logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 3.0 साठी वैज्ञानिक आराखडे तयार करा; राज्यातील एकही भाग उपचाराविना राहू नये : डॉ. जितेंद्र पापळकर नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (पाणलोट विकास घटक) 3.0 अंतर्गत राज्यातील प्रत्येक क्षेत्राचा समावेश होईल, यासाठी वैज्ञानिक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करणे आवश्यक असून राज्यातील कोणताही भाग उपचाराविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ. जितेंद्र पापळकर यांनी दिले. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत मृद व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा परिषदांच्या कार्यकारी अभियंत्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करताना स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, जलसंधारण क्षमता, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि हवामान बदलाच्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे डॉ. पापळकर यांनी सांगितले. केवळ कामांची यादी न करता वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित, लोकाभिमुख आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम आराखडे तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेचा शुभारंभ जलपूजनाने झाला. यावेळी मृद व जलसंधारण विभागाच्या आयुक्त प्रतिभा इंगळे, वाल्मीचे महासंचालक सुनील कुशिरे, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज, सहसचिव सुशिला यादव, मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, नितीन दुसाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त प्रधान सचिव पी. एल. बोंगीरवार, उपसचिव पी. के. जाधव, उपसचिव मृदुला देशपांडे तसेच वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे उपस्थित होते. कमलाकर रणदिवे यांनी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 3.0 अंतर्गत प्राथमिक प्रकल्प अहवालासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपांची माहिती देत अचूक माहिती संकलन, क्षेत्रनिहाय नियोजन आणि गुणवत्तापूर्ण माहिती भरण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त प्रधान सचिव पी. एल. बोंगीरवार यांनी "नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे पुलाचे जलसाठा संरचनेत रूपांतर" या विषयावर मार्गदर्शन केले. इलिप्टिकल काँक्रीट कमानीच्या तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान पुलांचे जलसाठा संरचनेत रूपांतर करून कमी खर्चात जलसाठा वाढविणे, भूजल पुनर्भरणाला चालना देणे आणि जलउपलब्धता वाढविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत जलयुक्त शिवार अभियान टप्पा 3.0, शंभर टक्के क्षेत्र उपचाराचे उद्दिष्ट तसेच गुणवत्तापूर्ण प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या मार्गदर्शनाचा उपयोग करून राज्यातील जलसंधारण आणि पाणलोट विकासाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील, असा विश्वास सहभागी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

15 hrs ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
15 hrs ago
32ae38d3-e526-4d96-8696-f6d0a00e46b5

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 3.0 साठी वैज्ञानिक आराखडे तयार करा; राज्यातील एकही भाग उपचाराविना राहू नये : डॉ. जितेंद्र पापळकर नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (पाणलोट विकास घटक) 3.0 अंतर्गत राज्यातील प्रत्येक क्षेत्राचा समावेश होईल, यासाठी वैज्ञानिक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करणे आवश्यक असून राज्यातील कोणताही भाग उपचाराविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ. जितेंद्र पापळकर यांनी दिले. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत मृद व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा परिषदांच्या कार्यकारी अभियंत्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करताना स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, जलसंधारण क्षमता, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि हवामान बदलाच्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे डॉ. पापळकर यांनी सांगितले. केवळ कामांची यादी न करता वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित, लोकाभिमुख आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम आराखडे तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेचा शुभारंभ जलपूजनाने झाला. यावेळी मृद व जलसंधारण विभागाच्या आयुक्त प्रतिभा इंगळे, वाल्मीचे महासंचालक सुनील

0f7d4038-ff66-416f-9cd8-6fd52bdae476

कुशिरे, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज, सहसचिव सुशिला यादव, मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, नितीन दुसाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त प्रधान सचिव पी. एल. बोंगीरवार, उपसचिव पी. के. जाधव, उपसचिव मृदुला देशपांडे तसेच वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे उपस्थित होते. कमलाकर रणदिवे यांनी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 3.0 अंतर्गत प्राथमिक प्रकल्प अहवालासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपांची माहिती देत अचूक माहिती संकलन, क्षेत्रनिहाय नियोजन आणि गुणवत्तापूर्ण माहिती भरण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त प्रधान सचिव पी. एल. बोंगीरवार यांनी "नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे पुलाचे जलसाठा संरचनेत रूपांतर" या विषयावर मार्गदर्शन केले. इलिप्टिकल काँक्रीट कमानीच्या तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान पुलांचे जलसाठा संरचनेत रूपांतर करून कमी खर्चात जलसाठा वाढविणे, भूजल पुनर्भरणाला चालना देणे आणि जलउपलब्धता वाढविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत जलयुक्त शिवार अभियान टप्पा 3.0, शंभर टक्के क्षेत्र उपचाराचे उद्दिष्ट तसेच गुणवत्तापूर्ण प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या मार्गदर्शनाचा उपयोग करून राज्यातील जलसंधारण आणि पाणलोट विकासाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील, असा विश्वास सहभागी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    1
    9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची  जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    user_Nilesh Nana Dhinda
    Nilesh Nana Dhinda
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बदापूर-ब्राह्मणगाव रस्त्याची दैनंदिन दुरवस्था: संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतली; नागरिक हैराण ​येवला:दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बदापूर ते ब्राह्मणगाव रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे रोजच लहान-मोठी वाहने फसण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास मोठा उशीर झाला. ​या रस्त्यावरून दररोज दुचाकी, छोटा हत्ती आणि ट्रॅक्टरसारखी वाहने चिखलात अडकून पडतात. आज अचानक शाळेची बस रस्त्यातच रुतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्यात आली. ​दोन जिल्ह्यांमधील दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर तातडीने 'रस्त्याचे' काम करून रस्ता दुरुस्त करावा, अशी तीव्र मागणी त्रस्त ग्रामस्थ व पालकांकडून केली जात आहे
    1
    बदापूर-ब्राह्मणगाव रस्त्याची दैनंदिन दुरवस्था: संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतली; नागरिक हैराण
​येवला:दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बदापूर ते ब्राह्मणगाव रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे रोजच लहान-मोठी वाहने फसण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळी संजीवनी स्कूलची बस चिखलात रुतल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास मोठा उशीर झाला.
​या रस्त्यावरून दररोज दुचाकी, छोटा हत्ती आणि ट्रॅक्टरसारखी वाहने चिखलात अडकून पडतात. आज अचानक शाळेची बस रस्त्यातच रुतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्यात आली.
​दोन जिल्ह्यांमधील दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर तातडीने 'रस्त्याचे' काम करून रस्ता दुरुस्त करावा, अशी तीव्र मागणी त्रस्त ग्रामस्थ व पालकांकडून केली जात आहे
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..
    1
    मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam
    1
    Available for Sale
Locality : Mumbra
Area (dimensions) : 1035
Property Type : Flat / Apartment
Property Condition : New
Bedrooms (BHK) : 2 BHK
Furnishing : Fully Furnished
sanam
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा आता रस्त्यावर उतरून लढा! "ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर सामान्य माणसाची"; क्रांतीदिनी चक्काजाम जनआंदोलनाची दिली हाक मुंबई, दि. ३१ जुलै २०२६ : पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही," असे तांबे यांनी स्पष्ट केले.पुणे–नाशिक दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिकदरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, "केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो," असे आमदार तांबे यांनी ठामपणे सांगितले. शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "हे आंदोलन कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे."
    1
    नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा आता रस्त्यावर उतरून लढा!
"ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर सामान्य माणसाची"; क्रांतीदिनी चक्काजाम जनआंदोलनाची दिली हाक
मुंबई, दि. ३१ जुलै २०२६ : पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.
यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
"हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही," असे तांबे यांनी स्पष्ट केले.पुणे–नाशिक दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिकदरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे.
सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, "केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो," असे आमदार तांबे यांनी ठामपणे सांगितले.
शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "हे आंदोलन कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे."
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मुम्ब्रा के शिमला पार्क पर शुरू हुआ नया ट्रैफिक सिग्नल! स्थानीय युवक शानावाज खान ने दी जानकारी...!
    1
    मुम्ब्रा के शिमला पार्क पर शुरू हुआ नया ट्रैफिक सिग्नल! स्थानीय युवक शानावाज खान ने दी जानकारी...!
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नाशिक मध्ये एका वर जीवघेणा हल्ला नाशिकमध्ये नवयुकांमध्ये गुन्हेगारीचे वाढते प्रमाण
    1
    नाशिक मध्ये एका वर जीवघेणा हल्ला नाशिकमध्ये नवयुकांमध्ये गुन्हेगारीचे वाढते प्रमाण
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.