करोडो रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य आरोपी राहुल गायकवाडला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी नांदेडमध्ये करोडो रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणाने खळबळ उडाली आहे. वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल नागोराव गायकवाड (३८, रा. शिवरायनगर, नांदेड) याला न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जी. चव्हाण यांनी आरोपीला १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मौजे मेंढला खुर्द, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथील गट क्रमांक ७३ मधील २१ आर जमिनीचा १ कोटी २६ लाख रुपयांचा व्यवहार ठरवण्यात आला होता. यासाठी फिर्यादी देवेंद्र शांतीलाल शर्मा यांच्याकडून ३५ लाख रुपये बयाना व रोख स्वरूपात घेण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून हीच जमीन इतर व्यक्तींनाही विकल्याचे समोर आले. त्यामुळे फसवणुकीचे मोठे जाळे असल्याचा संशय निर्माण झाला आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८:५६ वाजता राहुल गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी ही कारवाई केली. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५ पीडित व्यक्तींची सुमारे २ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, एकाच जमिनीच्या अनेक बनावट सोदाचिट्ठ्या तयार करून आणखी १६ जणांची फसवणूक केल्याचा संशय आहे. यापैकी १२ जणांनी न्यायालयात दावे दाखल केल्याची माहिती आहे. फसवणुकीची रक्कम जप्त करणे, फरार आरोपी विशाल गोविंदराव गायकवाड आणि माणिक उर्फ बाबू सरोदे यांचा शोध घेणे, आरोपीचे हस्ताक्षर नमुने घेणे तसेच प्रॉपर्टी ब्रोकर आणि संभाव्य संघटित टोळीचा शोध घेणे बाकी असल्याने पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्येंजने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची सद्यस्थिती न्यायालयासमोर मांडली. फसवणुकीची रक्कम कुठे वळवण्यात आली, व्यवहारासाठी कोणते दस्तावेज वापरण्यात आले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रकरणातील कागदपत्रे, व्यवहाराच्या नोंदी आणि संबंधित व्यक्तींची चौकशीही महत्त्वाची ठरणार आहे. या तपासातून जमीन व्यवहारातील आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधासाठीही तपासाची चक्रे वेगाने फिरवल

- जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे1
- पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार - पालकमंत्री नरहरी झिरवाळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी हिंगोली :जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.1
- आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे . वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती1
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.1
- बोथी येथे चोरट्यांनी चार शेळ्या केल्या लंपास,पोलिसात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील बोथी येथून शेतकऱ्यांच्या चार शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी दि.15सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात शेळ्या चोरी बरोबर पशुधन चोरी घटना वरचेवर घडत आहेत. बोथी येथील शेतकरी केशव कृष्णा काळे यांनी आपल्या घरा शेजारी नेहमी प्रमाणे बांधलेल्या चार लहान मोठ्या शेळ्या किंमत २२ हजार रुपये, दि . ११ सप्टेबर रोजी सायंकाळी ते १२ सप्टेंबर पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास रामेश्वर तांडा पोलीस चौकी प्रमुख सिताराम मस्के करत आहेत.1