logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रायते अपघातानंतर प्रवाशांना 'इको व्हॅन'ची धास्ती; एसटीकडे वाढला ओढा ठाणे:कल्याण तालुक्यातील रायते पुलाजवळ सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर कल्याण – मुरबाड मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे चित्र पूर्णतः बदलले आहे. दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इको व्हॅनमधून प्रवास करण्यास प्रवाशांनी नकार दिल्याचे चित्र आहे. परिणामी, मुरबाड एसटी स्थानकावर प्रवाशांची बुधवारी मोठी गर्दी होती. तर कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व प्रवासी गाड्यांची तपासणी करण्यात येत असून बुधवारी सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी रायते गावाजवळील एका पुलावर प्रवासी इको व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात व्हॅनमधील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. विशेषतः रोजंदारीवर काम करणारे, विद्यार्थी आणि नियमित प्रवास करणारे नागरिक यांच्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. कल्याण ते मुरबाड या मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी इको व्हॅनद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. शेकडो प्रवासी गाड्या या मार्गवरुन धावतात. या व्हॅनमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जात असल्याच्या तक्रारी पूर्वीपासून होत होत्या. मात्र, स्वस्त आणि जलद प्रवासाच्या सोयीमुळे अनेक प्रवासी या वाहनांना प्राधान्य देत होते. अपघातानंतर मात्र परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. प्रवाशांनी आता या व्हॅनमधून प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला असून, सुरक्षित पर्याय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे (एसटी) मोठ्या प्रमाणात वळले आहेत. यामुळे मुरबाड एसटी स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी होत असून, बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक प्रवाशांनी भीती व्यक्त करत सांगितले की, "थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल, पण जीव धोक्यात घालून यापुढे प्रवास करायचा नाही." काही प्रवाशांनी तर खासगी व्हॅनमध्ये होणारी गर्दी आणि नियमांचे उल्लंघन याबाबतही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या अपघातानंतर खासगी प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच, वाढती गर्दी लक्षात घेता एसटी बसच्या फेऱ्या वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

on 16 April
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
on 16 April
557ba99d-200f-4864-948f-9f371cba4c4b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.
    1
    ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके  यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 min ago
  • शब्बीर खान Mumbra में SP को मजबूत करेंगे,किसी के दबाव में नही करेंगे काम ? || Islamuddin Khan
    1
    शब्बीर खान Mumbra में SP को मजबूत करेंगे,किसी के दबाव में नही करेंगे काम ? || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor Thane, Maharashtra•
    47 min ago
  • मां-बच्चे की मौत से वापसी! कल्याण स्टेशन का हैरान करने वाला वीडियो | Breaking Bytes
    1
    मां-बच्चे की मौत से वापसी! कल्याण स्टेशन का हैरान करने वाला वीडियो | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by YASER BAGHDADI
    1
    Post by YASER BAGHDADI
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Amit kumar singh
    2
    Post by Amit kumar singh
    user_Amit kumar singh
    Amit kumar singh
    Credit reporting agency ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुंब्रा पुलिस का एक्शन, वीडियो बनाकर भाईगिरी करने वालों पर कार्रवाई BNN NEWS
    1
    मुंब्रा पुलिस का एक्शन, वीडियो बनाकर भाईगिरी करने वालों पर कार्रवाई BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,, यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.
    1
    ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,,   यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.