रबाळे पोलिसांची पहाटेची धडक; कॉम्बिंग मोहिमेत 14 आरोपी जाळ्यात, देशी कट्टा व ब्राऊन शुगर जप्त नवी मुंबई – अमुलकुमार जैन नवी मुंबईतील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी रबाळे पोलिसांनी पहाटेपर्यंत मोठी कॉम्बिंग मोहिम राबवून गुन्हेगारांवर सर्जिकल स्ट्राईक केला. या विशेष कारवाईत विविध गुन्ह्यांप्रकरणी 14 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एका आरोपीकडून देशी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच ब्राऊन शुगरच्या 100 चिट्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही विशेष कॉम्बिंग मोहिम नवी मुंबईचे पोलीस आयुक्त Milind Bharambe तसेच परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त Pankaj Dahane यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पहाटेपर्यंत चाललेल्या या धडक कारवाईत परिमंडळ-१ मधील सात पोलीस ठाण्यांतील चार पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तब्बल 184 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोसिल नाका, अर्जुनवाडी, घनसोली साईनाथवाडी आणि रबाळे परिसरात एकाच वेळी मोठा मास रेड टाकण्यात आला. पोलीस आयुक्तालयाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार अमली पदार्थांची विक्री व सेवन, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री तसेच जुगार क्लब यांसारख्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कॉम्बिंग मोहिमेदरम्यान पोलिसांनी अवैध बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांची तपासणी केली. तसेच फरारी व पाहिजे आरोपींचा शोध, हॉटेल आणि लॉजमधील संशयित व्यक्तींची चौकशी, नाकाबंदी करून वाहन तपासणी तसेच प्रलंबित वॉरंटची अंमलबजावणी अशा विविध कारवाया करण्यात आल्या. कारवाईदरम्यान दारूबंदी कायदा 65(E) अंतर्गत 1 केस, एनडीपीएस कायद्यांतर्गत सेवनाच्या 5 केसेस आणि बाळगण्याची 1 केस, तसेच अवैध गुटखा विक्रीच्या 2 केसेस नोंदविण्यात आल्या. याशिवाय 22 संशयित गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. वाहन तपासणी मोहिमेत पोलिसांनी 229 वाहनांची तपासणी करून 92 वाहनांवर विविध प्रकारची कारवाई केली. तसेच पाहिजे आणि फरारी आरोपींच्या शोध मोहिमेत 12 जणांची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. याशिवाय 11 हॉटेल आणि लॉजेसची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने कलम 285 अंतर्गत 4 केसेस नोंदविण्यात आल्या. विशेष म्हणजे या कारवाईत एका आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडून ब्राऊन शुगरच्या 100 चिट्ठ्याही मिळाल्याने त्याच्यावर आर्म्स अॅक्ट आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान एकूण 14 आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंद्यांविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणानुसार पुढील काळातही अशा प्रकारच्या कॉम्बिंग मोहिमा सातत्याने राबवून गुन्हेगारीला आळा घालण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
रबाळे पोलिसांची पहाटेची धडक; कॉम्बिंग मोहिमेत 14 आरोपी जाळ्यात, देशी कट्टा व ब्राऊन शुगर जप्त नवी मुंबई – अमुलकुमार जैन नवी मुंबईतील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी रबाळे पोलिसांनी पहाटेपर्यंत मोठी कॉम्बिंग मोहिम राबवून गुन्हेगारांवर सर्जिकल स्ट्राईक केला. या विशेष कारवाईत विविध गुन्ह्यांप्रकरणी 14 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एका आरोपीकडून देशी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच ब्राऊन शुगरच्या 100 चिट्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही विशेष कॉम्बिंग मोहिम नवी मुंबईचे पोलीस आयुक्त Milind Bharambe तसेच परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त Pankaj Dahane यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली
राबविण्यात आली. पहाटेपर्यंत चाललेल्या या धडक कारवाईत परिमंडळ-१ मधील सात पोलीस ठाण्यांतील चार पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तब्बल 184 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोसिल नाका, अर्जुनवाडी, घनसोली साईनाथवाडी आणि रबाळे परिसरात एकाच वेळी मोठा मास रेड टाकण्यात आला. पोलीस आयुक्तालयाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार अमली पदार्थांची विक्री व सेवन, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री तसेच जुगार क्लब यांसारख्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कॉम्बिंग मोहिमेदरम्यान पोलिसांनी अवैध बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांची तपासणी केली. तसेच फरारी व पाहिजे आरोपींचा
शोध, हॉटेल आणि लॉजमधील संशयित व्यक्तींची चौकशी, नाकाबंदी करून वाहन तपासणी तसेच प्रलंबित वॉरंटची अंमलबजावणी अशा विविध कारवाया करण्यात आल्या. कारवाईदरम्यान दारूबंदी कायदा 65(E) अंतर्गत 1 केस, एनडीपीएस कायद्यांतर्गत सेवनाच्या 5 केसेस आणि बाळगण्याची 1 केस, तसेच अवैध गुटखा विक्रीच्या 2 केसेस नोंदविण्यात आल्या. याशिवाय 22 संशयित गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. वाहन तपासणी मोहिमेत पोलिसांनी 229 वाहनांची तपासणी करून 92 वाहनांवर विविध प्रकारची कारवाई केली. तसेच पाहिजे आणि फरारी आरोपींच्या शोध मोहिमेत 12 जणांची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. याशिवाय 11 हॉटेल आणि
लॉजेसची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने कलम 285 अंतर्गत 4 केसेस नोंदविण्यात आल्या. विशेष म्हणजे या कारवाईत एका आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडून ब्राऊन शुगरच्या 100 चिट्ठ्याही मिळाल्याने त्याच्यावर आर्म्स अॅक्ट आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान एकूण 14 आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंद्यांविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणानुसार पुढील काळातही अशा प्रकारच्या कॉम्बिंग मोहिमा सातत्याने राबवून गुन्हेगारीला आळा घालण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
- गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न1
- नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai1
- Post by Nirbhay Nagri1
- Post by RNN CHANNEL1
- Haji Ali Dargah Sehri Me Pahunche Actor Javed Jafri1
- Juhu varsava Link road Tunga hospital ke opposite speed breaker ki samasya se aam Janata pareshan.1
- वसईत चविष्ट बटर वडा पाव आणि गरम चहाचा आस्वाद घ्या — आजच या आणि आनंद घ्या! ☕🥔🍞1
- 1st Annual function of Goswami Sewa Samit president R C Giri, excl interview by Ips Yadav event held in Mira bhayandar1