राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार ज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवा - श्री. नितीन गडकरी -सहावे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन -राष्ट्रसंतांनी जनतेमध्ये शोधला जनार्धन - डॉ. अक्षयकुमार काळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार ज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवा - श्री. नितीन गडकरी -सहावे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन -राष्ट्रसंतांनी जनतेमध्ये शोधला जनार्धन - डॉ. अक्षयकुमार काळे नागपूर : (७-३-२०२६) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार ज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अद्यासन व विचारधारा विभागाच्या वतीने सहावे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. ऐ.के. डोरले सभागृहात शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी पार पडले. संमेलनाचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी बोलत होते. साहित्य संमेलन उद्घाटन समारंभ व ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला उद्घाटक म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, संमेलनाध्यक्ष म्हणून ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र मोझरी येथील सरचिटणीस पद्मश्री श्री. जनार्दनपंत बोथे, माजी कुलगुरू डॉ.श.नु. पठाण, अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांची उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी साहित्य, भजन, काव्य लिहिण्यासोबत प्रत्यक्ष कृतीतून समाज परिवर्तन केले, असे श्री. गडकरी पुढे बोलताना म्हणाले. राष्ट्रसंतांचे जीवनकार्य, कर्तुत्व आज देखील प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारातून झालेले समाज परिवर्तन आज समाजात बघावयास मिळते. साहित्य, काव्य, संगीत, नृत्य, नाटक, प्रबोधन आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून मानवी मनावर काय परिणाम होतो, याचे अध्ययन करण्याची गरज केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे व्यक्तिमत्व वेगळे असून त्यांच्या लिखाणातील भावार्थ वेगळा होता. सत्य, अहिंसा या सोबतच त्यांनी सामर्थ्याची देखील पूजा केली. स्पृश्य-अस्पृश्य, भेदाभेद नष्ट करण्यासोबतच गावागावातील तंटे-वाद मिटवत राष्ट्राच्या अर्थात भारताच्या विकासचा कानमंत्र राष्ट्रसंतांनी जनतेला दिला. संगीतातील खंजिरी हा प्रकार महाराजांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशाला माहिती करून दिला. त्यांच्या विचारात वक्तृत्वात विशिष्ट प्रकारची लय होती. त्यामुळेच राष्ट्रसंत समाजमान्य झाल्याचे श्री गडकरी म्हणाले. महाराजांना ग्रामीण जनतेची नाडी समजली होती. सर्व सामान्य जनतेला कळेल, अशी साहित्य रचना त्यांनी केली. 'मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव' अशा किती सोप्या शब्दात महाराजांनी तत्त्वज्ञान सांगितले. आजची तरुण पिढी जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन कृतीशील नसेल तर त्यांचे विचार कमी होईल. आज विज्ञानाची भाषा तरुण पिढीला समजत असून या दृष्टीने विद्यापीठाने विचार करीत डिजिटल माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार तरुण पिढी तसेच समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. या सोबतच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराप्रमाणे आधुनिक क्रांती कशाप्रकारे घडविता येईल, याची माहिती त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून दिली. जनतेमध्ये शोधला जनार्दन - डॉ. अक्षय कुमार काळे राष्ट्रसंतांनी जनतेमध्ये जनार्दन शोधला असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले. आधुनिक काळात म्हणजे विसाव्या शतकात भारतीय संतांची पूर्वपरंपरा संपूर्णपणे आपल्या व्यक्तिमत्त्वात जिरवून संपूर्ण भारतवर्षाला आपल्या सातत्यपूर्ण प्रबोधनाने ज्यांनी नवा मार्ग दाखविला अशा बोटांवर मोजता येण्यासारख्या संत मंडळीत राष्ट्रसंत हे अग्रणी संत होते. संत ज्ञानेश्वर, संत चोखोबा, संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास, संत तुकोबा, सावता माळी, शेख महंमद, जनाबाई, नरहरी सोनार इत्यादी सर्वच संत मंडळी ईश्वरोपासना करीत असली आणि आपल्या उपास्य दैवताच्या भक्तीत तल्लीन झालेली असली तरी समाजविन्मुख कधीच नव्हती. सभोवतालच्या ज्या विशाल जनसागरात हे संत जगत होते. त्याच्या रक्षणाची उन्नतीची ध्येयपूर्ण विकासाची जबाबदारी आपल्याच शिरावर आहे, ह्याची विवेकी जाणीव त्यांना होती. ही जबाबदारी पेलताना त्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा आदर्श प्रस्तुत केला, असे डॉ. काळे म्हणाले. साहित्य निर्मितीमध्ये अनन्यपणे कार्यरत होणारा महत्त्वाचा घटक म्हणजे साहित्यनिर्मात्याचे व्यक्तिमत्व. त्यामुळे महाराजांच्या साहित्याचा अभ्यास करताना त्यांच्या बहुपरिणामयुक्त व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे अपरिहार्यच ठरते. महाराज मूलतः भक्त आणि साधक आहेत. चराचराला नियंत्रित करणाऱ्या त्या दिव्यशक्तीचा शोध ही त्यांची बालपणापासूनची असोशी होती. त्याकरिता करावी लागणारी कठोर उपासना महाराजांनी आपल्या पूर्वायुष्यात केली. ईश्वर शक्तीचे प्राप्त होणारे रहस्यदर्शन प्रत्येक व्यक्तीचे सापेक्ष दर्शन असते. शेवटी ती एक हृदयतळापर्यंत जाणारी जाणीव, एक संवेदना, एक साक्षात्कार आहे. तो साक्षात्कार महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा सूत्रबिंदू आहे. या जाणिवेच्या परिवर्तनशील विस्तार त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वामध्ये विविध रूपांनी प्रकट झाला आहे. विशाल मानवता, सर्वस्पर्शी राष्ट्रभावना आणि समाजहितैशी दृष्टी ही महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. विश्वकरुणा आणि मानवता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जगाच्या विशालतेत विलीन होण्यासाठी व्यक्तिमत्व विश्वकरुणेने व्यापून घ्यावे लागते. महाराजांचे हृदय केवळ तिने व्यापलेच नाही, तर ते हृदय ओसंडून ती वाहत राहिली. त्यांचे विश्वचिंतन या करुनेतून निर्माण झाले. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या कर्दमात रुतत चाललेल्या सभोवतालच्या अज्ञ बहुजन समाजापासून अत्यंत प्रगत, पण कधीकधी युद्धखोर बनणाऱ्या विश्व समाजापर्यंत विचार करणारी त्यांच्या जाणिवेची कक्षा अतिशय व्यापक होती, असे डॉ. काळे म्हणाले. राष्ट्रसंतांचा राष्ट्रवाद केवळ भारताला पारतंत्र्याच्या अंधकारमय दास्यातून स्वातंत्र्याच्या लब्ध प्रकाशात आणण्याशी संबंधित नाही तर स्वातंत्र्यानंतरच्या बलशाली भारत निर्माण करण्याशीही संबंधित आहे, जो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांच्या पायावर उभा आहे. कोणत्याही विकृत मूलतत्त्ववादी वृत्तीपासून, धार्मिक उन्मादापासून सर्वथा मुक्त आहे. महाराजांची राष्ट्रवादासंबंधीची कल्पना सर्वंकष स्वातंत्र्य आणि पुरोगामीत्वाला बळ देणारी तर्कपद्धती यातून विकसित झाली आहे. यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवरराष्ट्रनिर्मितीचे स्वप्न ते पाहू शकले. नवराष्ट्राच्या निर्मितीचा नकाशा तयार करू शकले आणि त्याबरहुकूम कृतीशीलतेच्या मार्गावर गंभीरपणे आणि खंभीरपणे आपली पावले टाकू शकले. त्यांच्या साहित्याची विस्तृत माहिती देताना राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. भारतरत्न मिळाल्यास संपूर्ण भारतात महाराजांविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न नागरिक करतील, यातून महाराजांचे विचार संपूर्ण देशच नव्हे तर विश्वात पोहोचेल, असे देखील डॉ. काळे म्हणाले. राष्ट्रनिर्माणाचे राष्ट्रसंतांचे तत्त्वज्ञान - कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर राष्ट्रनिर्माण करण्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तत्त्वज्ञान असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी अध्यक्षीय भाषण करताना केले. समाजाला आज खऱ्या अर्थाने महाराजांच्या विचारांची गरज असून त्यांच्या विचाराने मार्गक्रमण केल्यास विकसित भारताच्या दिशेने जाता येईल, असे कुलगुरू डॉ. क्षीरसागर म्हणाल्या. ग्रामगीता लोकांपर्यंत पोहोचल्यास राष्ट्राच्या विकसित होण्याची दिशा जनतेला समजेल असे सांगत मोझरी येथील भेटीची माहिती कुलगुरूंनी यावेळी दिली. समाज सेवेलाच ईश्वर सेवा मानली - डॉ. श. नु. पठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाज सेवेलाच ईश्वरसेवा मानली, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. श. नु. पठाण यांनी केले. सर्व संतांनी ईश्वरभक्तीचा मार्ग दाखविला तर राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्तीचा भाव जनतेमध्ये निर्माण केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच घडलो असल्याचे सांगत राष्ट्रसंतांचे विचार संपूर्ण देशात प्रसारित करण्याची जबाबदारी विद्यापीठावर असल्याचे डॉ. पठाण म्हणाले. लातूर येथे निर्माण करण्यात आलेल्या मानवता भवनाची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. प्रास्ताविक तथा स्वागतपर भाषण करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी सहाव्या साहित्य संमेलनात सर्व उपस्थितांचे स्वागत केले. वांग्मय सेवा ही सर्वात मोठी सेवा असल्याचे सांगत राष्ट्रसंतांचे साहित्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे याकरिता या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण जनतेला कडावे असे साहित्य राष्ट्रसंतांनी निर्माण केले असून परिवर्तनशील मानव कल्याण विश्वशांती राष्ट्रभक्ती असे ज्ञानसंपन्न राष्ट्रसंत होते असे त्या म्हणाल्या. विद्यापीठात 'राष्ट्रसंत संग्रहालय' लोकसहभागातून उभारले जात असून याकरिता मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. उद्घाटन कार्यक्रमाला श्री. प्रकाश महाराज वाघ, श्री. ज्ञानेश्वर रक्षक, श्री. अशोक यावले, श्री. सुबोध दादा, श्री. बाबाराव पाटील, सर्व प्राधिकरणीचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व गुरुदेवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर लिखित सृजनशिल्प ग्रंथाचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी विद्यापीठ परिसरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीमध्ये ग्रामगीता तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव मासिकाचा पहिला अंक ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार प्रा. वर्षा पाटील यांनी मानले.

- हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासनाचा लाखोंचा महसूल माफियांच्या खिशात! नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.1
- पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad1
- turbhe Indira Nagar bathroom ke samne gandgi padi hai2
- Post by Dilip अलावा9617560573%900955824
- HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!1