logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील पक्ष कार्यालयात तसेच शिरूर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून अनेक विकास प्रकल्प साकार झाले असून त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी विविध जनकल्याणाच्या योजना मार्गी लावल्याचे सांगत पाचर्णे यांनी आदरांजली वाहिली. या प्रसंगी नगरपालिकेचे सभापती स्वाती साठे, सभापती सुनील जाधव, एजाज बागवान, उपसभापती आयेशा सय्यद, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक अभिजित पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या श्रुतिका झांबरे, शहराध्यक्ष शरद कालेवार, माजी सभापती संतोष शितोळे आणि रंजन झांबरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याच जयंतीचे औचित्य साधून शिरूर-हवेली मतदारसंघात 'जनसेवा सप्ताह' अंतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या पुढाकारातून तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही शिबिरे सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत होतील. वेळापत्रकानुसार, शिरूर ग्रामीण रुग्णालयात २३ जुलै, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात २४ जुलै आणि न्हावरे ग्रामीण रुग्णालयात २६ जुलै रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत आरोग्य शिबिरांमध्ये रक्तगट व रक्तशर्करा तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, माता व बाल आरोग्य सेवा, असंसर्गजन्य आजार (एनसीडी) तपासणी, गरजेनुसार मोफत औषध वाटप, आरोग्य जनजागृती व समुपदेशन तसेच गंभीर रुग्णांना पुढील उच्चस्तरीय उपचारासाठी संदर्भ (रेफरल) सेवा पुरवण्यात येणार आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना स्वतःसह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून या मोफत उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

5 hrs ago
user_Satish Dhumal
Satish Dhumal
Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
5 hrs ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील पक्ष कार्यालयात तसेच शिरूर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून अनेक विकास प्रकल्प साकार झाले असून त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी विविध जनकल्याणाच्या योजना मार्गी लावल्याचे सांगत पाचर्णे यांनी आदरांजली

53e19ef6-2f2f-4748-97e7-3b5d5c4c7074

वाहिली. या प्रसंगी नगरपालिकेचे सभापती स्वाती साठे, सभापती सुनील जाधव, एजाज बागवान, उपसभापती आयेशा सय्यद, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक अभिजित पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या श्रुतिका झांबरे, शहराध्यक्ष शरद कालेवार, माजी सभापती संतोष शितोळे आणि रंजन झांबरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याच जयंतीचे औचित्य साधून शिरूर-हवेली मतदारसंघात 'जनसेवा सप्ताह' अंतर्गत नागरिकांसाठी

a63c4a4f-84ef-4102-8c27-c35dfdb229c8

मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या पुढाकारातून तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही शिबिरे सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत होतील. वेळापत्रकानुसार, शिरूर ग्रामीण रुग्णालयात २३ जुलै, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात २४ जुलै आणि न्हावरे ग्रामीण रुग्णालयात २६ जुलै रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत आरोग्य शिबिरांमध्ये रक्तगट व

39be1779-5c19-414e-957b-23ee8e14444e

रक्तशर्करा तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, माता व बाल आरोग्य सेवा, असंसर्गजन्य आजार (एनसीडी) तपासणी, गरजेनुसार मोफत औषध वाटप, आरोग्य जनजागृती व समुपदेशन तसेच गंभीर रुग्णांना पुढील उच्चस्तरीय उपचारासाठी संदर्भ (रेफरल) सेवा पुरवण्यात येणार आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना स्वतःसह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून या मोफत उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबईमध्ये काँग्रेसकडून सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले असून या वेळी आंदोलकांनी सरकारविरोधी तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना अटक केली आहे.
    1
    मुंबईमध्ये काँग्रेसकडून सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले असून या वेळी आंदोलकांनी सरकारविरोधी तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना अटक केली आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पुण्यातील हडपसर साडेसतरानळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अमनोरा पार्क आणि मुंढवा या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून या समस्येकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन केले. या वेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवण्यात आला असून, हा रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    1
    पुण्यातील हडपसर साडेसतरानळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अमनोरा पार्क आणि मुंढवा या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून या समस्येकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन केले. या वेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवण्यात आला असून, हा रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमध्ये जातपंचायतीच्या बेकायदेशीर कारभाराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील एका विवाहितेला न्यायालयाला डावलून जातपंचायतीने एकतर्फी घटस्फोट दिला असून तिला सामाजिक बहिष्काराची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतरही सातारा आणि इचलकरंजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आहे. जातपंचायतीच्या या अघोरी कारभाराविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली असून, दोषींवर तातडीने कारवाई करून पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    पिंपरी-चिंचवडमध्ये जातपंचायतीच्या बेकायदेशीर कारभाराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील एका विवाहितेला न्यायालयाला डावलून जातपंचायतीने एकतर्फी घटस्फोट दिला असून तिला सामाजिक बहिष्काराची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतरही सातारा आणि इचलकरंजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आहे. जातपंचायतीच्या या अघोरी कारभाराविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली असून, दोषींवर तातडीने कारवाई करून पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन करण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
    1
    दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन करण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पुण्याच्या खेड तालुक्यातील संकनपुरी ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आला असून भाजपच्या कामकाजावर आणि कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामपंचायतीच्या या कारभारामुळे भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न निर्माण झाले आहेत.
    1
    पुण्याच्या खेड तालुक्यातील संकनपुरी ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आला असून भाजपच्या कामकाजावर आणि कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामपंचायतीच्या या कारभारामुळे भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न निर्माण झाले आहेत.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कराळे मास्तर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार भडकले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तीव्र संताप व्यक्त करताना त्यांनी थेट स्वतःच्या पक्षालाही शिव्या दिल्या आहेत.
    1
    कराळे मास्तर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार भडकले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तीव्र संताप व्यक्त करताना त्यांनी थेट स्वतःच्या पक्षालाही शिव्या दिल्या आहेत.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नवले ब्रिजजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ लॉजवर धाड टाकली. या धाडीत ९ महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
    1
    नवले ब्रिजजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ लॉजवर धाड टाकली. या धाडीत ९ महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.