ईश्वरपूर पोलिसांनी अवैध शस्त्रविक्रीच्या प्रयत्नात असलेल्या स्वप्निल नंदकुमार सुर्वे (वय २३, रा. नरसिंहपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या तरुणाला जांभुळवाडी येथे सापळा रचून अटक केली आहे. संशयित आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल दत्तात्रय पांगे यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी रात्री गोपनीय बातमीदाराकडून जांभुळवाडी हद्दीतील प्लायवुड फॅक्टरी परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव स्वप्निल नंदकुमार सुर्वे सांगितले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्या कमरेला लपवून ठेवलेले देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर (एम.एच.-५० डब्ल्यू ७४७२) ही मोटारसायकल देखील जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या पिस्टलची किंमत ६० हजार रुपये आणि मोटारसायकलीची किंमत ६५ हजार रुपये असे एकूण १ लाख २५ हजारांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कुबेर खोत, अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, सुशांत बुचडे यांच्यासह पथकाने सहभाग घेतला. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला १ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सजन पाटील करत आहेत.

- Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन1
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी जोरदार टीका केली आहे. काशीद यांनी म्हटले आहे की, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली, तेव्हा लक्ष्मण हाके यांनी शेतातील ढेकळात उपोषण करणार असल्याचे सांगितले आणि आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर, ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी हाके यांना आव्हान दिले आहे की, त्यांनी एक दिवस ढेकळात उपोषण करून दाखवावे.1
- गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.1
- सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीतील विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतलेला निर्णय पूर्णपणे मान्य असल्याचे म्हटले. सरनाईक यांनी नमूद केले की, नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते सर्वजण रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्याकडे पाहत होते, परंतु महायुतीचा धर्म पाळण्यासाठी काही वेळा मागे-पुढे करावे लागते. याशिवाय, आगामी विधान परिषदेच्या सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या जागांच्या मागणीवर बोलताना सरनाईक म्हणाले की, राजकारणात देवाणघेवाण आणि राजकीय समीकरणे बदलत असतात. महायुतीमध्ये आपल्या हक्काच्या जागा मागणे ही मोठी गोष्ट नाही. त्यांच्या आग्रही मागणीनुसार, मागील वेळेस लढवलेल्या पाच जागा कायम राहाव्यात आणि अतिरिक्त दोन जागा मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. जरी आता समीकरणे बदलली असली तरी, भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला काही चांगल्या गोष्टी नक्कीच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी, सरनाईक यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या लोकांनी संवेदनशील विषयांवर बोलताना तोंडाला कुलूप लावणे गरजेचे आहे, असे सरनाईक म्हणाले. प्रसाद लाड यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पक्षात कोणतीही नाराजी नसून, महायुतीचे ऐक्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच, जागावाटपावरून भविष्यात शिवसेनेला योग्य वाटा मिळेल, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.4
- आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या जन्मगाव चोंडी येथे जाऊन विनम्र अभिवादन केले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यावेळी कृषिमंत्री श्री दत्तात्र्य भरणे, श्री अक्षय शिंदे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायनिष्ठा आणि समाजहिताच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव करत, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा समाजाला कायम प्रेरणा देत राहील, अशी भावना व्यक्त केली.1
- कोकोमध्ये क्लासी वाइब्सचा अनुभव येतो. त्यात शांत स्वभाव असून, अथांग प्रेम दिसून येते.2
- इचलकरंजीतील बहुचर्चित आयपीएल सट्टा रॅकेट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला, ज्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या आयपीएल सट्टा प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाल्याचे श्रेय अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या दमदार युक्तिवादाला दिले जात आहे.1