logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उदगीर येथे तात्काळ आतील जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची आमदार संजय बनसोडे यांची मागणी उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे - आ. संजय बनसोडे यांची मागणी उदगीर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व परिसराचा वेगाने वाढणारा विकास, लोकसंख्या आणि प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेता उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, उदगीर हे लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर शासकीय कामकाजासाठी नागरिकांना लातूर येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. उदगीर, जळकोट या तालुक्यांतील नागरिकांना महसूल, निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन, तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित कामांसाठी सुलभ सेवा मिळावी यासाठी उदगीर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या कार्यालयामुळे स्थानिक पातळीवर प्रशासन अधिक सक्षम होईल, निर्णय प्रक्रियेला गती मिळेल आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा विस्तार करणे ही काळाची गरज असून शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही आ.संजय बनसोडे यांनी म्हटले आहे. उदगीरला तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी आ.बनसोडे यांनी महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची भेट घेतली. दरम्यान, या मागणीमुळे उदगीर व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

4 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
4 hrs ago
28199ba3-1782-4681-8369-b8e01c58d832

उदगीर येथे तात्काळ आतील जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची आमदार संजय बनसोडे यांची मागणी उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे - आ. संजय बनसोडे यांची मागणी उदगीर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व परिसराचा वेगाने वाढणारा विकास, लोकसंख्या आणि प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेता उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, उदगीर हे लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर शासकीय कामकाजासाठी नागरिकांना लातूर येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. उदगीर, जळकोट या तालुक्यांतील नागरिकांना महसूल, निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन, तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित कामांसाठी सुलभ सेवा मिळावी यासाठी उदगीर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या कार्यालयामुळे स्थानिक पातळीवर प्रशासन अधिक सक्षम होईल, निर्णय प्रक्रियेला गती मिळेल आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा विस्तार करणे ही काळाची गरज असून शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही आ.संजय बनसोडे यांनी म्हटले आहे. उदगीरला तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी आ.बनसोडे यांनी महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची भेट घेतली. दरम्यान, या मागणीमुळे उदगीर व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    1
    साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    22 min ago
  • मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    1
    मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर :  शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार
डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे.
या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा   शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    1
    *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    1
    अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. �
Hindustan Times
ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत.
येथे महिलांना:
🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा
💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी
📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा
👉 मुख्य उद्देश:
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे.
📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ
सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे:
ओळख (Identity) + विकास केंद्र
समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन
✔️ थोडक्यात
अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते
वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात
पण मुख्य हेतू एकच —
👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    1
    लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी.
निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. 
लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे
ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि
लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे
व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या
विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • “उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे… शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील वसाहतीत एका माजी सैनिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात आढळून आला आहे. घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली… त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडताच ही धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रकाश बाबुराव सासट्टे असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरमध्ये राहत होते. प्राथमिक अंदाजानुसार चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा… मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृद्ध आई-वडिलांसह राहत असलेल्या या माजी सैनिकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे… पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”
    1
    “उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे…
शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील वसाहतीत एका माजी सैनिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात आढळून आला आहे.
घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली… त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडताच ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
प्रकाश बाबुराव सासट्टे असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरमध्ये राहत होते.
प्राथमिक अंदाजानुसार चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा… मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वृद्ध आई-वडिलांसह राहत असलेल्या या माजी सैनिकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.