logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ग्राहकांनी ‘स्मार्ट’ निर्णय घ्यावा — महावितरणचे आवाहन.. स्मार्ट मीटरसाठी महावितरणची घराघरांत धडक मोहीम; गैरसमज दूर करत ग्राहकांना ‘स्मार्ट’ होण्याचे आवाहन शेगाव | प्रतिनिधी : वीज व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दिशेने ने स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी शेगावात घराघरांत थेट धडक मोहीम राबवली. पंधरवडाभर चाललेल्या या अभियानात शहरासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधत स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यात आले. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग, रिअल-टाईम वीज वापराची मोबाईलवर माहिती, वीज बचतीवर नियंत्रण आणि दिवसाच्या वापरावर प्रति युनिट ८० पैशांची सूट मिळणार असल्याची महत्त्वाची माहिती ग्राहकांना देण्यात आली. त्यामुळे जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याकडे ग्राहकांनी सकारात्मक पाऊल टाकावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजयसिंग मोहिते यांनी केले. घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या मोहिमेत ग्राहकांच्या शंकांचे तत्काळ निरसन करत अफवांना पूर्णविराम देण्यात आला. स्मार्ट मीटरमुळे वीज वापर व्यवस्थापन अधिक सुलभ, सुरक्षित आणि पूर्णतः पारदर्शक होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रचार मोहिमेत महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत जनजागृतीला वेग दिला. ग्राहकांनी ‘स्मार्ट’ निर्णय घ्यावा — महावितरणचे आवाहन

3 hrs ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
3 hrs ago
c793fa10-b98e-4386-895e-a40d88dbe468

ग्राहकांनी ‘स्मार्ट’ निर्णय घ्यावा — महावितरणचे आवाहन.. स्मार्ट मीटरसाठी महावितरणची घराघरांत धडक मोहीम; गैरसमज दूर करत ग्राहकांना ‘स्मार्ट’ होण्याचे आवाहन शेगाव | प्रतिनिधी : वीज व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दिशेने ने स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी शेगावात घराघरांत थेट धडक मोहीम राबवली. पंधरवडाभर चाललेल्या या अभियानात शहरासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधत स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यात आले. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग, रिअल-टाईम वीज वापराची मोबाईलवर माहिती, वीज बचतीवर नियंत्रण आणि दिवसाच्या वापरावर प्रति युनिट ८० पैशांची सूट मिळणार असल्याची महत्त्वाची माहिती ग्राहकांना देण्यात आली. त्यामुळे जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याकडे ग्राहकांनी सकारात्मक पाऊल टाकावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजयसिंग मोहिते यांनी केले. घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या मोहिमेत ग्राहकांच्या शंकांचे तत्काळ निरसन करत अफवांना पूर्णविराम देण्यात आला. स्मार्ट मीटरमुळे वीज वापर व्यवस्थापन अधिक सुलभ, सुरक्षित आणि पूर्णतः पारदर्शक होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रचार मोहिमेत महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत जनजागृतीला वेग दिला. ग्राहकांनी ‘स्मार्ट’ निर्णय घ्यावा — महावितरणचे आवाहन

More news from Buldhana and nearby areas
  • ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!
    1
    ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी..
राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी
शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.
“दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    19 hrs ago
  • खामगाव : खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलीला दुखापत झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ही घटना धार्मिक स्वरूपाची नसून वैयक्तिक वादातून घडली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल शिवाजीनगर परिसरात एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. हा दगड लागल्याने घरातील मुलीला दुखापत झाली. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.दगडफेकीची ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली. काही समाजकंटकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या आणि धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली आहे. यात कोणत्याही धार्मिक स्थळाचा किंवा दोन समाजांचा संबंध नाही.शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी नागरिकांना आवाहन केले की ​अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. ​शांतता राखा: उद्या शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करावा.कोणतीही संशयास्पद माहिती किंवा अफवा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.​पोलीस विभागाचा सायबर सेल सध्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.​नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
    3
    खामगाव : खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलीला दुखापत झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ही घटना धार्मिक स्वरूपाची नसून वैयक्तिक वादातून घडली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल शिवाजीनगर परिसरात एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. हा दगड लागल्याने घरातील मुलीला दुखापत झाली. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.दगडफेकीची ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली. काही समाजकंटकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या आणि धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली आहे. यात कोणत्याही धार्मिक स्थळाचा किंवा दोन समाजांचा संबंध नाही.शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी नागरिकांना आवाहन केले की ​अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
​शांतता राखा: उद्या शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करावा.कोणतीही संशयास्पद माहिती किंवा अफवा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.​पोलीस विभागाचा सायबर सेल सध्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.​नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    27 min ago
  • खामगाव: हमीद चौक परिसरात दोन गटात राडा; पोलीस प्रशासन सतर्क! #Khamgaon #Buldhana
    1
    खामगाव: हमीद चौक परिसरात दोन गटात राडा; पोलीस प्रशासन सतर्क! #Khamgaon #Buldhana
    user_DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    पत्रकार खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    1
    कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 min ago
  • आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतराने संपवले जीवन... तीन दिवसातील दोन घटनेने बुलढाणा शहरात अस्वस्थता.
    1
    आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतराने संपवले जीवन...
तीन दिवसातील दोन घटनेने बुलढाणा शहरात अस्वस्थता.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Ayaz patel Ayaz patel
    1
    Post by Ayaz patel Ayaz patel
    user_Ayaz patel Ayaz patel
    Ayaz patel Ayaz patel
    मुक्ताईनगर (एदलाबाद), जळगाव, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ​खामगाव : येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने खामगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने आज शहराच्या प्रमुख मार्गांवरून 'रूट मार्च' काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.सदर रूट मार्चची सुरुवात शहर पोलीस स्टेशन जवळील पोलीस मैदान येथून करण्यात आली. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेले हे संचलन शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि उत्सवाचा आनंद शांततेत साजरा व्हावा, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.​या रूट मार्चमध्ये दोन्ही पोलीस स्टेशनच्या प्रमुखांसह मोठा फौजफाटा तैनात होता. यामध्ये शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार , शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ​सुरेंद्र अहेरकर तसेच ​शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचेअमलदार,​होमगार्ड पथक सहभागी झाले होते.शिवजयंती निमित्त शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. रूट मार्चचा समारोप पुन्हा शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला. "नागरिकांनी शिवजयंतीचा उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
    2
    ​खामगाव : येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने खामगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने आज शहराच्या प्रमुख मार्गांवरून 'रूट मार्च' काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.सदर रूट मार्चची सुरुवात शहर पोलीस स्टेशन जवळील पोलीस मैदान येथून करण्यात आली. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेले हे संचलन शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि उत्सवाचा आनंद शांततेत साजरा व्हावा, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.​या रूट मार्चमध्ये दोन्ही पोलीस स्टेशनच्या प्रमुखांसह मोठा फौजफाटा तैनात होता. यामध्ये शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार , शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ​सुरेंद्र अहेरकर तसेच ​शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचेअमलदार,​होमगार्ड पथक सहभागी झाले होते.शिवजयंती निमित्त शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. रूट मार्चचा समारोप पुन्हा शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला. "नागरिकांनी शिवजयंतीचा उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.