भाजपच्या कार्यकर्त्याची भूमिका राष्ट्रपती शेवटी आपण या विचाराने प्रेरित असतो भाजपा कार्यकर्ता ‘प्रथम राष्ट्र, शेवटी स्वतः’ या विचारांनी प्रेरित – माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड लातूर ( प्रतिनिधी): लातूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान च्या भव्य उद्घाटन प्रसंगी माजी खासदार व संसदरत्न डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ‘प्रथम राष्ट्र, शेवटी स्वतः’ या विचारसरणीने कार्य करतो. हाच विचार देशाच्या प्रगतीचा खरा पाया आहे.” या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळ आणि छत्रपती संभाजी महाराज मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून, शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांसाठी निवासी स्वरूपात हे शिबिर पार पडत आहे. शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटी, नेतृत्व कौशल्य, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रहिताच्या मूल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. डॉ. गायकवाड पुढे म्हणाले की, “आजच्या काळात राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीचे माध्यम आहे. भाजपा कार्यकर्ता हा समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी समर्पित असतो. अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि स्पष्ट दिशा निर्माण होते.” या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर भाजपा जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर होते. यावेळी नगरसेविका प्रेरणा होनराव, तुकाराम गोरे, आनंद बारपुते, संजय गीर, नगरसेविका रागिणी यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याने प्रशिक्षण महा अभियानाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून, आगामी काळात या शिबिरातून सक्षम, समर्पित आणि राष्ट्रहितासाठी कटिबद्ध कार्यकर्ते घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

- *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.4
- लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- Post by Mohammad Rafikh1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1