शहापूरमधील आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन आणि श्रमजीवी संघटना उचलणार ठोस पाऊल ठाणे:शहापूर तालुक्यातील आधार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी, वन हक्क दावे आणि तीव्र पाणी टंचाई यांसारख्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, श्रमजीवी संघटना आणि विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत महसूल, ग्रामविकास, वन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी, तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनातर्फे एक कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात आला. या बैठकीत प्रामुख्याने आधारकार्ड नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असल्याने, येथील आदिम कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून तातडीने 'आधार कॅम्प' लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, मे महिन्यापर्यंत सर्व पात्र व्यक्तींचे आधार अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. वन हक्क दाव्यांच्या संदर्भातही बैठकीत कडक पवित्रा घेण्यात आला. तालुक्यातील साधारण २५० दावे ग्रामपंचायत आणि महसूल स्तरावर, तर ७०० हून अधिक दावे वनविभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांची पुढील १५ दिवसांत सखोल पडताळणी करून ती मंजुरीसाठी उपविभागीय समितीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तालुक्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेमार्फत 'वॉटर स्कॅर्सिटी मॅपिंग' करून टँकर पुरवठा आणि नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही पाड्याला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शहापूरचे गटविकास अधिकारी बाबुराव राठोड यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे आधार कार्ड, वन हक्क दावे आणि पाणी टंचाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आम्ही सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार केला असून मे महिन्यापर्यंत आधार नोंदणी पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल." या बैठकीला तहसीलदार परमेश्वर कासुले, गट विकास अधिकारी बाबुराव राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (ITDP) महेश कवडे, वनपरिक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले, विस्तार अधिकारी एन. एच. पाटील, विलास जाधव, बी. आर. वाघचौरे, दिनेश घोलप, यशवंत धोत्रे आणि जी. के. ठिकामे आणि सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्य संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, निरीक्षक लक्ष्मण चौधरी, सचिव प्रकाश खोडका, उपाध्यक्ष रुपेश आहिरे, विशाल मुकणे, दर्शना आगिवले, संघटक कैलास मुकणे, महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, महिला सचिव कल्पना वाघ, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे आणि माजी कातकरी प्रमुख संजय मुकणे यांनी उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

- 🔴 GBK NEWS अपडेट डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत मुंबई : Central Railway मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाल्याची घटना Dombivli स्थानकात घडली. कळवा कारशेडमधून Kalyanच्या दिशेने निघालेल्या लोकल ट्रेनचा एक डबा डोंबिवली स्थानक परिसरात रुळावरून घसरला. सुदैवाने ही लोकल रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील इतर लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली असून स्थानकांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रुळावरून घसरलेला डबा हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. #CentralRailway #Dombivli #MumbaiLocal #BreakingNews #GBKNews1
- 2दिनों में ही मुंब्रा में टीएमसी द्वारा बनाए गए स्पीड ब्रेकर में हुआ खड्डा।#mumbra #viralvideo #news1
- नमाज़ वाले विज्ञापन पर घिरीं Namita Thapar, सोशल मीडिया पर बढ़ा विवाद न्यूज़: बिजनेस लीडर और Shark Tank India की जज Namita Thapar एक विज्ञापन को लेकर विवादों में आ गई हैं। रिपोर्ट्स के मुताबिक, यह ऐड नमाज़ के फायदों से जुड़ा था, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया। इसके बाद कई लोगों ने इस विज्ञापन को अलग-अलग तरीके से समझा और उनके खिलाफ नकारात्मक टिप्पणियां और ट्रोलिंग शुरू हो गई। कुछ यूज़र्स ने आपत्तिजनक भाषा का भी इस्तेमाल किया, जिससे यह मुद्दा करीब 3 हफ्तों तक सोशल मीडिया पर चर्चा में बना रहा। विवाद बढ़ने के बाद नमिता थापर ने एक वीडियो संदेश जारी किया, जिसमें उन्होंने कहा, “silence is not a virtue” और अगर किसी के साथ अपमान या अन्याय होता है तो उसके खिलाफ आवाज़ उठानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि वह पहले से ही ट्रोलिंग का सामना करती रही हैं, लेकिन उनका फोकस जागरूकता और सम्मान पर है। इस पूरे मामले में जहां कुछ लोगों ने उनका समर्थन किया और इसे मानवता के नजरिए से देखने की बात कही, वहीं कुछ ने धार्मिक दृष्टिकोण से आपत्ति जताई। #NamitaThapar #SharkTankIndia #Controversy #Namaz #SocialMedia #ViralNews #IndiaNews1
- 👉फॉलो करिए MH48 Vocal For Local पेज को और डिजिटल आइए 🤳 Facebook & Instagram पर फॉलो करें और पाए फ्री प्रमोशन 🎦 👉सब्जी विक्रेता 👈 📍 संगम निषाद आचोले तलाव के सामने, विट्ठल मंदिर के पास, नालासोपारा (ईस्ट), 401209 मोबाइल : +91 73875 47127 #vocalforlocal #nalasopara #localvendors #virar #vasaivirar #vegitablevendor #supportlocal #vasai1
- कुर्ला ईस्ट बस डिपो पर दोपहर के समय यात्रियों का कहना है ।सभी जगा के बस छोड़े जाते है लेकिन गडकर क्वारी बस 367 नहीं छोड़ते और हमे ऐसे ही धूप में लंबे समय तक इंतजार करना पड़ता है1
- ओवळा–माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्यनगर विभागात राबविण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. जुन्या विहिरींना नवसंजीवनी देत, जलसंधारणाचा हा उपक्रम परिसराला अधिक जलसमृद्ध आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरत आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रात विहीर पुनरुज्जीवनाचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग ठरला आहे.1
- संसदेत भारतीय जनता पार्टी ने सादर केलेले विधेयक ना मंजूर झाले आहे, सदर विधेयक काँग्रेस मुळे नामंजूर झाल्याचा ठपका ठेवत भाजपने देशभरात काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केले असून काँग्रेसही भारतीय जनता पार्टीचा दु टप्पीपणा समोर आणण्यासाठी व्यूह रचना करत आहे, यावर प्रकाश झोत टाकणारे संपादकीय1
- 🚨 ब्रेकिंग न्यूज | GBK NEWS | कल्याण 🚨 कल्याणमध्ये नव्या मराठी तरुणांचा उद्यमशीलतेकडे मोठा पाऊल 👇 कल्याण पश्चिम परिसरात डी.बी. चौकाजवळ सुधीर चव्हाण यांच्या मुलाने व त्याच्या दोन मित्रांनी "फुडी फीस्ट" या नावाने हॉटेल व्यवसायात दमदार पदार्पण केले आहे. 🍽️ ग्राहकांसाठी खास काय? 👉 टेस्टी नॉनव्हेज आणि व्हेज डिशेसची खास मेजवानी 👉 चव आणि गुणवत्ता यांचा उत्तम संगम 📍 लोकेशन: कल्याण वेस्ट, डी.बी. चौकाजवळ – सहज पोहोचण्याजोगे ठिकाण 🧼 स्वच्छतेवर भर: 👉 पूर्णपणे हायजेनिक वातावरण 👉 क्लीननेस आणि गुणवत्ता याला प्राधान्य 👏 विशेष बाब: मराठी तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात टाकलेले हे पाऊल कौतुकास्पद असून स्थानिकांकडून त्यांचे स्वागत होत आहे. 💬 “स्थानिक तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभा करणं ही अभिमानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 📢 GBK NEWS | सत्याचा आवाज जनतेसाठी1
- Post by AA Media Services1