एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे व अंदरसूल ग्रामपालिका माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा.राजेंद्र गायकवाड हे होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शाळेच्या आवारात आगमन होताच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने महाराजांचे स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला बेल्ट रेस्लिंग राष्ट्रीय खेळासाठी निवड झालेली स्कूलची विद्यार्थिनी कु.जयश्री देशमुख हिच्या हस्ते अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शर्मिला पवार यांनी केले. यानंतर नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय युंगमुनदो कराटे स्पर्धेत रजत पदक व कांस्य पदक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा व क्रीडा शिक्षिका साक्षी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी तन्मय सोनवणे याने छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केली होती. यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी "एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी वर शिवबा जन्मला", हे गीत सादर केले. यानंतर शाळेतील विद्यार्थी प्रसाद देवरे, खदिजा खान, पायल माळी, स्तुती पांडे यांनी आपले भाषणे सादर केले. शिवगर्जना आर्यन शितोळे व रिरॉन्सी एंडाईत यांनी सादर केली. वेदिका शिनगारे हिने पोवाडा सादर केला.यानंतर विद्यार्थिनींनी "झुलवा पाळणा" या गीतांवर नृत्य सादर केले. त्यानंतर मर्दानी खेळांमध्ये लाठी काठी, तलवार बाजी इ. कला विद्यार्थ्यांनी सादर केली.अध्यक्षीय भाषणात संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा.आर.बी.गायकवाड यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेऊन आपण आपले कार्य करावे.महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांचे कल्याण केले व सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. याप्रसंगी रामनाथकाका एंडाईत, पालक नारायण देशमुख, रामकिसन आहेर, दत्तू शिंदे, वडनेरे, रेशमे, शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोडके, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, सुनिता वडे, पूजा जाधव आदी सह सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा निकम यांनी तर आभार प्रदर्शन आरती राजपूत यांनी केले.

- येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड! बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार.... शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया व घोषणा बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू." उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. - रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.4
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- खबर महाराष्ट्र नाशिक से अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे। रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं2
- शुरु न्युज चॅनल आपली प्रतिक्रिया देताना भगतसिंग राजपुत1
- Post by VK ONLINE INFORMATION10
- मुले चोरणारी टोळी डोंगरगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुले चोरणारे टोळीचा परदापाष करण्यात आला आहे, डोंगरगाव गावामध्ये दोन दिवसापासून मुले चोरणारी टोळीची अफावा वाऱ्यासारखी पसरत होती अशातच एका संशयित महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.1
- Post by शहादेव काशिनाथ वैद्य3
- सिल्लोड शहरात लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन, लहुजी ग्रुप यांच्याकडून लहुजी वस्ताद साळवे यांना प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,1