*प्रशासनाचा अजब कारभार: निधी हडपण्यासाठी कचराकुंडीजवळ नवीन शौचालयाचा घाट; बदनापूर शहरातील जुन्या शौचालयाची दुरुस्ती मात्र रखडली* *प्रशासनाचा अजब कारभार: निधी हडपण्यासाठी कचराकुंडीजवळ नवीन शौचालयाचा घाट; बदनापूर शहरातील जुन्या शौचालयाची दुरुस्ती मात्र रखडली* बदनापूर / प्रतिनिधी /नगरपंचायत प्रशासनाचा एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. नगरपंचायत कार्यालयाच्या अगदी पाठीमागे असलेले जुने सार्वजनिक शौचालय केवळ किरकोळ दुरुस्तीअभावी बंद पडले आहे. स्वतःच्या नाकाखाली असलेली ही गैरसोय दूर करण्याचे सोडून प्रशासनाने गावापासून तब्बल ३ किलोमीटर अंतरावर, एका कचराकुंडीजवळ नवीन शौचालयाचे काम सुरू केले आहे. या निर्जन आणि दुर्गंधीयुक्त ठिकाणी शौचालय बांधून नागरिकांचा काहीच उपयोग होणार नाही. हे काम केवळ शासकीय निधीचा गैरवापर करून कंत्राटदारांची बिले काढण्यासाठीच सुरू असल्याचा घणाघाती आरोप संतप्त बदनापूरकरांमधून केला जात आहे. *दिव्याखाली अंधार;* नगरपंचायतीच्या पाठीमागील शौचालय बंद: नगरपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे असलेले शौचालय बंद असल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांचे, महिलांचे आणि वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र, प्रशासनाला याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ नाही. *फक्त बिले काढण्यासाठी निधीचा वापर:* बदनापूरकरांच्या गरजेचा विचार न करता केवळ बजेट संपवण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ३ किलोमीटर दूर असलेल्या निरुपयोगी जागेची निवड केल्याचा आरोप होत आहे. *कचराकुंडीजवळ दुर्गंधीचे साम्राज्य:* आधीच कचऱ्याची दुर्गंधी असलेल्या ठिकाणी नवीन शौचालय बांधल्यास तिथे कोणीही वापर करायला फिरकणार नाही. परिणामी, हा लाखो रुपयांचा शासकीय निधी पूर्णपणे पाण्यात जाणार आहे. *काम तातडीने रद्द करण्याची मागणी:* कचराकुंडीच्या आडोशाला सुरू असलेले हे चुकीचे काम प्रशासनाने तातडीने रद्द करावे आणि नगरपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बंद पडलेले मुख्य शौचालय त्वरित दुरुस्त करून नागरिकांसाठी सुरू करावे, अशी आक्रमक मागणी आता बदनापूरच्या नागरिकांकडून होत आहे.
*प्रशासनाचा अजब कारभार: निधी हडपण्यासाठी कचराकुंडीजवळ नवीन शौचालयाचा घाट; बदनापूर शहरातील जुन्या शौचालयाची दुरुस्ती मात्र रखडली* *प्रशासनाचा अजब कारभार: निधी हडपण्यासाठी कचराकुंडीजवळ नवीन शौचालयाचा घाट; बदनापूर शहरातील जुन्या शौचालयाची दुरुस्ती मात्र रखडली* बदनापूर / प्रतिनिधी /नगरपंचायत प्रशासनाचा एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. नगरपंचायत कार्यालयाच्या अगदी पाठीमागे असलेले जुने सार्वजनिक शौचालय केवळ किरकोळ दुरुस्तीअभावी बंद पडले आहे. स्वतःच्या नाकाखाली असलेली ही गैरसोय दूर करण्याचे सोडून प्रशासनाने गावापासून तब्बल ३ किलोमीटर अंतरावर, एका कचराकुंडीजवळ नवीन शौचालयाचे
काम सुरू केले आहे. या निर्जन आणि दुर्गंधीयुक्त ठिकाणी शौचालय बांधून नागरिकांचा काहीच उपयोग होणार नाही. हे काम केवळ शासकीय निधीचा गैरवापर करून कंत्राटदारांची बिले काढण्यासाठीच सुरू असल्याचा घणाघाती आरोप संतप्त बदनापूरकरांमधून केला जात आहे. *दिव्याखाली अंधार;* नगरपंचायतीच्या पाठीमागील शौचालय बंद: नगरपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे असलेले शौचालय बंद असल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांचे, महिलांचे आणि वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र, प्रशासनाला याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ नाही. *फक्त बिले काढण्यासाठी निधीचा वापर:* बदनापूरकरांच्या गरजेचा विचार न करता केवळ बजेट संपवण्यासाठी आणि आर्थिक
फायद्यासाठी ३ किलोमीटर दूर असलेल्या निरुपयोगी जागेची निवड केल्याचा आरोप होत आहे. *कचराकुंडीजवळ दुर्गंधीचे साम्राज्य:* आधीच कचऱ्याची दुर्गंधी असलेल्या ठिकाणी नवीन शौचालय बांधल्यास तिथे कोणीही वापर करायला फिरकणार नाही. परिणामी, हा लाखो रुपयांचा शासकीय निधी पूर्णपणे पाण्यात जाणार आहे. *काम तातडीने रद्द करण्याची मागणी:* कचराकुंडीच्या आडोशाला सुरू असलेले हे चुकीचे काम प्रशासनाने तातडीने रद्द करावे आणि नगरपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बंद पडलेले मुख्य शौचालय त्वरित दुरुस्त करून नागरिकांसाठी सुरू करावे, अशी आक्रमक मागणी आता बदनापूरच्या नागरिकांकडून होत आहे.
- जालन्यात पुन्हा थरार एक ४० वर्षिया तरुणाची धारदार शस्त्र ने अज्ञात हल्लेखोरांनी खपा खप धारदार शस्त्र ने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली कानून आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..1
- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; खासदार सोनवणे यांची मागणी मराठवाड्यात यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दुष्काळी मदत व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.1
- नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी माननीय मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना धीर देत, घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दिला.1
- छत्रपती संभाजीनगर...शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छत्रपती संभाजीनगर... शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ANC : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन अर्थात मुप्टा संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, यासह इतर विविध मागण्या शिक्षकांनी प्रशासनासमोर मांडल्या. यासंदर्भात मुप्टाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या मागण्यांवर काय निर्णय घेतो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. बाईट- मुप्टा शिक्षक संघटना अध्यक्ष राजेंद्र जाधव2
- 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService1
- चार लाख भाविकांनी खुलताबाद येथे पैगंबर मोहम्मद सल्ललाहुअलैह व सल्लम यांचे पोशाख व मू ए मुबारक चे दर्शन घेतले,1
- जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव1