कुर्ला-शालीमार एक्स्प्रेसच्या चाकातून निघाला धूर, नागरिकांची तारांबळ मुंबईकडून हावडाकडे धावणारी गाडी क्रमांक १८०२९ या कुर्ला शालीमार एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्यातील चाक जाम झाल्याने त्यातून धूर निघू लागला. परिणामी गाडीला थांबवून वेळीच अग्निशमन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले. ही घटना शनिवारी (दि.१८) दुपारी ३:३० वाजता एमआयडीसी मुंडीपारजवळ (किलोमीटर क्रमांक १०१०-२७) घडली. रेल्वे प्रवाशांना मुंबईच्या कुर्ला येथून घेऊन शालीमारकडे निघालेली कुर्ला-शालीराम एक्स्प्रेस गाडी क्रमांक १८०२९ ही शनिवारी (दि.१८) तिरोडा येथून गोंदियाच्या दिशेने निघाली असता या गाडीच्या सर्वात मागच्या डब्याचे चाक जाम झाले. गाडीचा सर्वात शेवटचा डबा हा गार्डचा असतो. गार्डच्या डब्याजवळ प्रवाशांसाठी असलेल्या मागून पहिल्या डब्यालाच चाक जाम झाल्याने तो घासत होता व घर्षणामुळे त्यातून धूर निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आल्याने गार्डने वेळीच वॉकीटॉकीवर चालकाला सूचना दिली. त्यामुळे चालकाने किलोमीटर क्रमांक १०१०-२७ जवळ ही गाडी थांबविली. त्या डब्यातील प्रवाशांना वेळीच खाली उतरवून गाडीतील अग्निशमन यंत्र आणून धूर निघणाऱ्या ठिकाणी वापर करून धुरावर नियंत्रण मिळविण्यात आले. या प्रकाराची सूचना रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांना मिळताच रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक पांडे व रेल्वे पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनील उईके यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. ....... तब्बल अर्धा तास थांबली गाडी - चाकातून निघणाऱ्या धुरामुळे आग लागल्याची वार्ता प्रवाशांच्या कानी पडताच त्यांच्यात तारांबळ उडाली. गाडी थांबवल्यावर प्रवासी झटपट गाडीतून खाली उतरले. तब्बल अर्धा तास ही गाडी तेथे थांबविल्यानंतर ३:५० वाजता घटनास्थळावरून सुरू करून दुपारी ४:१० वाजता गोंदिया रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सुखरूप घेऊन पोहोचली. ...... इंजिनिअरकडून तपासणी व त्यानंतर पुढचा प्रवास - ही गाडी गोंदिया रेल्वेस्थानकावर येताच रेल्वेच्या सीएनडब्ल्यूच्या इंजिनिअरने धूर निघणाऱ्या जागेची पाहणी करून चाक जाम झाल्यामुळे धूर निघत असल्याचे सांगितले. ते चाक फ्री (सैल) करण्यात आले. तब्बल १० मिनिटांचा थांबा गोंदिया रेल्वेस्थानकावर देण्यात आला. त्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आली.

- Post by Brajvir Singh1
- राजस्थान के बालोतरा में पचपदरा रिफाइनरी के लोकार्पण कार्यक्रम से पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का प्रस्तावित दौरा रद्द होने के बाद स्थानीय स्तर पर की गई तैयारियों पर असर पड़ा है। दौरा रद्द होने के बाद पहले से तैयार भोजन के उपयोग को लेकर चर्चा तेज हो गई है। जानकारी के अनुसार, कार्यक्रम को देखते हुए बड़े पैमाने पर खान-पान की व्यवस्था की गई थी। इसमें कई क्विंटल आटे से बनी पूड़ियां, मिर्च का कूटा और बड़ी मात्रा में मिठाइयां तैयार की गई थीं। दौरा रद्द होने के बाद यह खाद्य सामग्री अब बेकार होने की स्थिति में पहुंच गई है, जिससे स्थानीय हलवाइयों और कारीगरों को आर्थिक नुकसान की चिंता सता रही है। बताया जा रहा है कि तैयार भोजन पहले ही बनकर तैयार था। अब सबसे बड़ा सवाल यह है कि इस भोजन को जरूरतमंदों तक पहुंचाया जाएगा या यह व्यर्थ चला जाएगा। फिलहाल मामले को लेकर स्थानीय स्तर पर चर्चा जारी है।1
- जज को केस से हटाने वाली केजरीवाल की याचिका खारिज: जस्टिस स्वर्णकांता बोलीं- मैं हटी तो संदेश जाएगा दबाव डालकर जज हटा सकते हैं1
- Post by RASHTRA SEARCH NEWS1
- Post by Bharatiya Jan KRANTI SENA1
- कांग्रेस नेता रमन त्यागी पहुंचे परशुराम जन्मोत्सव समारोह में । श्री ब्राह्मण सभा ने किया रमन त्यागी का स्वागत और स्मृति चिन्ह भेंट कर किया धन्यवाद।1
- Post by Jitubhai barot1
- Post by RASHTRA SEARCH NEWS1