आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकारातून 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' यशस्वी; २,६०४ लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकारातून 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' यशस्वी; २,६०४ लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ 'शासन आपल्या दारी, लाभ प्रत्येकाच्या घरी' हा राज्य शासनाचा संकल्प प्रत्यक्षात साकार करत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात व नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाले. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, महसुली सेवा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणींचे निराकरण एकाच ठिकाणी, एकाच दिवशी आणि पारदर्शक पद्धतीने करण्याचा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील तब्बल २,६०४ लाभार्थ्यांना आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ, अनुदानाचे धनादेश, प्रमाणपत्रे, स्वामित्व सनद, पट्टे, मंजुरीपत्रे तसेच आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आदिवासी समाज आणि महिला बचत गटांसाठी शासनाच्या विविध विभागांनी एकाच छताखाली सेवा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत झाली. शिबिरात सर्वांसाठी घरे योजना, नजुल फ्री-होल्ड पट्टे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रकरणे, कुंभार समाज लाभ, जात, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, महसुली अर्ध-न्यायिक प्रकरणांचे आदेश, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्रे, जिवंत ७/१२ मोहीम, गावठाण स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, वनहक्क दावे व पट्टे, वनहक्क मोजणी नकाशे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 'उमेद' (MSRLM) अंतर्गत महिला बचत गटांना अनुदान, *कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना मागील वर्षी मिळालेल्या कृषी यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टरचे अनुदान वाटप*, आधुनिक शेतीसाठी कृषी ड्रोन, आयुष्मान भारत कार्ड, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच वन

- नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवू पिंपरीच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे आश्वासन पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्यावर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. इम्रान बॅग यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक संघटना आणि समाजबांधवांकडून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. गुन्हेगारीविरोधातील प्रत्येक मोहिमेत पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी स्वागताबद्दल उपस्थितांचे आभार मानत1
- मोशी दुर्घटना प्रकरण अधिकाऱ्यांवर महेश लांडगेंचा वरदहस्त, रोहित पवारांचा आरोप... पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी थेट अधिकाऱ्यांवर आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.संजय कुलकर्णी नावाच्या अधिकाऱ्याला सातत्याने काम मिळत राहावं, याची काळजी घेतली जाते, असा दावा रोहित पवारांनी केला.तसंच, संबंधित अधिकाऱ्यांवर आमदार महेश लांडगे यांचा वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला.मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे... #मोशीदुर्घटना #मोशीकचराडेपो #रोहितपवार #महेशलांडगे #संजयकुलकर्णी #पिंपरीचिंचवड #पिंपरीचिंचवडन्यूज #मोशी #राजकीयआरोप #अधिकारी #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #BreakingNews #RohitPawar #MaheshLandge #MoshiAccident #PimpriChinchwad #TheNayakNews1
- "ज्या मुलांनी शिव्या दिल्या... त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश..!"1
- सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा. सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा. राजरोस वृक्ष तोंड, उत्खनन करून माती,मूर्माचे विक्री, किती रोप आणली किती लागवड व वृक्ष जतन झाले का? कोट्यवधी पैसा व निधी हडप. माती ,मुरुमाची रॉयल्टी भरले का? सिन्नर फॉरेस्ट कार्यालयात भयंकर भ्रष्टाचार? अवैध वृक्ष तोड -- ------------------ सिन्नर तालुक्यातील वनक्षेत्रात दररोज प्रचंड प्रमाणात वृक्षतोड चालू आहेत. अधिकारी दुर्लक्ष करतात याआडून भ्रष्टाचार चालू आहेत. माती व मुरुमाची बेकायदेशीर उत्खनन व विक्री --- ---------------------------------++ वनजमिनींतून अनेक ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन झाले आहेत. रॉयल्टी चुकवून यात अधिकारी कर्मचारी यांनी टेबलाखालून वरून पैसा कमावत भ्रष्टाचार केला आहेत. आज पर्यंत वनक्षेत्र जमिनीत उत्खनन किती झाले? किती रॉयल्टी भरली? किती पैसा कुणीकुणी हडपला याची चौकशी व्हावी. मलिदा चाखायचाय मिळतोय यामुळे वारेमाप उत्खनन होऊन निसर्गाचा ऱ्हास होत आहेत. वृक्ष रोप व वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार - --------------------------------- आजपर्यंत रोप खरेदी किती खर्च प्रत्यक्षात किती रोप खरेदी? लागवड किती केली? वृक्ष जतन खर्च किती? वृक्ष जगली किती? जंगल कुठे वाढवली? यासाठी निधी किती आला? हा कोट्यवधी निधी कुठे खर्च केला! याचा रिझल्ट म्हणजे जंगल, झाडे कुठे? हिशोब द्यावा. म्हणून काही रानात वणवा पेटला की झाकण्यासाठी पेटविला? रान पेटवत कोण? हेतू काय? अनेक जंगल राखण करण्यासाठी त्या भागातील साधाभोळा शेतकरी कर्मचारी नेमायाचा. त्याचा पगार न देता हडप करायचा. पैसे झिरवण्यासाठी त्याला वर्ष दोन वापरून कामावरून कमी करायचे.याची चौकशी करून कारवाई करावी. वृक्ष लागवड व जतन योजनेत कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार झाला आहेत. कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी. वरील मागण्यासाठी व या भ्रष्टाचार विरोधात शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर वतीने आमरण उपोषण करण्यात येणार. - शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर मो.९६८९३५०६२२.1
- येवलेवाडीत देवळावरती 'गणपती बाप्पा' आणि खाली 'दारूचे दुकान': सामाजिक कार्यकर्ते सुधीर बनसोडे आक्रमक; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर! "पुण्यातील येवलेवाडी येथील कामठे-पाटील नगरमधून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. जिथे एका बाजूला पवित्र 'गणपती मंदिराची' जागा आहे, त्याच इमारतीत खाली 'टेका वाईन्स' हे दारूचे दुकान थाटण्यात आले आहे! या प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुधीर बनसोडे आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. धार्मिक भावनांचा बोजवारा उडाला असतानाच, या दुकानामुळे परिसरामध्ये मद्यपींचा विळखा पडला आहे. उघड्यावर आणि गाड्यांमध्ये बसून चालणाऱ्या नशेत धिंगाण्यामुळे महिला व मुलींचे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. महिला वर्गात कमालीची भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. मंदिराजवळ दारूच्या दुकानाला परवानगी दिलीच कशी? आणि स्थानिक पोलीस प्रशासन यावर डोळेझाक का करतंय? असा संतप्त सवाल आता येवलेवाडीकर विचारत आहेत. जर प्रशासनाने लवकरात लवकर हे दुकान हटवले नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधीर बनसोडे आणि नागरिकांनी दिला आहे."1