लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नर्सिंग अधिकारी 2024, पदाच्या परीक्षेचे बोर्ड परीक्षा सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वारा वरती नसल्याकारणाने विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले. लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नर्सिंग अधिकारी 2024, पदाच्या भरती करता बऱ्याच विद्यार्थ्यांना किरकोळ विलंब झाल्याने परीक्षा देता आली नाही. आयोगाने दिलेल्या प्रवेश पत्रावरती सेंटर संदर्भात इंग्रजीमध्ये वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असा उल्लेख केलेला होता. आणि कॉलेजने मुख्य प्रवेशद्वारा वरती लावलेला बोर्ड मराठीमध्ये यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असा असल्या कारण्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. हे विद्यार्थी विविध शहरातून, जिल्ह्यामधून आणि राज्यातून आलेले होते. गुगल मॅप ने विद्यार्थ्यांना सीबीएस स्टॅन्ड भोवती फिरवल्याने परीक्षेची वेळ निघून गेली. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्या करता पाच ते दहा मिनिटे उशीर झाला. काही विद्यार्थी ट्रॅफिक मध्ये अडकल्याने परीक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्या करता काही मिनिटाचा उशीर झाला. परीक्षेची वेळ दुपारी एक वाजून 30 मिनिटांची असल्याने गेट बंद करण्यात आले. त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. बऱ्याच विद्यार्थ्यांची गेटवर गर्दी जमा झाल्याने पोलीस अधिकारी त्यांना हुसकावत होते. काही अधिकारी तर पोलीस कारवाईची धमकी देताना दिसले. नीट परीक्षेत झालेला घोटाळा जनते समोर असताना शासनाने खरोखर अभ्यास करून नर्सिंग अधिकारी पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच ते दहा मिनिटांनी विलंब मान्य करून पेपर देण्याची संधी देणे आवश्यक होते. जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नाही त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा आणि नाराजगी दिसून येत होती. भविष्यात शासनाकडून लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे मोठे बोर्ड मुख्य प्रवेश द्वारा वरती लावण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्रवेश पत्रासोबत रोड मॅप देण्यात यावा. अशा पद्धतीची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली.

- *नाशिक : पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन* हा व्हिडिओ पाहण्यासाठी, खालील लिंकवर क्लिक करा: https://getlokalapp.com/share/posts/13891853?utm_source=video_link&utm_v=pdd_video_link_share&utm_constituency_id=48281
- नाशिक । ५ अल्पवयीन मुलांनी मुलींबरोबर मौजमजेसाठी चोरल्या 11 दुचाकी-सहाय्यक आयुक्त पद्मजा बढे1
- नाशिक महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग तज्ञ डॉ. शिल्पा काळे यांचे मनोगत.1
- नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'निमा न्यू नाशिक ' या वैद्यकीय संघटनेचा आगळावेगळा सोहळा1
- संधी मिळत नसते.. ती निर्माण करावी लागते. आमदार नासिक पूर्व विधानसभा. आंतरराष्ट्रीय किर्तीचे कामगार नेते. मा.श्री जगदीश भाऊ गोडसे. #शरदचंद्रजी #nashikeast123 highlight जगदीश भाऊ गोडसे समर्थक NashikCity Following Love Sharad Pawar 9 News Maharashtra News24 Jai Maharashtra News ABP Majha Lokmat Nashik NCN Nashik City News Gajanan Shelar Dr.Amol Kolhe Kartik Dange Jayant Patil - जयंत पाटील Jagdish Dattatray Godse Supriya Sule Deolali Camp Nashik SamNews Zee 24 Taas Zee News NCP Nashik Rural Nashikroad Ncp1
- Child Pornography | Nashik City Cyber Police | बालकांच्या अश्लिल चित्रफीत, नाशिक पोलीस अलर्ट मोडवर; नेमंक प्रकरण काय?1
- Nashik News: खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा राडा,दोन गटात तुंबळ हाणामारी! | Marathi News1
- Dosa Made By Nashik College Boy1