तालुक्यातील बावलगाव येथे रोजगार सेवकाला कामावर ठेवायचे की कमी करायचे यावर झालेल्या मतदान प्रक्रियेत गंगाधर सोंडारे बावलगावकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीमुळे गंगाधर सोंडारे पुन्हा कामावर रुजू होणार आहेत. ही प्रक्रिया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत मार्च 2025 मध्ये सिंचन विहीर लाभार्थ्यांनी सुरू केलेल्या कामांशी संबंधित आहे. शोभाबाई रावसाहेब ताटे, संदीप गणपत कांबळे, मारोती अंबाजी भिकनुरे आणि लचमन्ना अंबाजी भिकनुरे या लाभार्थ्यांना विहिरी मंजूर झाल्यानंतर त्यांनी प्रत्येकी 17 मजूर लावून कामे सुरू केली होती. मात्र, तक्रारदार प्रीतम गवाले, विनोद गवाले आणि सचिन जाधव यांनी विहिरींची कामे जेसीबीच्या साहाय्याने झाली असल्याच्या खोट्या तक्रारी करून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. खंडणी न दिल्याने तक्रारदारांनी शेतकऱ्यांची बिले थांबवली आणि चौकशी पथक नेमून चौकशी केली. या चौकशी पथकाने निःपक्षपाती चौकशी न करता केवळ एकाच विहिरीची पाहणी करून अहवाल तयार केला. या पथकाविरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (मु का अ) तक्रार करण्यात आली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आरोप आहे की, तक्रारदारांनी चौकशी पथकाला आर्थिक रसद पुरवून रोजगार सेवकांच्या विरोधात अहवाल तयार करवून घेतला. या खोट्या अहवालानुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांनी रोजगार सेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांना कामावरून कमी करण्याची शिफारस ग्रामसभेला केली होती. या निर्णयावर रोजगार सेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे फेरचौकशीची विनंती केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने नांदेड जिल्हा परिषदेला फेरचौकशीचे पत्र दिल्यानंतरही संबंधित विभागाने चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर 2 मे 2026 रोजी आयोजित ग्रामसभेत तक्रारदारांनी दादागिरी, भांडण आणि मारामारीसारखे प्रकार केल्याने सभा तहकूब करण्यात आली होती, असे गावकऱ्यांनी पाहिले आहे. यामुळे पंचायत समिती मुखेड प्रशासनाने 10 कर्मचारी-अधिकाऱ्यांची टीम तयार करून कडक पोलीस बंदोबस्तात 30 मे 2026 रोजी मतदान घेतले. या मतदानात एकूण 746 मते पडली, त्यापैकी 399 मते रोजगार सेवकांच्या बाजूने पडली. गावातील सुज्ञ मतदारांनी कोणत्याही धमक्यांना किंवा दादागिरीला न घाबरता या मतदानात भाग घेऊन शेतकऱ्यांची पुढील बिले मिळण्यासाठी आणि रोजगार सेवकांच्या बाजूने मतदान करून त्यांना विजयी केल्याबद्दल रोजगार सेवक गंगाधर सोंडारे यांनी सर्व मतदारांचे जाहीर आभार मानले. या संपूर्ण प्रक्रियेत सरपंच, उपसरपंच, 7 ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व तरुण कार्यकर्ते आणि शेतकरी लाभार्थी यांचे सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. सिंचन विहीर योजना शेतकऱ्यांसाठी वरदान असतानाही केवळ तक्रारदारांमुळे शेतकऱ्यांची कामे पूर्ण होऊनही त्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे यावर प्रशासन काय भूमिका घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.1
- संबोधी अकादमीने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 110 जोडपी विवाहबद्ध झाली.1
- खासदार संजय जाधव यांनी आंतरवाली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे," अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी व्यक्त केली.1
- राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (अहिल्यानगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३१ मे रोजी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अहिल्याबाईंचे जीवन हे सुशासन, जनसेवा आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी राज्यकारभारात जनहिताला सर्वोच्च स्थान देत समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करून अहिल्याबाईंनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणाऱ्या राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना ३०१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौंडी नगरीत जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राज्यमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांचे हे उपोषण भाजप सरकारविरोधात आहे.1
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकरमधून 800 ग्रॅम सोने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.1