logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलढाणा जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार समारोप ! बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या महोत्सवाचा समारोप जल्लोषात झाला. स्थानिक प्रेक्षकांच्या भरगच्च प्रतिसादाचा लाभ घेत यजमान बुलढाणा जिल्हा परिषद ने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर अमरावती जिल्हा परिषद उपविजेता ठरली. टेनिक्वाइट, बॅडमिंटनसह विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. * उद्घाटनातील पथसंचलनात यवतमाळचा आकर्षक देखावा विशेष ठरला. दिव्यांग कर्मचारी गटातही उल्लेखनीय यश नोंदवले गेले. समारोप प्रसंगी विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. क्रीडाध्वज सुपूर्द करून सन 2027 साठी यजमानपदाची धुरा वाशिम जिल्हा परिषदेकडे देण्यात आली. सर्व सहभागी खेळाडू, आयोजक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

1 day ago
user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
✍️.MANSUR. SHAHA. ✍️
चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 day ago
aea05eb7-0285-42a5-98b8-cc0667732ba5
b82c786a-3ffe-43b7-9bad-f8f751fc0c8e
e2807a71-6e7d-469f-a41a-f120e2816ac8

बुलढाणा जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार समारोप ! बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या महोत्सवाचा समारोप जल्लोषात झाला. स्थानिक प्रेक्षकांच्या भरगच्च प्रतिसादाचा लाभ घेत यजमान बुलढाणा जिल्हा परिषद ने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर अमरावती जिल्हा परिषद उपविजेता ठरली. टेनिक्वाइट, बॅडमिंटनसह विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. * उद्घाटनातील पथसंचलनात यवतमाळचा आकर्षक देखावा विशेष ठरला. दिव्यांग कर्मचारी गटातही उल्लेखनीय यश नोंदवले गेले. समारोप प्रसंगी विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. क्रीडाध्वज सुपूर्द करून सन 2027 साठी यजमानपदाची धुरा वाशिम जिल्हा परिषदेकडे देण्यात आली. सर्व सहभागी खेळाडू, आयोजक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाशिवरात्रीनिमित्त वरवंड येथील एकनाथ गडावर भक्तीचा महापूर; लेकी-बाळींच्या उपस्थितीने यात्रोत्सवात रंगत!
    1
    महाशिवरात्रीनिमित्त वरवंड येथील एकनाथ गडावर भक्तीचा महापूर; लेकी-बाळींच्या उपस्थितीने यात्रोत्सवात रंगत!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मेहकर::मेहकरात राष्ट्रगौरव रथ यात्रेचे जंगी स्वागत; आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयासमोर जल्लोष
    1
    मेहकर::मेहकरात राष्ट्रगौरव रथ यात्रेचे जंगी स्वागत; आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयासमोर  जल्लोष
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • ​खामगाव : तालुक्यातील जयपूर लांडे येथे शासकीय कामगार किट वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला असून, भाजप पदाधिकाऱ्यांकडून केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींचेच फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे.जयपूर लांडे येथे हे फॉर्म स्वीकारत असताना, तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठराविक लोकांचेच फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.​जेव्हा इतर सामान्य कामगार आणि ग्रामस्थ आपले फॉर्म घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे फॉर्म स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारला असता, पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. ​केवळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पसंतीचे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचेच फॉर्म घेतले जात आहेत,​सामान्य आणि गरजू कामगारांना डावलले जात आहे,​शासकीय योजनेचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.​या वादादरम्यान झालेला संवाद काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला असून, ती क्लिप आता तालुक्यात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पदाधिकाऱ्यांचा अरेरावीचा सूर आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे जयपूर लांडे परिसरात तणावाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
    1
    ​खामगाव : तालुक्यातील जयपूर लांडे येथे शासकीय कामगार किट वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला असून, भाजप पदाधिकाऱ्यांकडून केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींचेच फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे.जयपूर लांडे येथे हे फॉर्म स्वीकारत असताना, तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठराविक लोकांचेच फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.​जेव्हा इतर सामान्य कामगार आणि ग्रामस्थ आपले फॉर्म घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे फॉर्म स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारला असता, पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. ​केवळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पसंतीचे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचेच फॉर्म घेतले जात आहेत,​सामान्य आणि गरजू कामगारांना डावलले जात आहे,​शासकीय योजनेचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.​या वादादरम्यान झालेला संवाद काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला असून, ती क्लिप आता तालुक्यात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पदाधिकाऱ्यांचा अरेरावीचा सूर आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे जयपूर लांडे परिसरात तणावाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शांतता आणि उत्साह! खामगावात शिवजयंतीसाठी चोख बंदोबस्त.
    1
    शांतता आणि उत्साह! खामगावात शिवजयंतीसाठी चोख बंदोबस्त.
    user_DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    पत्रकार खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!
    1
    ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी..
राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी
शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.
“दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    8 min ago
  • भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News
    1
    भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड
Bharat 24taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बुलडाणा:::भाजपने माझ्या विधानाचा विपर्यास थांबवा; काँ प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा घणाघात.
    1
    बुलडाणा:::भाजपने माझ्या विधानाचा विपर्यास थांबवा; काँ प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा घणाघात.
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.