महानगर पालिकेच्या निवडणुकित काय म्हणतयं लातूर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आंबेडकर पार्क लातूर येथे विजय संकल्प सभा..! दि.7/01/2026 रोजी लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आज लातूर येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विजय संकल्प सभा लातूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माजी मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्याविषयी आदर व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो नागरिकांना हक्काची घरे देण्यात आली असून, अमृत योजनेद्वारे लातूरचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. लातूरमध्ये अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’, नाट्यगृह, शादीखाना, रिंग रोड व वाहतूक सुधारणा अशा विकासकामांना गती दिली जाणार आहे. एक्सप्रेस वेमुळे लातूर–मुंबई अंतर पाच तासांत पूर्ण होणार असून, लातूरला विकासाचे रोल मॉडेल शहर बनवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी येत्या महानगरपालिका निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन देवाभाऊंनी लातूरकरांना केले. आवाज इंडिया न्युज जिल्हा प्रतिनिधी लातूर सिध्देश्वर वा.कुलकर्णी मो.7666462744

- Phatha NoorLatur, Maharashtra😤7 hrs ago
- Phatha NoorLatur, Maharashtra😤7 hrs ago
- *घाणेरडे राजकारण करुन उमेदवारी रद्द करण्याच्या उद्देश्याने दाखल केलेली याचीका खारिज;विरोधकांना चपराक,भाजप मध्ये आनंदाचे वातावरण* https://youtu.be/DM-0nqFeKoQ2
- लोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेबांनी सुरू केलेल्या ह.भ.प हरी महाराज देगलूरकर ( दिंडी ) निमित्त कुस्त्यांना आज ३५ वर्ष पूर्ण झाली. ती परंपरा जपण्याचं काम आपण जय हनुमान व्यायाम शाळेच्या माध्यमातून करीत आहोत. कुस्त्या हा फक्त मातीचा रांगडा खेळ नसून ती देगलूरची अस्मिता आहे. मोंढा मैदानात कुस्त्यांचा थरार रंगला, शेवटची मानाची कुस्ती धिरज वाघमारे लातूर विरुद्ध गजानन भोडके जाहुर ( मुखेड ) यांच्यात रंगली, अटीतटीच्या सामन्यात लातूरने बाजी मारत शेवटच्या कुस्तीवर आपले नाव कोरले तर द्वितीय पारितोषिक मुखेडला मिळाले. कुस्त्यांच्या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी साहेब ( Dysp), काँग्रेस पक्षाचे नेते रामदास पाटील सुमठाणकर साहेब, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे साहेब, देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे मॅडम, स.पोलीस निरीक्षक पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक फड साहेब, पोलीस उपनिरीक्षक मैसलवाड साहेब, माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, विरोधी पक्ष नेते मीराभाई, नगरसेवक बालाजी रोयलावार, नगरसेवक मेहमूद भाई, नगरसेवक जियाभाई, नगरसेवक हाफिज साहब, नगरसेवक लक्ष्मण कंधारकर ,नगरसेवक प्रतिनिधी राजा कांबळे, नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे, नगरसेवक प्रतिनिधी संजय जोशी, नगरसेवक लालू कोयलावार, नगरसेवक प्रतिनिधी सुनील यशमवार, माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्ला भाई कुरेशी, ग्रामीण भागातून आलेले मल्ल, कुस्तीप्रमी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मी उपस्थित राहून मी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा अविनाशजी निलमवाकै मष्णाजीराव निलमवारर साहेब,मा पोलीस निरीक्षक मुंडे साहेब,काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक आणि असंख्य जन्समुदाय उपस्थित होता.1
- सहस्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात एका अज्ञात इसमाचा पोत्याच्या फारीमध्ये बांधलेला बांधलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने या परिसरात उडाली खळबळ पहा काय आहे प्रकरण1
- Post by Nishikant rodge1
- 🌺🙏 श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ 🙏🌺 कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली देवीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला हलगीच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने भक्तिमय सुरुवात झाली. पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी “जय महाकाली”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महाकाली देवीचा हा पावन उत्सव श्रद्धा, आस्था व उत्साहाचे केंद्र ठरत असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरसम पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 🌸 जय महाकाली माता 🌸 #श्रीमहाकालीयात्रा2026 #महाकालीदेवी #कोतलवाडी #सरसमबु #हिमायतनगर भव्यशोभायात्रा हलगीचा_गजर पालखीमिरवणूक भक्तिमय_सोहळा धार्मिकउत्सव नांदेड जयमहाकाली https://www.instagram.com/reel/DTQX_2VEqfG/?igsh=dGNtb2ZqMDFuMG451
- केशर नाईक ताड़ा ईते रसता जान्या यन्या साठि रोड़ नाही कृपया आमाला रस्ता करून देत नाहि चाभरा ताड़ा ते केशर नाईक ताड़ा ई ते कृपि या आम चि मदत करा1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- *राजकारण तापलयं; लातूर आपलयं* *लातूर गंजगोलाई येथे काॅंग्रेस पक्षाने आई जगदंबेच्या चरणी जाहिरनामा ठेवून प्रकाशित केला* *➡️लातूरकरांच्या मनातील जाहिरनामा -आमदार अमित देशमुख* https://youtu.be/YIyKboJvg7w2