अनधिकृत पुतळा ग्रामस्थांनी स्वखुशीने हटवला; जालन्यात सलोख्याचा आदर्श अनधिकृत पुतळा ग्रामस्थांनी स्वखुशीने हटवला; जालन्यात सलोख्याचा आदर्श.. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे अनधिकृतपणे बसविण्यात आलेला महापुरुषांचा अर्धाकृती पुतळा ग्रामस्थांनी स्वखुशीने आणि सन्मानपूर्वक हटवून समाजासमोर सलोखा व कायद्याचे पालन याचा आदर्श निर्माण केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १ ते २ वाजताच्या सुमारास जांबसमर्थ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारील मोकळ्या जागेत कोणतीही शासकीय परवानगी न घेता महापुरुषांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाने तात्काळ हालचाल करत गावात आणि घनसावंगी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीत गावातील सर्व समाजघटकांशी चर्चा करून सामंजस्याचा मार्ग काढण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वखुशीने निर्णय घेत दिनांक १५ एप्रिल रोजी संबंधित पुतळा विधिवत पूजा करून सन्मानाने हटवला. या प्रक्रियेत अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती जान्हवी शेखर, घनसावंगी चे तहसीलदार रमेश पागोटे तसेच गटविकास अधिकारी प्रदीप कदम यांनी मार्गदर्शन केले. प्रतिक्रिया सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारणे ही भावना आदराची असली तरी ती कायदेशीर चौकटीत राहूनच केली पाहिजे. पुतळा बसविण्यापूर्वी शासनाची आवश्यक परवानगी, ठरलेली प्रक्रिया आणि नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. महापुरुषांचा सन्मान हा नियमांचे पालन करूनच अधिक योग्य पद्धतीने करता येतो. - प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती जान्हवी शेखर प्रतिक्रिया अनधिकृत पुतळे उभारल्यास गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जांबसमर्थ अर्धाकृती पुतळा प्रकरणाबाबत ग्रामपंचायत कार्यालय व पोलीस ठाण्यात शांतता बैठका घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. दरम्यान, कोणताही वाद न वाढवता ग्रामस्थांनी दाखवलेला संयम व सामंजस्याचा मार्ग हा इतर गावांसाठीही नक्कीच आदर्श ठरेल अशी अपेक्षा. - सिद्धेश्वर धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड

- काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून १५ ठार, अनेक जखमी; बघा भयानक व्हिडिओ ! उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि. २० एप्रिल २०२६) सकाळी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.1
- शेतकऱ्यांनो मक्का ८०० रुपये क्विंटल दराने देण्यास तयार रहा असा इशारा राहुल देशमुख युवा काँग्रेस यांनी केला नाहीतर भारत अमेरिकेतील कृषी कराड रद्द करा1
- शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान! प्रयत्न आज करण्यात आला. शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान!1
- LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra MAX PARBHANI LIVE 11
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- तेलंगाना के बोर्ड के अध्यक्ष परभणी जिले के केंद्र निरीक्षक अजमतउल्लाह हुसैनी के नेतृत्व में जिंतूर शहर संगठन सूजन अभियान5
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा1
- ----- डॉ.किशोर प्रभाकर भोसले व डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड व डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या न्यु लाईफ हॉस्पिटलच्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ आष्टी / पाटोदा / शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडले. या नव्या रुग्णालयामध्ये स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी तसेच ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर अशा आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि सर्वसमावेशक उपचार व्यवस्था या मुळे बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना आता दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. डॉ.किशोर प्रभाकर भोसले (MBBS, MS, Fellow IVF) यांनी डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड, डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या सहकार्याने स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी व ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटरच्या सर्व सेवा-सुविधायुक्त रुग्णालय उभे करून बीड शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य रुग्णांकरिता अत्याधुनिक मशिनरी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सुलभ उपचार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विशेषतः ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय मोठा दिलासा ठरणार असून, वेळेवर व योग्य उपचार मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवण्यास मदत होईल. या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, ह.भ.प. कृष्णा महाराज उत्तराधिकारी श्री क्षेत्र भगवान गड, ह.भ.प.लक्ष्मण महाराज फड (कानिफनाथ संस्थान खडकवाडी), विलास बापू बडगे, वैजनाथ तांदळे, चंद्रकांत नवले (जिल्हाप्रमुख शिवसेना ), मदन जाधव, सखाराम मस्के, गुलाब भाऊ घुमरे, सुरचंद भोसले, अभिजित घुमरे, दत्ता साठे, शाम हुले, गणेश भोसले यांच्या सह विविध मान्यवर मंडळी व पदाधिकारी डॉक्टर मंडळी व नातेवाईक मंडळी उपस्थित होते.1