आपल्या मुलीवर सुसंस्कार करा - कल्पना धडे परतूर - महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपल्या मुलीला योग्य संस्कार देण्याची गरज वाढली आहे. असे विचार परतुर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल कल्पना धडे यांनी न्यु एस.एम.इंग्लिश स्कूल खांडवी येथे जागतिक महिला दिन साजरा करतांना प्रमुख पाहुणे म्हणुन मांडले. स्त्रियांनी अगोदर स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे,मुलींना शिक्षण आणि योग्य संस्कार देण्याची गरज आहे जेणेकरून कौटुंबिक अनेक समस्या निर्माण होणार नाहीत. मुलींचे हल्ली कोणताही विचार न करता पळून जाणे ही गंभीर समस्या वाढत आहे. त्यासाठी घरातील महिलांवर मोठी जबाबदारी असल्याचे कॉन्स्टेबल धडे यांनी सांगितले. दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जागतिक महिला दिनानिमित्त न्यु एस.एम.इंग्लिश स्कूल खांडवी येथे महिला मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेख समीनाबी,शेख चांदबी होमगार्ड राठोड मॅडम, मोरे मॅडम, मराठा महासंघाच्या मंगलताई कोरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्याला मंगल कोरडे,सुनिता ताई बरकुले,सुनंदा कोल्हे, सुमन गिरी कविता बरकुले,रेणुका साळवे, चंद्रकला हरकळ,आशमती वाहुळे, सुरेखा कांबळे,आरती भारसाकले, वंदनाताई साळवे,सविता कांबळे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. या वेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनिता काटकर यांनी मानले. या वेळी न्यू एस.एम.इंग्लिश स्कूल खांडवी शाळेचे अध्यक्ष शेख कट्टू भाई , मुख्याध्यापक शेख एजास सर तसेच उपमुख्यध्यापिका सुनिता काटकर मॅडम व शिक्षक वर्ग ज्योती मोरे मॅडम, ज्योती खरात मॅडम, विल्सन सर, अभी सर,समीर सर आदींनी परिश्रम घेतले.

- UUser3169Brahmapuri, Chandrapur😡2 days ago
- जालन्याच्या मंठा तालुक्यातील पोखरी केंधळे येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा.1
- श्रीं रेणुका मंडप डेकोरेशन मंठा1
- पिवर.बिटल.3.फिमेल.1.मेल.विकरी.आहे.पता.मंठा.जिं.जालना.जिंतूर.सेलू.पाथरी.राहनार.नागठान1
- श्री रेणुका मंडप डेकोरेशन मंठा1
- शंकरपट सेलू आणि कृषी महोत्सव फुल video1
- Pushpa remix# पुष्पा रिमीक्स# Ideal English school Selu# आयडियल इंग्लिश स्कूल सेलू 20251
- पुरातन नाणी नोटा व परदेशी चलनाचे अशोका पब्लिक स्कूल मंठा येथे भव्य प्रदर्शन.1
- #संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 🚩💪✌️ #एक_मराठा_लाख_मराठा #MarathaReservation #मराठा_आरक्षण #मनोजजरांगेपाटील #manojjarange #श्री_मनोज_जरांगे_पाटील #manojjarangepatil#पाटील #एक_मराठा_लाख_मराठा #जय_शिवराय #मराठा_आरक्षण# #मनोज_जरांगे #पाटील #manojjarangepatil #मराठा #maratha #एक_मराठा_लाख_मराठा #मराठाआरक्षण #मराठा_आरक्षण #marathaarkshan #manojjarangepatil #MarathaReservation #मनोजजरांगे #मराठा #आरक्षण #obc मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील1