logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुळावा येतील माजी जिल्हा परिषद सभापती शहाजी खडसे यांच्या शेतातील विनापरवाना रेल्वे कामासाठी मुरमाचे उत्खनन केल्याप्रकरणी पावर मेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हैदराबाद यांना 33,18,81,000 रू भरण्याची नोटीस मुळावा येथील माजी जिल्हा परिषद सभापती शहांजी खडसे व त्यांचे दोन भाऊ भागोराव खडसे व सुदाम खडसे यांचे हातला शिवारात शेत सर्वे नंबर 65 क्षेत्र 4 हेक्टर 86 आर जमीन आहे .यात शहाजी खडसे यांच्या नावाने 1 हेक्टर 42 आर भागुराव खडसे यांच्या नावाने 1 हे 42 आर जमिन असून त्यांनी रेल्वेच्या कामासाठी PMPL पावर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद तर्फे श्री पुल्ली मधु व्यंकटा रघुनाथ बाबू राहणार पुली कोटेश्वरराव तले यांच्यासोबत शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर विना नोटरी करता रेल्वेच्या कामासाठी विना मोबदला मुरूम देण्याचे ठरविले .*यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती अशी खात्रीदायक माहिती आहे* या बदल्यात कंपनीतर्फे मुरूम काढलेल्या खड्ड्यात 2.5 ते 3 फूट काळी माती आणून भरण्याचे ठरले होते असे करारात म्हटले आहे .हा करार 30 जानेवारी 2025 रोजी झाला होता .ठरल्याप्रमाणे कंपनीने मुरूम नेला पण शर्ती आणि अटी प्रमाणे त्या खड्ड्यात काळी माती आणून भरली नाही व रातोरात आपले वाहने घेऊन पळ काढला . त्यामुळे शहाजी खडसे यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्याकडे 23/ 2/ 2026 रोजी तक्रार देऊन चौकशीची व कारवाईची मागणी केली .या पावर मेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय अवैधरित्या मुरमाचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यामुळे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी या शेतजमिनीतील मुरुमाची एटीएस मोजणी केली असता *48950* मुरूमाचे उत्कलन झाल्याचे दिसले .बाजार मूल्या प्रमाणे मुरमाचा एक ब्रासचा भाव *1356* रुपये ब्रास आहे .त्यामुळे या मुरमाचे बाजार मूल्य *66376200* इतके होते .त्यामुळे गौण खनिज आधी नियमा प्रमाणे पाचपट दंडाची रक्कम ध्यानात घेतली असता *33,18,81,000* रुपये होते व ही दंड वसुलीची नोटीस पावर मेक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीला दिली आहे .त्याच बरोबर उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव व हादगाव तालुक्यातील अनेक गावां मधील शेतकऱ्यांना सुद्धा असेच माती भरून देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते परंतु ते पाळण्यात आलेले नाही . त्याची तक्रार जरी देण्यात आली नसली तरी अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून व शासनाचा महसूल बुडवून ठेकेदार मालामाल झालेले आहेत . रेल्वेच्या अनेक कामांमध्ये अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये वाचविण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे .मुरमाचे उत्कलन व वहन हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केले पाहिजे हा नियम असताना सुद्धा रात्रंदिवस मुरमाचे उत्कलन व वहन होत आहे याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष आहे .आशा अनेक बारीक-सारीक बाबीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असल्याचे दिसत असून सुद्धा प्रशासन मूग गिळून गप्प का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे .

17 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
17 hrs ago
e3ec659f-515d-4cc1-b7bf-cbcf3bd75f9e

मुळावा येतील माजी जिल्हा परिषद सभापती शहाजी खडसे यांच्या शेतातील विनापरवाना रेल्वे कामासाठी मुरमाचे उत्खनन केल्याप्रकरणी पावर मेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हैदराबाद यांना 33,18,81,000 रू भरण्याची नोटीस मुळावा येथील माजी जिल्हा परिषद सभापती शहांजी खडसे व त्यांचे दोन भाऊ भागोराव खडसे व सुदाम खडसे यांचे हातला शिवारात शेत सर्वे नंबर 65 क्षेत्र 4 हेक्टर 86 आर जमीन आहे .यात शहाजी खडसे यांच्या नावाने 1 हेक्टर 42 आर भागुराव खडसे यांच्या नावाने 1 हे 42 आर जमिन असून त्यांनी रेल्वेच्या कामासाठी PMPL पावर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद तर्फे श्री पुल्ली मधु व्यंकटा रघुनाथ बाबू राहणार पुली कोटेश्वरराव तले यांच्यासोबत शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर विना नोटरी करता रेल्वेच्या कामासाठी विना मोबदला मुरूम देण्याचे ठरविले .*यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती अशी खात्रीदायक माहिती आहे* या बदल्यात कंपनीतर्फे मुरूम काढलेल्या खड्ड्यात 2.5 ते 3 फूट

b1a25172-60fa-4395-b597-6c402655b779

काळी माती आणून भरण्याचे ठरले होते असे करारात म्हटले आहे .हा करार 30 जानेवारी 2025 रोजी झाला होता .ठरल्याप्रमाणे कंपनीने मुरूम नेला पण शर्ती आणि अटी प्रमाणे त्या खड्ड्यात काळी माती आणून भरली नाही व रातोरात आपले वाहने घेऊन पळ काढला . त्यामुळे शहाजी खडसे यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्याकडे 23/ 2/ 2026 रोजी तक्रार देऊन चौकशीची व कारवाईची मागणी केली .या पावर मेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय अवैधरित्या मुरमाचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यामुळे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी या शेतजमिनीतील मुरुमाची एटीएस मोजणी केली असता *48950* मुरूमाचे उत्कलन झाल्याचे दिसले .बाजार मूल्या प्रमाणे मुरमाचा एक ब्रासचा भाव *1356* रुपये ब्रास आहे .त्यामुळे या मुरमाचे बाजार मूल्य *66376200* इतके होते .त्यामुळे गौण खनिज आधी नियमा प्रमाणे पाचपट दंडाची रक्कम ध्यानात घेतली असता *33,18,81,000* रुपये होते व ही दंड वसुलीची नोटीस

72101254-9048-4e3b-9df9-1096a001ace1

पावर मेक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीला दिली आहे .त्याच बरोबर उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव व हादगाव तालुक्यातील अनेक गावां मधील शेतकऱ्यांना सुद्धा असेच माती भरून देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते परंतु ते पाळण्यात आलेले नाही . त्याची तक्रार जरी देण्यात आली नसली तरी अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून व शासनाचा महसूल बुडवून ठेकेदार मालामाल झालेले आहेत . रेल्वेच्या अनेक कामांमध्ये अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये वाचविण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे .मुरमाचे उत्कलन व वहन हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केले पाहिजे हा नियम असताना सुद्धा रात्रंदिवस मुरमाचे उत्कलन व वहन होत आहे याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष आहे .आशा अनेक बारीक-सारीक बाबीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असल्याचे दिसत असून सुद्धा प्रशासन मूग गिळून गप्प का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे .

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विश्वासघात ग्रस्त शेतकऱ्यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण उमरखेड :-PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने मुळावा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करून काढता पाय घेतला असल्यामुळे न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ९ मार्च २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मुळावा येथील रहिवासी शेतकरी १) शहाजी गंगाराम खडसे,२) भागोराव गंगाराम खडसे, ३) सुदाम गंगाराम खडसे या तिघा वयोवृद्ध भावांची मौजा हातला शिवारातील शेत सर्वे नंबर ६५ क्षेत्रफळ ४ हे ८६ आर या शेतजमिनीतून वरीलउल्लेख केलेल्या कंपनीने मुरूम (खडक) रेल्वे रस्त्याचे कामाकरिता उत्खनन करून नेण्याचा आणि त्या ऐवजी सदर शेतामध्ये २.५ ते ३ फुट काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला, करारनाम्याप्रमाणे कंपनीने सदर शेतातून मुरूम खडक नेला परंतु करारानुसार सदर शेत जमिनीमध्ये काळी माती टाकून देण्याचे टाळून काम अर्धवट सोडून दिनांक १८/०२/२०२६ चे मध्यरात्री कामावरची मशीन इत्यादी साहित्य घेऊन पळून गेला याबाबतीत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी तसेच महाराष्ट्र राज्याचे वि. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले असून अद्याप पर्यंत आमच्यावर झालेल्या विश्वासघाताची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याने न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या विकास कार्यात मदत करणाऱ्या वर होणाऱ्या अन्यायाला अधिकारी वाचा फोडतील का? विश्वासघात करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही होईल का? याकडे उपोषणकर्त्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
    2
    विश्वासघात ग्रस्त शेतकऱ्यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण 
उमरखेड :-PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने मुळावा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करून  काढता पाय घेतला असल्यामुळे न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ९ मार्च २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मुळावा येथील रहिवासी शेतकरी १) शहाजी गंगाराम खडसे,२) भागोराव गंगाराम खडसे, ३) सुदाम गंगाराम खडसे या तिघा वयोवृद्ध भावांची मौजा हातला शिवारातील शेत सर्वे नंबर ६५ क्षेत्रफळ ४ हे ८६ आर या शेतजमिनीतून वरीलउल्लेख केलेल्या कंपनीने मुरूम (खडक) रेल्वे रस्त्याचे कामाकरिता उत्खनन करून नेण्याचा आणि त्या ऐवजी सदर शेतामध्ये २.५ ते ३ फुट काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला, करारनाम्याप्रमाणे कंपनीने सदर शेतातून मुरूम खडक नेला परंतु करारानुसार सदर शेत जमिनीमध्ये काळी माती टाकून देण्याचे टाळून काम अर्धवट सोडून दिनांक १८/०२/२०२६ चे मध्यरात्री कामावरची मशीन इत्यादी साहित्य घेऊन पळून गेला याबाबतीत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी तसेच महाराष्ट्र राज्याचे वि. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले असून अद्याप पर्यंत आमच्यावर झालेल्या विश्वासघाताची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याने न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या विकास कार्यात मदत करणाऱ्या वर होणाऱ्या अन्यायाला अधिकारी वाचा फोडतील का? विश्वासघात करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही होईल का? याकडे उपोषणकर्त्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 🚩 पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिरात भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, भोकर, हदगांव तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव येथे २० मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान भव्य श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णाजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार असून विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन तसेच महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे. 🙏 #Himayatnagar #RamKatha #DattYagya #NamSankirtan #ReligiousEvent #Maharashtra #SpiritualProgram #Bhakti #SanatanDharma 🚩🙏
    1
    🚩 पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिरात भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩
हिमायतनगर, भोकर, हदगांव तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव येथे २० मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान भव्य श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णाजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार असून विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे.
भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन तसेच महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे. 🙏
#Himayatnagar #RamKatha #DattYagya #NamSankirtan #ReligiousEvent #Maharashtra #SpiritualProgram #Bhakti #SanatanDharma 🚩🙏
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    1
    शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    14 min ago
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल
नांदेड:
शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला
या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
"आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
— स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते
आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.