श्री. गो.से.हायस्कूलमध्ये श्री.आर.बी.तडवी सरांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न श्री. गो.से.हायस्कूलमध्ये श्री.आर.बी.तडवी सरांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल येथे पर्यवेक्षक श्री.आर.बी.तडवी सर 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर यांनी केले. संस्थेचे चेअरमन मा.नानासाहेब श्री.संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते श्री.आर.बी.तडवी सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन मा.नानासाहेब श्री.व्ही.टी.जोशी, ज्येष्ठ संचालक मा. दादासाहेब श्री.अर्जुनदास पंजाबी, मा.आबासाहेब श्री.भागवत महालपुरे , मा.बापूसाहेब श्री. प्रकाश पाटील ,संस्थेचे मान्यवर, माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक,आप्तेष्ट व नातलग यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री.आर.एल पाटील, पर्यवेक्षिका सौ.ए.आर. गोहिल ,पर्यवेक्षक श्री.आर.बी.बांठिया, क्रीडा प्रमुख श्री.एस.पी. करंदे, कार्यालयीन प्रमुख श्री.ए.बी.सिनकर, किमान कौशल्य प्रमुख श्री.मनीष बाविस्कर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब श्री.व्ही.टी.जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.तडवी सरांना भावी निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापक श्री.आर .एल .पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एम.टी.कौंडिण्य, सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव चे मुख्याध्यापक श्री.ए.बी.अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. आर बी.बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.आर.एन.सपकाळे यांनी केले.

- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- Post by Swal Jansamannyaca ...1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- Post by Jansagar 9 Marathi1
- पैठण तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पैठण तालुक्यात आज अवकाळी गारांचा जोरदार पाऊस झाला. रांजणगाव, दांडगा परिसरात अचानक वातावरण बदलून आकाशात काळे ढग दाटले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारांच्या तडाख्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.1