांनी विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध ज्येष्ठांना बुवाबाजीच्या नांदी न लागता कर्मकांड न करता अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचे पालन करुन संविधानानुसार चालण्याचा प्रयत्न करा असे आपल्या प्रबोधनातून मार्गदर्शन केले. प्रत्येक घरातून एक मुलगा,एक मुलगी शिकून त्याची प्रशासनात निवड झाली पाहिजे, आईने आपल्या मुलीवर लक्ष दिले पाहिजे ती कसे कपडे घालते मोबाईल वापरत असतांना इंस्टाग्राम, व्हाट्सअप या समाज माध्यमावर वायफळ वेळ खर्च न करता अभ्यासायाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे तरच तुमचे मुले घडू शकतात असे आई-वडिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पुसद परिसरातील तसेच आजूबाजूच्या महागाव, उमरखेड तालुक्यातील हजारो विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तथा समाज बांधव हे हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला लाभलेले विशेष उपस्थितीती मध्ये..समीर वानखेडे (IRS) ॲडिशनल कमिशनर (भारत सरकार) तसेच जयदीप कवाडे,उपाध्यक्ष लघुउद्योग महामंडळ महाराष्ट्र शासन समीर वानखेडे यांनी सुद्धा स्पर्धा परीक्षा युपीएससी व एमपीएससी परीक्षेचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विदर्भातील प्रत्येक वर्षी १० आय.ए.एस आणि आय.पी.एस अधिकारी घडले पाहिजे असा माझा मानस आहे असे आपले मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना व पालकांना संबोधित केले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रभाकर टेटर माजी अध्यक्ष मराठा सेवा संघ, बाळासाहेब वाठोरे रिपाइं आठवले अध्यक्ष, राजू साळुंखे पाणी पुरवठा सभापती, रंगरावजी काळे माजी शिक्षणाधिकारी, नितीन पवार माजी सभापती, डॉ.सुनील खाडे प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष २०२६, अभिजीत पानपट्टे बांधकाम सभापती, डॉ.राहुल भगत, सुधाकर कांबळे सामाजिक कार्यकर्ते (जवळा), नारायणराव गायकवाड सामाज सेवक, गणपत गव्हाळे अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, संदीप कावळे कृषी सहाय्यक. इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद प्रबोधनपर्व 2026 चे सर्व पदाधिकारी तथा सदस्य यांनी अधिक प्रश्न परिश्रम घेतले.

- आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरची: तालुक्यातील प्रतापगड, नाडेकर व बेटकाठी टोला येथे आजही रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1
- Post by कु सुषमा डबराल4
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by RAJA news1
- Post by Pitam Parjapati1
- Post by ASLAM kha1
- ডায়মন্ড প্লাজা মাল উল্টো দিকে ড্রেনের কাজ চলছে1
- कोल्हापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मदिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली1