logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच महायुती सरकारचे ध्येय – आमदार हिकमत दादा उढाण घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, माहिती व सेवांचा एकाच ठिकाणी लाभ मिळावा या उद्देशाने 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत घनसावंगी येथे 'जनता दरबार' आयोजित करण्यात आला. या जनता दरबारात आमदार हिकमत दादा उढाण यांनी विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नागरिकांच्या समस्या, तक्रारी व अर्जांची प्रत्यक्ष दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार हिकमत दादा उढाण म्हणाले की, शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच महायुती सरकारचे ध्येय आहे. शासन नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असले तरी माहितीच्या अभावामुळे अनेक पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. महसूल अभियानामुळे सर्व विभागांची माहिती व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत आहे. ते पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांचे शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेले प्रश्न, अर्ज व तक्रारी वेळेत निकाली निघाव्यात, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. नागरिकांनी आपल्या अडचणी संबंधित विभागांकडे मांडाव्यात आणि प्रशासनानेही संवेदनशीलतेने त्यांचे निराकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार हिकमत दादा उढाण यांनी महायुती सरकारच्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमुक्ती निर्णयाचाही उल्लेख केला. कोणत्याही कडक अटी-शर्ती न ठेवता दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करण्यात आल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरात दाखल झालेल्या सर्व अर्जांवर पुढील १५ दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय घेऊन तक्रारींचे निवारण करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून महसूल अभियानाचा मूळ उद्देश यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या जनता दरबारात विविध शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी,आर डि सी हादगल साहे एच डि एम पारधी साहेब तपशिलदार पागोटे साहेब अंकुशराव,बोबडे भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सर्जराव जाधव गोविंद ढेबरे सदाशिव यादव आशोकराव जाधव अर्जुनराव माळोदे भास्करराव जयराम मिसाळ सुरेश पोटे पांढरे गणेश गुजर विष्णू गोरे भुजग नाना कटुले बंडु आराध्ये लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 hr ago
user_Santram Jadhav
Santram Jadhav
Jalna, Maharashtra•
1 hr ago
55e5223b-d589-487d-ac12-2691c0bdc7bd

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.
    1
    सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त
जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले.
कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.
    user_दैनिक शुभ प्रभात
    दैनिक शुभ प्रभात
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    40 min ago
  • मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!
    1
    मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!
मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
    1
    जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी

पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना..

जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी
पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना..
आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! ​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! ​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
    1
    जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान!
​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान!
​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
    user_GLOBAL NEWS JALNA
    GLOBAL NEWS JALNA
    सच बोलने की आदत है मुझे जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    1
    जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News
    1
    भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल
भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे...
Bharat 24Taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    5 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    1
    भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका

अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव

एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका
अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव
आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.