logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वातावरण बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका; शहापूर तालुक्यात मोठी फळगळ ठाणे:शहापूर तालुक्यात यंदाच्या आंबा हंगामावर मोठे संकट ओढावले असून सततचे ढगाळ वातावरण, वाढती उष्णता आणि बदलते हवामान यामुळे आंबा झाडांवरील फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. प्राथमिक पाहणीत सुमारे ७० टक्के आंबा पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, यामुळे बागायतदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तालुक्यातील एकूण ५७६ हेक्टर क्षेत्रावरील उत्पादनक्षम आंबा बागांना या परिस्थितीचा थेट फटका बसला आहे. शहापूर तालुक्यातील डोंगराळ आणि ग्रामीण भागात आंबा शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागातील शेतकरी मोठा खर्च करून बागांची निगा राखतात, कीडनियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनावर भर देतात. मात्र, यंदा हवामान बदलामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून, त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला आंबा हंगाम धोक्यात आला आहे. फळगळ अशीच सुरू राहिल्यास केवळ उत्पादन घटणार नाही, तर बाजारात पुरवठा कमी होऊन दरांवरही परिणाम होईल. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली असून कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संयुक्त पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीच्या आधारे नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासन स्तरावर या अहवालावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

9 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
9 hrs ago
93655648-f783-4abf-a782-4cc223749733

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • राज्यसभेची जागा शरद पवार यांना दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत वाद सुरू झाले असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत हा वाद उफाळून आला आहे
    1
    राज्यसभेची जागा शरद पवार यांना दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत वाद सुरू झाले असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत हा वाद उफाळून  आला आहे
    user_Mahesh Dhanke
    Mahesh Dhanke
    पत्रकार मुरबाड, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अंबरनाथ प्रशासन नगरपालिका शिव मंदिर
    1
    अंबरनाथ प्रशासन नगरपालिका शिव मंदिर
    user_Amol bone
    Amol bone
    अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    46 min ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • प्रेसिडेंट कप इंडिया 2026 का उद्घाटन करने पहुंचे बॉलीवुड के भाईजान सलमान खान BNN NEWS
    1
    प्रेसिडेंट कप इंडिया 2026 का उद्घाटन करने पहुंचे बॉलीवुड के भाईजान सलमान खान BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes
    1
    मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Sanjay Dsilva
    1
    Post by Sanjay Dsilva
    user_Sanjay Dsilva
    Sanjay Dsilva
    Security Guard वसई, पालघर, महाराष्ट्र•
    19 min ago
  • CM योगी की मां पर की थी अभद्र टिप्पणी दर्द से लंगड़ाता मौलाना जेल भेजा गया है मौलाना अब्दुल्ला सलीम, जिसने CM योगी की मां पर अभद्र की थी और आज यूपी STF बिहार से उठा लाई फिर थाने में इसकी ऐसी खातिरदारी कर दी कि चाल ही बदल गई #Bahraich #upstf #bihar #Uppolice
    1
    CM योगी की मां पर की थी अभद्र टिप्पणी
दर्द से लंगड़ाता मौलाना जेल भेजा गया
है मौलाना अब्दुल्ला सलीम, जिसने CM योगी की मां पर अभद्र की थी और आज यूपी STF बिहार से उठा लाई फिर थाने में इसकी ऐसी खातिरदारी कर दी कि चाल ही बदल गई
#Bahraich #upstf #bihar #Uppolice
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अंबड तालुक्यातील महाकाळा परिसरात आज सायंकाळी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या तीन युवकांवर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन तरुण जागीच मृत्युमुखी पडले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपशील: आज सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती परिसरात ही घटना घडली. अचानक आलेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी तीन तरुणांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. याच दरम्यान झाडावर जोरदार वीज कोसळली. यामध्ये: १. गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१ वर्षे) – जागीच मृत्यू. २. आदित्य दगडू बेद्रे (वय २० वर्षे) – जागीच मृत्यू. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यवाही: घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्याची प्रक्रिया सुरू असून, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तातडीने घटनास्थळाचा पंचनामा व सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन स्तरावरून मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
    1
    अंबड  तालुक्यातील महाकाळा परिसरात आज सायंकाळी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या तीन युवकांवर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन तरुण जागीच मृत्युमुखी पडले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेचा तपशील:
आज सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती परिसरात ही घटना घडली. अचानक आलेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी तीन तरुणांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. याच दरम्यान झाडावर जोरदार वीज कोसळली. यामध्ये:
१. गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१ वर्षे) – जागीच मृत्यू.
२. आदित्य दगडू बेद्रे (वय २० वर्षे) – जागीच मृत्यू.
या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रशासकीय कार्यवाही:
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्याची प्रक्रिया सुरू असून, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तातडीने घटनास्थळाचा पंचनामा व सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन स्तरावरून मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
    user_Mahesh Dhanke
    Mahesh Dhanke
    पत्रकार मुरबाड, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.